कार्यालयातील पंखा-बत्ती गुल करुन अधिकाऱ्याला मेणबत्ती भेट, वीज तोडणीविरोधात कल्याणमध्ये मनसेचं अनोखे आंदोलन

कल्याणमध्ये अधिकाऱ्याच्या कार्यालयातील पंखा-बत्ती गुल करुन (KDMC MNS Leaders Gave Candle To Officer) मनसेने त्यांनी मेणबत्ती भेट दिली.

कार्यालयातील पंखा-बत्ती गुल करुन अधिकाऱ्याला मेणबत्ती भेट, वीज तोडणीविरोधात कल्याणमध्ये मनसेचं अनोखे आंदोलन
KDMC MNS

कल्याण : कल्याणमध्ये अधिकाऱ्याच्या कार्यालयातील पंखा-बत्ती गुल करुन (KDMC MNS Leaders Gave Candle To Officer) मनसेने त्यांनी मेणबत्ती भेट दिली. आता मेणबत्ती भेट दिली उद्या कार्यालय पेटवून देणार, असा इशाराही मनसेने दिला आहे. वीज तोडणीविरोधात मनसेने आंदोलन केलं आहे (KDMC MNS Leaders Gave Candle To Officer Protesting Electricity Connection Cut).

वीज तोडणीविरोधात कल्याणमध्ये मनसेने अनोखे आंदोलन केले आहे. अधिकाऱ्यांच्या केबीनमधील लाईट, पंखा बंद करुन मेणबत्ती गीफ्ट केल्या. इतकंच नाही तर वीज तोडणीची कारवाई थांबिवली, तर कार्यालय पेटवून देण्याची धमकीही यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

वाढीव वीज बिलाविरोधात मनसे आक्रमक

राज्यभरात वाढीव वीज बिलाविरोधात मनसे आणि भाजपने आांदोलन केलं. मात्र, सरकार किंवा महावितरण कंपनीवर त्याचा फारसा फरक पडला नाही. कल्याण-डोंबिवलीत देखील काही नागरीकांचा वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. याची माहिती मिळताच मनसेचे पदाधिकारी योगेश गव्हाणे, महेंद्र कुंदे, अनंता गायकवाड, निर्मल निगडे हे पदाधिकारी कल्याण पूर्व टाटा पॉवर नाका परिसरात असलेल्या वीज वितरण कार्यालयात पोहचले.

महावितरणचे कार्यकारी अभियंता नरेंद्र धबड यांच्या कार्यालयात जाऊन या पदाधिकाऱ्यांनी केबीनमधील लाईट-पंखा बंद केला. जवळपास पाऊण तास मनसे पदाधिकारी अधिकाऱ्यांसोबत अंधारात चर्चा करीत होते. लाईट-पंखा नसल्याने नागरीकांना काय त्रास होतो हे अधिकारी वर्गास दाखवून दिले. नंतर धबड यांना मेणबत्ती भेट दिली.

वीज तोडणीची कारवाई थांबविण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी मनसे पदाधिकारी योगेश गव्हाणे यांचे म्हणणे वीज तोडणीची कारवाई महावितरणने थांबविली पाहिजे. आज मेणबत्ती दिली आहे. उद्या मेणबत्ती पेटवून देणार तसेच कार्यालयही पेटवून देणार असा सज्जड दम भरला आहे.

KDMC MNS Leaders Gave Candle To Officer Protesting Electricity Connection Cut

संबंधित बातम्या :

आठ दिवसांत सरकारचे घूमजाव; थकबाकीदारांचे वीज कनेक्शन तोडणारच, नितीन राऊतांची माहिती

महावितरण ही जनतेची कंपनी, आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी थकबाकी भरा : उर्जामंत्री नितीन राऊत

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI