सरकारला घेरायचंय, 7-13 ऑगस्टला तुफान…; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Manoj Jarenge Patil on Western Maharashtra Daura : मनोज जरांगे पाटील आता पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यासाठी अंतरवली सराटीहून तुळजापूरकडे जाण्यासाठी जरांगे पाटील रवाना झाले आहेत. यावेळी त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. वाचा सविस्तर...

सरकारला घेरायचंय, 7-13 ऑगस्टला तुफान...; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
मनोज जरांगे पाटीलImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Aug 06, 2024 | 6:58 PM

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या साठी मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत. आता पश्चिम महाराष्ट्रात जरांगे पाटील करणार आहेत. या दौऱ्यासाठी अंतरवाली सराटीहून तुळजापूरकडे रवाना झाले आहेत. आज तुळजापूर मुक्काम केल्यानंतर उद्या जरांगे पाटील सोलापूरमध्ये असणार आहेत. सोलापुरात जरांगे पाटील यांच्या उपस्थित महा शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या सोलापूर पासून दौरा सुरू होत आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंशी टीव्ही 9 मराठीने संवाद साधला. तेव्हा त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.

मराठ्यांनी ठरवले आहे. यांनी आपल्याला घेरले आहे .आता आपण सरकारला घेरायचे. 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट तुफान मराठे दिसणार आहेत, आणि असे मराठे जमलेले पुन्हा महाराष्ट्रात दिसणार नाहीत, असं म्हणत मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिला आहे.

मनोज जरांगे काय म्हणाले?

ज्यांना तारीख दिली आहे त्या जिल्ह्यातील मराठा समाज ताकतीने येणार आहे. आपल्या मुलांना, शेतकऱ्यांना आरक्षण द्यायचे असेल तर ही शेवटची संधी आहे. ज्या ज्या ठिकाणी रॅली होणार आहे. त्या ठिकाणी काम बंद करून मराठा समाज येणार आहे. आपल्या मुलांसाठी समाज एकत्र येणार आहे. शेवटी आम्हाला न्याय पाहिजे, हा संदेश आमच्यासाठी महत्वाचा आहे. राजकारणी लोक मोठे करणे, हा आमचा पिंड नाही. आमचे लेकरे मोठे करणे हा आमचा सर्वात मोठा प्रश्न आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

“आता पुढची लढाई…”

सरकारला आरक्षण द्यायचे नाही. म्हणून आमदार, मंत्री, विरोधक, ओबीसींचे छगन भुजबळ हे सर्व विरोधात उतरले आहेत. पण आपण आपल्या माणसाला उघडे पडू द्यायचे नाही. प्रत्येक जिल्ह्यात मिळेल त्या वाहनाने मराठा समाज रॅलीमध्ये सहभागी होणार आहे. पुढची लढाई ही, शेतकरी, मराठा, मुसलमान, धनगर बांधवांची असणार आहे. ज्या ठिकाणी रॅली आहे त्या ठिकाणी महिलांसाठी टॉयलेटची व्यवस्था करा. ज्यामुळे महिलांची गैरसोय होणार नाही, असं जरांगेंनी स्पष्ट केलं.

पावसामुळे सांगली कोल्हापूर नुकसान झाले आहे. आम्ही मुख्यमंत्री आणि शंभुराज देसाई यांच्याकडे नुकसानभरपाईची मागणी करणार आहे. मला नाही वाटत त्यांना मी घेतलेली राजकीय भूमिका पचनी पडत नसेल. मराठ्यांना आरक्षण देऊ म्हणले आणि ते देऊ शकले नाही म्हणून ते उघडे पडले आहेत. त्यांचा शेवटचा प्रयत्न आहे भांडणे करा आणि वेळ मारून न्या, आणि मग आचारसंहिता लागते, हे लोकांना समजले आहे. सर्व मंत्री आमदार एकत्र आले आहेत आणि याना आरक्षण द्यायचे नाही, आणि मराठे मोठे होऊ द्यायचे नाही. पण आम्ही तसं होऊ देणार नाही, असं जरांगे यावेळी म्हणाले.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.