अर्धा आठवडा संपतोय, तीन दिवसात सोन्याचा भाव वाढतोय, काय आहेत मोठ्या शहरातले भाव?

केंद्र सरकारकडून सोन्यासह मौल्यवान धातुंच्या व्यवहारांसाठी एक विशेष धोरण आखण्याची तयारी सुरु आहे. | Gold rates

Rohit Dhamnaskar

|

Jan 20, 2021 | 12:13 PM

मुंबई: सुस्तावलेली अर्थव्यवस्था आणि कोरोनाच्या संकटामुळे गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या दरात (Gold rates) मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. नव्या आठवड्याच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये सोन्याचा भाव वाढताना दिसत आहे. ही वाढ नाममात्र असली तरी लग्नसराईसाठी मोठ्याप्रमाणावर सोने खरेदी करणाऱ्यांसाठी यामुळे फरक पडू शकतो. (Today Gold and Silver rates in Mumbai)

मुंबईच्या बाजारपेठेतील दरांनुसार आज 10 ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना 49,010 रुपये मोजावे लागणार आहेत. नागपूर, नाशिक आणि पुण्यातही सोन्याचा दर 49,010 रुपयांच्या आसपासच आहे. काल मुंबईतील सोन्याचा दर हा 49,000 रुपये प्रतितोळा इतका होता. हा ट्रेंड काय राहिला तर आगामी काही दिवसांत सोन्याचा दर पुन्हा प्रतितोळा 50 हजारांपलीकडे जाईल. जाणकारांच्या अंदाजानुसार यंदाच्या दिवाळीत सोन्याचे दर प्रतितोळा 63 हजारांपर्यंत पोहोचू शकतात.

सोन्याच्या व्यवहारांसाठी सरकार विशेष धोरण आखण्याच्या तयारीत

‘इकॉनॉमिक टाईम्स’च्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून सोन्यासह मौल्यवान धातुंच्या व्यवहारांसाठी एक विशेष धोरण आखण्याची तयारी सुरु आहे. त्यानुसार सोन्यातील गुंतवणुकीचा संपत्तीमध्ये (Asset) समावेश होईल. सध्याच्या नियमांनुसार दागिन्यांचा समावेश ‘undisclosed treasure’ मध्ये केला जातो.

भारतात दरवर्षी 850 टन सोन्याची आयात होते. त्यामुळेच या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून ही पावले उचलली जात आहेत. आगामी अर्थसंकल्पात सोने आणि चांदीच्या व्यवहारासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

घरबसल्या 1 रुपयात सोने खरेदी करा

अपस्टॉक्स (आरकेएसव्ही सिक्युरिटीज ज्याला इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखले जाते) ही भारतातील एक डिजिटल ब्रोकरेज फर्म आहे. आता कंपनीने डिजिटल गोल्ड इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म बाजारात आणलाय. स्टॉक मार्केट्स आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याव्यतिरिक्त आता आपण गुंतवणूक अपस्टॉक्सद्वारे सोन्यात ऑनलाईन गुंतवणूक करू शकता. सध्या अपस्टॉक्सचे 20 लाखांहून अधिक ग्राहक आहेत.

अपस्टॉक्सने ऑगमोंटबरोबर करार केला असून, अवघ्या एका रुपयात सोन्यात गुंतवणूक केलीय. आता या माध्यमातून डिजिटल सोन्यात केवळ एक रुपयाची गुंतवणूक होऊ शकते. अपस्टॉक्स डिजिटल गोल्ड प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहक थेट बाजार दरावर 99.9% शुद्धतेसह 24 कॅरेट डिजिटल सोन्याचे खरेदी करू शकतात, ज्यांचे बाजारभाव प्लॅटफॉर्मवर रिअल-टाइम आधारावर अपडेट केले जातात.

संबंधित बातम्या : 

सोन्यात गुंतवणूक करण्यापूर्वी ‘हे’ लक्षात ठेवा, अन्यथा तुमच्यावरही पडू शकते इन्कम टॅक्सची धाड

सोनं खरेदीसाठी जाताय तर लक्षात असूद्या ‘या’ 3 गोष्टी, नाहीतर होईल नुकसान

सोन्याचं नेमकं काय होणार? वाढत जाणार की कमी होणार?

…म्हणून आताच करा सोनं खरेदी, दिवाळीपर्यंत बसेल खिशाला कात्री

(Today Gold and Silver rates in Mumbai)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें