मनसेच्या खळखट्याक आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर केडीएमसीला जाग, स्कायवॉकवर साफसफाईला सुरुवात

मनसेच्या इशाऱ्यानंतर केडीएमसीला अखेर जाग आली आहे (KDMC wakes up after MNS warn). स्कायवॉकवर साफसफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे.

मनसेच्या खळखट्याक आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर केडीएमसीला जाग, स्कायवॉकवर साफसफाईला सुरुवात
Follow us
| Updated on: Nov 04, 2020 | 1:23 PM

ठाणे : मनसेच्या खळखट्याक आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर केडीएमसी प्रशासनाला अखेर जाग आली आहे (KDMC wake up after MNS warn). मनसेचे कल्याण पूर्वचे विभाग अध्यक्ष विवेक धुमाळ यांनी कल्याण स्टेशन परिसरात पूर्व आणि पश्चमेला जोडणाऱ्या स्कायवॉकर असलेल्या अस्वच्छतेविरोधात आवाज उठवला होता. याबाबत त्यांनी केडीएमसीचे घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त रामदास कोकरे यांना पत्रदेखील पाठवले होते. त्यानंतर फेसबुक लाईव्हद्वारे केडीएमसीला आंदोलनाचा इशारा दिला होता.

विवेक धुमाळ यांनी काल (3 नोव्हेंबर) मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आज केडीएमसीचे सफाई कर्मचारी स्कायवॉकवर साफसफाईसाठी दाखल झाले. उपायुक्त रामदास कोकरे यांनी विवेक धुमाळ यांना याबाबत माहिती दिली. याशिवाय स्कायवॉक पाण्याने धुवून काढणार, असं आश्वासन कोकरे यांनी दिल्याचं धुमाळ यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना सांगितलं (KDMC wake up after MNS warn).

विवेक धुमाळ काय म्हणाले होते?

“कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या स्कायवॉकवर प्रचंड घाणीचं साम्राज्य असतं. अस्वच्छतेमुळे स्कायवॉकवर नेहमी दुर्गंध पसरलेला असतो. त्यामुळे स्कायवॉकवरील घाणीचं साम्राज्य हटवा, स्कायवॉकची योग्यप्रकारे निगा राखा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करु”, असा इशारा विवेक धुमाळ यांनी दिला होता.

“कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पादचारी पुलावर अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या पुलावर मलमूत्र, अस्वच्छता, गडदुल्ले यांचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. केडीएमसीच्या उपायुक्तांनी यापुढे स्कायवॉकवरील पुलाच्या स्वच्छतेसाठी काम करु, त्या कामाचा पाठपुरावा करु, असं आश्वासन दिलं आहे”, असं विवेक धुमाळ यांनी फेसबुक लाईव्हमध्ये सांगितलं होतं.

“स्कायवॉकवरुन चालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मोकळा श्वास घेता आला पाहिजे. रात्री उशिरा येणाऱ्या महिलांना सुरक्षित वाटलं पाहिजे. उपायुक्तांनी स्कायवॉकची निगा, डागडुजी आणि स्वच्छता कायमची ठेवावी. स्कायवॉकवर नियमीत लाईट्स आणि पोलीस संरक्षण असावं. महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा भीती वाटायला नको”, असं धुमाळ म्हणाले.

“कल्याण रेल्वे स्टेशनच्या पश्चिम भागात दिपक हॉटेल, दिवाणी न्यायालय आणि तहसील कार्यालयदेखील आहे. त्यामुळे या स्कायवॉकवर नागरिकांची प्रचंड वर्दळ असते. मात्र, तरीदेखील या स्कॉयवॉकची निगा राखली जात नाही. स्कायवॉक हा केडीएमसीच्या हद्दीत आहे. या भागातील वॉर्ड ऑफिसर आणि अधिकारी नेमकं काय करतात? हा मोठा प्रश्न आहे. मी शेवटचं निवेदन देतोय. दोन दिवसात स्कायवॉकची स्वच्छता नाही केली. तर मनसे स्टाईल तीव्र आंदोलन करु”, असा इशारा विवेक धुमाळ यांनी दिला होता.

संबंधित बातमी : ‘शेवटचं निवेदन देतोय, स्कायवॉकवरील घाणीचं साम्राज्य हटवा’, मनसेचा केडीएमसीला इशारा

स्कायवॉकवरील साफसफाईचे काही फोटो

Non Stop LIVE Update
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.