Jalgaon : विषारी धुरामुळे जळगाव शहरातील आव्हाणे शिवारातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात, मंजूरी मिळूनही मनपाचा घनकचरा प्रकल्प बंद

मागील आठ महिन्यांपासून महासभेत मंजुरी मिळूनदेखील अद्याप हा प्रकल्प सुरू झालेला नाही. आता हा प्रकल्प जणू थंड बस्त्यातचं पडून असल्याचे चित्र मनपात दिसून येत आहे. शहरातून जमा होणाऱ्या कचऱ्यात प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

Jalgaon : विषारी धुरामुळे जळगाव शहरातील आव्हाणे शिवारातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात, मंजूरी मिळूनही मनपाचा घनकचरा प्रकल्प बंद
मंजूरी मिळूनही मनपाचा घनकचरा प्रकल्प बंद Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 6:44 PM

जळगाव – जळगाव (Jalgaon) शहरातील आव्हाणे शिवारातील (Avhane Shivar) मनपाचा घनकचरा प्रकल्प (Solid waste project) गेल्या अनेक वर्षांपासून बंदच आहे. तरी सुध्दा मनपाकडून याच प्रकल्पाच्या ठिकाणी शहरातील दैनंदिन कचरा टाकला जात आहे. टाकत असलेल्या लाखो टन कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने कचऱ्याला आग लागून विषारी वायू परिसरात पसरत आहे. बंद प्रकल्पामुळे हवेचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे, तसेच यामुळे परिसरातील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपाने या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केल्यामुळे परिसरातलं आरोग्य धोक्यात आल्याचं नागरिक म्हणतं आहेत. तसेच जोपर्यंत घनकचरा प्रकल्प सुरू होत नाही तोपर्यंत तिथं कचरा टाकू नये अशी मागणी तिथल्या नागरिकांनी केली आहे.

आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याने नागरिक त्रस्त

हा कचरा लवकर पेट घेत असतो, या कचऱ्याला लागणाऱ्या आगीतून सल्फर डायऑक्साईड निर्माण होतो. यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होत असून नागरिक त्रस्त आहेत. घनकचरा प्रकल्पा शेजारी राहत असलेल्या लोकांनी अनेकदा मनपाममागील आठ महिन्यांपासून महासभेत मंजुरी मिळूनदेखील अद्याप हा प्रकल्प सुरू झालेला नाही. आता हा प्रकल्प जणू थंड बस्त्यातचं पडून असल्याचे चित्र मनपात दिसून येत आहे. शहरातून जमा होणाऱ्या कचऱ्यात प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. ध्ये तक्रारी दाखल केल्या आहेत. परंतु त्यांना आत्तापर्यंत उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली आहेत. आरोग्याच्या समस्येने त्रस्त झालेल्या नागरिकांनी नेमकं काय करावं असा प्रश्न पडला आहे.

हे सुद्धा वाचा

या नगरातील लोकांचे आरोग्य धोक्यात

विषारी धुरामुळे जळगाव शहरातील चंदू अण्णा नगर, खोटेनगर, अहुजा नगर, पवार पार्क, निमखेडी परिसरासह धरणगाव तालुक्यातील बांभोरी, भोकणी, आव्हाणी ही गावे व जळगाव तालुक्यातील आव्हाणे, खेडी या गावांमधील सुमारे ३० हजारांहून अधिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. देशात कोरोना आल्यापासून नागरिक आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेताना दिसत आहेत.

अद्याप कोरोनाचा संसर्ग पुर्णपणे देशातून गेलेला नाही. तसेच घनकचरा प्रकल्पाला लागत असलेल्या आगीमुळे पर्यावरण अधिक दूषित होतं आहे. परिसरातील नागरिक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत.

Non Stop LIVE Update
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.