शेकडो वर्ष जुनं जामखेडमधील कला केंद्र अचानक बंद, कलाकारांचं आमरण उपोषण

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील कला केंद्रावरून वातावरण चांगलंच तापलंय. राजकीय दबावाखाली शेकडो वर्षांची परंपरा असलेलं लोककला केंद्र जिल्हा प्रशासनाने बंद केलंय. यामुळे हजारो कलावंतांना उपासमारीची वेळ आली आहे. तर कलाकेंद्र बंद केल्यानंतर गेल्या पाच दिवसांपासून सर्व महिला आणि पुरुष लहानमुलांसह उपोषणाला बसले आहेत. पण अजूनही कुणी या उपोषणाची दखल घेतलेली नाही. राजकीय फायद्यासाठी […]

शेकडो वर्ष जुनं जामखेडमधील कला केंद्र अचानक बंद, कलाकारांचं आमरण उपोषण
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:21 PM

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील कला केंद्रावरून वातावरण चांगलंच तापलंय. राजकीय दबावाखाली शेकडो वर्षांची परंपरा असलेलं लोककला केंद्र जिल्हा प्रशासनाने बंद केलंय. यामुळे हजारो कलावंतांना उपासमारीची वेळ आली आहे. तर कलाकेंद्र बंद केल्यानंतर गेल्या पाच दिवसांपासून सर्व महिला आणि पुरुष लहानमुलांसह उपोषणाला बसले आहेत. पण अजूनही कुणी या उपोषणाची दखल घेतलेली नाही.

राजकीय फायद्यासाठी जामखेडच्या मोहा हद्दीतील पाच कलाकेंद्र कायमस्वरूपी बंद करण्यात आल्याचा आरोप कलाकेंद्र चालकांनी केलाय. तर कलाकेंद्र बंद व्हावी या मागणीसाठी मोहा ग्रामस्थांनी आमरण उपोषण करून प्रशासनाला बंदी घालण्यास भाग पाडलं. मात्र यामुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकांचा रोजगार बंद झालाय. तर काहींसमोर कर्जाचा डोंगर उभा राहिलाय. तसेच या निर्णयामुळे हजारो वर्षांपासून चालत आलेली परंपरा बंद झाली आहे.

लावणी, तमाशा, लोकनाट्य ही पूर्वापार चालत आलेली कला आहे. अगदी राजे महाराजे देखील या कलेपासून सुटले नाहीत. मोठमोठ्या राजांच्या दरबारात नरकती नाचत असे, त्यामुळे ही कला लोककला म्हणून ओळखली जाते. तर जामखेडला 75 वर्षांची परंपरा असलेले केंद्र आता बंद झाले आहेत. त्यामुळे या सर्व कलाकारांनी आपल्या मुलाबाळांसह उपोषण सुरू केलं.

उपोषणकर्त्यांपैकी चार महिलांची, तर एका पुरुषाची प्रकृती खालावली असून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हे केंद्र बंद झाल्याने महिला, ढोलकी आणि तबला वादक, पेटी वाजवणारे मास्तर, गाणे गाणारे, कोरिओग्राफर, कर्मचारी अशा अनेक कुटुंबाची रोजंदारी बंद झाली आहे. यामुळे तब्बल तीन ते चार हजार लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

सुरुवातीला प्रशासनाने या केंद्रांना परवानगी तर दिली, मात्र मोहा गावातील काही राजकीय मंडळींनी याला जोरदार विरोध केला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कलाकेंद्राचे निलंबन केलं. मात्र निर्णयामुळे केंद्र चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही कला केंद्र सुरू झाली नाही तर या मंडळींपुढे रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. मुलांची शिक्षण, वयोवृद्धांचे आजारपण, तसेच उदरनिर्वाह कसा करायचा असे अनेक प्रश्न आहेत. अनेक वर्षांपासून आम्ही पोट भरत असून आमचा कोणाला त्रास नाही, तर कलाकेंद्र बंद झाल्यास आमच्यावर उपासमारीची वेळ येईल असे मत कलाकेंद्र चालकांनी व्यक्त केलंय.

एकीकडे गावकऱ्यांचा विरोध, तर दुसरीकडे कलाकेंद्राची उपासमार. त्यामुळे प्रशासन देखील मोठ्या अडचणीत सापडलंय. मात्र काहीतरी तोडगा काढावाच लागेल. तर यातून लवकरात लवकर मार्ग काढू असं आश्वासन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दिलंय. काही गावकऱ्यांनी यामळे वाईट परिणाम होत असल्याचं म्हटलंय.

या कला केंद्रांमुळे समाजावर खरंच वाईट परिणाम होतोय का? इतक्या दिवस गावकऱ्यांना काही त्रास नव्हता का? विशेष म्हणजे गावापासून अनेक दूर ही कला केंद्र आहेत. त्यामुळे काही आर्थिक तडजोडीसाठी ठराविक राजकीय लोकांनी एकत्र येऊन कलाकेंद्र बंदीसाठी विरोध केलाय का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र कला केंद्र सुरू झाले नाही तर यात हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे प्रशासन काय निर्णय घेतं याकडे या कलाकारांचे लक्ष लागलंय.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.