चाकरमानी संतापले, रेल्वेचा दरवाजा न उघडल्यानं लाथांचा वर्षाव

कोकणातून (Kokan) 5 दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर (Ganeshotsav) चाकरमानी मोठ्या संख्येने मुंबईकडे निघाले आहेत. मात्र, वाहतूक कोंडीने (Traffic Jam) त्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे पाहायला मिळाले.

चाकरमानी संतापले, रेल्वेचा दरवाजा न उघडल्यानं लाथांचा वर्षाव

रत्नागिरी: कोकणातून (Kokan) 5 दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर (Ganeshotsav) चाकरमानी मोठ्या संख्येनं मुंबईकडं निघाले आहेत. मात्र, वाहतूक कोंडीनं (Traffic Jam) त्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत असल्याचं पाहायला मिळाले. एकीकडं रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे, तर दुसरीकडं कोकण रेल्वेचे (Kokan Railway) वेळापत्रकही कोलमडलं आहे. त्यामुळं संतप्त प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेत थेट रेल्वे अधिकाऱ्यांनाच घेराव घातला.

चाकरमान्यांच्या प्रवासाची मुख्य मदार असलेल्या कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्याने एकच गोंधळ उडाला आहे. त्यामुळं खेड रेल्वे स्थानकात प्रवासी संतप्त झालेले पाहायला मिळाले. रेल्वे गाड्यांच्या डब्यांचे दरवाजे न उघडल्याने चाकरमान्यांच्या संतापाचा कडेलोट झाला. त्यामुळे खेड रेल्वे स्थानकामध्ये मोठा गोंधळ उडाला. यानंतर संतापलेल्या प्रवाशांनी थेट रेल्वे अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला.

मुंबई-गोवा महामार्गावरही वाहतूक कोंडी

मुंबई-गोवा महामार्गावर देखील वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, दक्षिण रायगडमधून मोठ्या संख्येने चाकरमाने मुंबईकडे निघाले आहेत. मात्र, वाहतूक कोंडीमुळे एसटी बसेस आणि खासगी वाहनांतून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची अडचण झाली. महाड ते माणगाव, कोलाड, वाकण-पालीमार्गे एक्सप्रेस वे वाहतूक, वडखळ, पेण येथेही जागोजागी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *