कोल्हापुरात मटणाच्या दुकानांवर छापा, 125 किलो मांस नष्ट करण्याचे आदेश

इचलकरंजी शहरातील प्रसिद्ध 'भाग्यरेखा थिएटर' समोर असलेल्या 'जनता' आणि 'अप्सरा' या मटणाच्या दोन दुकानांवर कारवाई करण्यात आली (Ichalkaranji Mutton Shop Raid)

कोल्हापुरात मटणाच्या दुकानांवर छापा, 125 किलो मांस नष्ट करण्याचे आदेश

इचलकरंजी : इचलकरंजीत मटणाच्या दोन दुकानावर छापा घालून 125 किलो मटण जप्त करण्यात आलं आहे. फलक न लावता शेळी-मेंढीच्या मटणाची विक्री आणि गंजलेल्या हत्यारांच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली. (Ichalkaranji Mutton Shop Raid)

इचलकरंजी शहरातील प्रसिद्ध ‘भाग्यरेखा थिएटर’ समोर असलेल्या ‘जनता’ आणि ‘अप्सरा’ या मटणाच्या दोन दुकानांवर कारवाई करण्यात आली. कारवाईत 60 ते 70 हजार रुपये हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये 110 ते 125 किलोच्या आसपास मटण जप्त करुन ते नष्ट करण्यास पाठवण्यात आले आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांच्या पथकाने इचलकरंजी नगरपरिषदेच्या सहकार्याने अचानक छापा मारुन मोठी कारवाई केली. ‘अप्सरा’ हे दुकान विनापरवाना चालत असलेले आढळून आले. तर जनता मटण शॉपमध्ये पालव्याचे मटण, मेंढीचे मटण याचा फलकच लावला नव्हता.

दोन्ही दुकानांमध्ये शेळी-मेंढी पालवे असल्याचे निदर्शनास आले. तसेच स्टीलची हत्यारे वापरण्याऐवजी कमानफाट्याची हत्यारे आढळून आली. या हत्यारांना गंजही चढलेला दिसत होता. खवय्यांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा प्रकार समोर आल्याने अन्न प्रशासन अधिकाऱ्यांनी संपूर्ण मटण जप्त केलं. नगरपरिषदेच्या सहकार्याने जप्त मटण कचरा गाडीत घालून नष्ट करण्यासाठी पाठवलं. (Ichalkaranji Mutton Shop Raid)

दरम्यान, इचलकरंजी शहरात अनेक दिवसापासून मटण दराबाबत आंदोलन होत आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार मटण विक्री केली जात नाही. शेळी, मेंढी, पालवेचे मटण बोकडाचे म्हणून विकले जाते, अशा तक्रारी येत होत्या. मात्र नगरपरिषदेकडून याबाबत कोणतीही कारवाई न झाल्याने नाराजी व्यक्त केली जात होती.

बकऱ्याची आरोग्य तपासणी केली जात नाही, त्याचप्रमाणे मटणाच्या दुकानातील कर्मचाऱ्यांचीही कोणत्याही पद्धतीने आरोग्य तपासणी केली नाही, असा आरोप होत आहे. मटण कापण्याच्या ठिकाणी कोणतीही स्वच्छता नसते, त्याशिवाय मटण कापल्यानंतर उरलेला भाग गटारात सोडला जातो, हेसुद्धा छाप्यात उघड झालं.

नगरपालिकेने याआधी कारवाई केली नसल्यामुळे मटण विक्रेत्यांच्या बेकायदेशीर कृत्याला नगरपालिकेकडून खतपाणी घातले जात असल्याचं बोललं जात होतं. इचलकरंजी शहरात अशी अनेक दुकाने आहेत. आता नगरपालिका त्यांना पुन्हा व्यवसाय करु देणार? की नागरिकांच्या जिवाशी खेळ करण्याचा परवाना देणार? याकडे समस्त इचलकरंजीकरांचे लक्ष लागून राहिले आहे. (Ichalkaranji Mutton Shop Raid)

आणखी बातम्या वाचा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *