KBC जिंकून मंदिर उभारलं, त्याच देवळात कोट्यधीश बबिता ताडेंची बिग बींसाठी प्रार्थना

अमरावती जिल्ह्यातील एका शाळेत खिचडी बनविणाऱ्या बबिता ताडे या सुद्धा घरातील मंदिरात महादेवाचं जप करत आहेत. (KBC Babita Tade's prayer for Amitabh Bachchan )

KBC जिंकून मंदिर उभारलं, त्याच देवळात कोट्यधीश बबिता ताडेंची बिग बींसाठी प्रार्थना

अमरावती : बिग बी अमिताभ बच्चन हे कोरोनामुक्त व्हावेत यासाठी देशातच नव्हे तर जगभरात होम-हवन सुरु आहेत. अमिताभ बच्चन यांच्यासह मुलगा अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या आणि नात आराध्य हे सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर बच्चन लवकर बरे व्हावेत यासाठी सर्वत्र प्रार्थना सुरु आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील एका शाळेत खिचडी बनविणाऱ्या बबिता ताडे या सुद्धा घरातील मंदिरात महादेवाचं जप करत आहेत. (KBC Babita Tade’s prayer for Amitabh Bachchan )

बबिता ताडे यांनी कौन बनेगा करोडपती या शोमध्ये सहभागी होऊन, एक कोटी रुपये जिंकले होते. त्यावेळी बिग बी अमिताभ बच्चन यांचा स्नेह त्यांना लाभला होता. बिग बी यांनी बबिता ताडे यांचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. त्यांच्या प्रेरणादायी प्रवासावरुन, बिग बींनी त्यांना शाबासकी दिली होती. (KBC Babita Tade’s prayer for Amitabh Bachchan )

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

याच आपुलकीने बबिता ताडे भारावून गेल्या. मात्र आता बच्चन यांच्यावर कोरोनाचं संकट ओढावल्याने, बबिता ताडे यांनी देवाकडे त्यांच्या उत्तम प्रकृतीची प्रार्थना केली. सोबतच संपूर्ण देश कोरोनामुक्त व्हावा अशीही प्रार्थना त्यांनी केली.

एक कोटी रुपये जिंकल्यावर पतीच्या अडचणी कमी करण्याचा निर्धार त्यांनी केला होता. आपल्या परिसरात विखुरलेल्या देवतांसाठी एक मंदिर बांधण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला होता. आता त्याच मंदिरात बबिता ताई बच्चन यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत.

बबिता ताडेंना 1 कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेला प्रश्न

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन होस्ट करणाऱ्या ‘कौन बनेगा करोडपती 11’ मध्ये अमरावतीच्या बबिता ताडे (KBC 11 Babita Tade) यांनी कोट्यधीश होण्याचा मान मिळवला होता. बबिता यांनी एक एक टप्पा पार करत एक कोटी रुपये जिंकले. एक कोटी रुपये जिंकल्यानंतर बबिता ताडेंना सात कोटींचा प्रश्नही विचारण्यात आला होता. मात्र त्यांनी खेळ तिथेच थांबवण्याचा निर्णय घेत एक कोटी रुपयांमध्ये समाधान मानलं.

एक कोटीचा प्रश्न 

मुघल शासक बहादुर शाह जफरच्या दरबारातील कोणत्या कवीने ‘दास्तान ए गदर’ नावाने वैयक्तिक विचार मांडले होते?

A) मीर तकी मीर B) मो इब्राहिम जौक C) जहीर देहलवी D) अबुल क्वाशिम फिरदौशी

उत्तर – C) जहीर देहलवी

सात कोटींचा प्रश्न काय होता?

पुढीलपैकी कोणत्या राज्यातील सर्वाधिक राज्यपाल नंतर राष्ट्रपती झाले?

A) राजस्थान B) बिहार C) पंजाब D) आंध्रप्रदेश

उत्तर – B) बिहार

बबिता ताडेंचा प्रेरणादायी प्रवास

बबिता ताडे या एका सरकारी शाळेत लहान मुलांसाठी मध्यान्य भोजन बनवण्याचं काम करतात. त्यामुळे आजूबाजूचे लोक त्यांना ‘खिचडी काकू’ या नावानेच हाक मारतात. त्या दररोज 450 लहान मुलांसाठी जेवण तयार करतात. गेल्या 17 वर्षांपासून बबिता ताडे ही नोकरी करत असून त्यांना या कामासाठी दर महिना फक्त 1500 रुपये मिळतात.

एक कोटी रुपये जिंकल्यावर पतीच्या अडचणी कमी करण्याचा निर्धार त्यांनी केला. आपल्या परिसरात विखुरलेल्या देवतांसाठी एक मंदिर बांधण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला होता. विशेष म्हणजे कोट्यधीश झाल्यावरही दीड हजारांची नोकरी न सोडण्याची त्यांची इच्छा आहे.

संबंधित बातम्या 

KBC 11 | अमरावतीच्या बबिता ताडे करोडपती झाल्या, मात्र खात्यात किती रक्कम जमा होणार?   

KBC 11 : शाळेत मध्यान्ह भोजनाचं काम, मोबाईलही नाही, अमरावतीच्या ‘खिचडी ताई’ करोडपती! 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *