ठाकरे गटाचे उमेदवार मनोज जरांगेंच्या भेटीला; म्हणाले, मी धनगर आहे, पण…

Anil Gote Meets Manoj Jarange Patil : ठाकरे गटाचे उमेदवार अनिल गोटे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी महत्वाचं विधान केलं आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर...

ठाकरे गटाचे उमेदवार मनोज जरांगेंच्या भेटीला; म्हणाले, मी धनगर आहे, पण...
मनोज जरांगे पाटीलImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 30, 2024 | 10:10 AM

माजी आमदार आणि धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे उमेदवार अनिल गोटे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. अनिल गोटे यांची मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आठ दिवसात दुसरी भेट आहे. या भेटीनंतर अनिल गोटे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मी धनगर असून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पहिल्या दिवसापासून पाठिंबा दिला. याचं सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं. मराठा समाजाला न्याय मिळावा हे मी आमच्या समाजालाही सांगितलं आपला आणि मराठा समाजाचा प्रश्न एकच आहे, असं अनिल गोटे म्हणालेत.

देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र

मी देवेंद्र फडणवीस यांच्या या गोष्टीला कंटाळून एक वर्ष अगोदर आमदारकीचा राजीनामा दिला. मी त्यांना सांगितलं तुम्ही भले काही करा पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. राजकारणात फसवा – फसवी आणि धोकेबाजी हा पायंडा त्यांनी पाडला आहे, असं अनिल गोटेंनी म्हटलं

पाच वर्षे धनगर समाजाला लटकवत ठेवलं, फक्त विधानसभेत ठराव करून दिल्लीला पाठवायचा होता. ज्यावेळेस अहवाल आला त्यावेळेस मात्र त्यांनी दाबून ठेवला हे बाहेर आलं नाही. ते म्हणाले मराठा आरक्षणाचा प्रश्न आपण सोडवला धनगराचा प्रश्न नाही सोडवला तरी चालेल इतका कपटी माणूस आहे. मनोज जरांगे पाटील एक चांगला प्रामाणिक आंदोलक आहे. देवेंद्र फडणवीस राजकारणातला शकुनी मामा आहेत, असंही अनिल गोटे म्हणालेत.

धुळे शहरातील लढतीवर काय म्हणाले?

धुळे शहर मतदार संघात भाजपचं आव्हान अनिल गोटेंसमोर आहे. यावर त्यांनी भाष्य केलं. मी काही ते आव्हान मानत नाही. भाजपंचा जो उमेदवार आहे त्यांचा एकच कार्यक्रम आहे. माल दाखवा माल कमवा…, असं अनिल गोटे म्हणाले. शिवसेना ठाकरे नाराजी असल्याची चर्चा होत आहे. त्यावरही गोटेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ती नाराजी दूर होणार नाही, कारण त्यांना नाराजीच्या मागे एक मोठी व्यक्ती आहे. त्यांना शिवसेना एकत्रित राहिलेली नको हे मी उद्धवजींना सांगितलं आहे, असं त्यांनी म्हटलं.

Non Stop LIVE Update
अजितदादांनी खोतांना झापलं, 'निषेधच नाही तर मी त्यांना फोन केला अन्...'
अजितदादांनी खोतांना झापलं, 'निषेधच नाही तर मी त्यांना फोन केला अन्...'.
खोतांचं जतच्या सभेत पवारांच्या आजारावरुन वादग्रस्त वक्तव्य, टीकेची झोड
खोतांचं जतच्या सभेत पवारांच्या आजारावरुन वादग्रस्त वक्तव्य, टीकेची झोड.
'लाडक्या बहिणीं'ना आता 1500 नाही 2100 रूपये मिळणार, राज ठाकरेंचा विरोध
'लाडक्या बहिणीं'ना आता 1500 नाही 2100 रूपये मिळणार, राज ठाकरेंचा विरोध.
राज ठाकरेंचा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांना सवाल, 'आरक्षण कस मिळेल?'
राज ठाकरेंचा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांना सवाल, 'आरक्षण कस मिळेल?'.
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?.
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य.
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा.
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका.
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी.
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”.