जालन्यात मारहाण झालेल्या प्रेमी युगुलाचं बुलडाण्यात शुभमंगल

जालन्यात टोळक्याने प्रेमी युगुलाला बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता.

जालन्यात मारहाण झालेल्या प्रेमी युगुलाचं बुलडाण्यात शुभमंगल
Follow us
| Updated on: Feb 04, 2020 | 10:17 PM

बुलडाणा : जालन्यात टोळक्याने प्रेमी युगुलाला बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. या प्रेमी युगलाचं बुलढाण्यात शुभमंगल झालं आहे (Jalna Couple Beaten). बुलढाण्याच्या मेंढगावातील मंदिरात त्यांनी लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत (Jalna Couple Beaten).

काय आहे नेमकं प्रकरण :

बुलडाणा जिल्ह्यातील एक प्रेमी युगल काही दिवसांपूर्वी जालन्यातील गोंदेगावात फिरायला गेले होते. यावेळी तळ्याच्या दिशेने जाणाऱ्या दोघांना टोळक्याने गाठलं आणि धमकावायला सुरुवात केली.

‘आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही. तळं असल्यामुळे आम्ही फिरायला आलो’ असं तरुण काकुळतीला येऊन चौघांना सांगत होता. अगदी टोळक्याच्या हाता-पाया पडून त्याने माफी मागण्याचा केविलवाणा प्रयत्नही केला. मात्र मस्तवाल तरुणांनी तरुणीच्या वडिलांना फोन करण्यास सांगितलं.

संपूर्ण व्हिडीओमध्ये गावगुंड तरुणीची कॉलर पकडून तिला फरपटत नेताना दिसत आहे. तरुण सारखं ‘दादा, तिला सोडा, आम्ही परत येणार नाही’ अशा शब्दात गयावया केल्या. तरुणाने आपल्या भावाला फोन लावून बोलवून घेण्याचीही विनंती केल्याचं व्हिडीओत दिसतं.

प्रेमी युगुलाला मारहाण होतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.

आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

दरम्यान, या प्रकरणी जालना पोलिसांनी मुख्य आरोपीसह 4 जणांना अटक केली होती. अतिष खंदारे असे या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव आहे. त्यांना 1 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. या आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने त्यांच्या पोलीस कोठडीत आणखी एका दिवसांची वाढ केली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.