IPS वरील हल्ला भोवणार, मटकाचालक राष्ट्रवादीच्या नगरसेविकेवर मोक्का?

कोल्हापूर: मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करणं राष्ट्रवादीच्या नगरसेविका शमा मुल्ला यांना महागात पडलं आहे. या घटनेमध्ये आतापर्यंत पोलिसांनी 25 जणांना अटक केली असून, यांच्यावर मोक्का लावण्याचा प्रस्ताव पोलिसांनी दिला आहे. विषेश म्हणजे यामध्ये माजी उपमहापौर शमा मुल्ला यांचादेखील समावेश आहे. एखाद्या महिला नगरसेवकाला मोक्का लावण्याचा प्रस्ताव पाठवण्याची कोल्हापुरातील ही पहिलीच घटना असेल. …

IPS वरील हल्ला भोवणार, मटकाचालक राष्ट्रवादीच्या नगरसेविकेवर मोक्का?

कोल्हापूर: मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करणं राष्ट्रवादीच्या नगरसेविका शमा मुल्ला यांना महागात पडलं आहे. या घटनेमध्ये आतापर्यंत पोलिसांनी 25 जणांना अटक केली असून, यांच्यावर मोक्का लावण्याचा प्रस्ताव पोलिसांनी दिला आहे. विषेश म्हणजे यामध्ये माजी उपमहापौर शमा मुल्ला यांचादेखील समावेश आहे.

एखाद्या महिला नगरसेवकाला मोक्का लावण्याचा प्रस्ताव पाठवण्याची कोल्हापुरातील ही पहिलीच घटना असेल.

कोल्हापुरात मंगळवारी पोलिसांनी राष्ट्रवादीच्या नगरसेविका शमा मुल्ला यांच्या पतीच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी छापा टाकण्यास आलेल्या प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्याशी हल्लेखोरांची झटापट झाली. ऐश्वर्या शर्मा यांच्या सुरक्षारक्षकाची रिव्हॉल्व्हरही हल्लेखोरांनी हिसकावून घेतली आणि पळ काढला. यादवनगरात काल हा थरार रंगला.

दरम्यान पोलिसांची पळवलेली पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर आणखी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

या घटनेमध्ये आतापर्यंत 25 जणांना अटक केली आहे, तर आणखी 10 ते 15 जणांचा शोध पोलीस घेत आहेत. शिवाय ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मटका किंवा अवैध व्यवसाय आढळून येतील त्याला संबंधित पोलीस निरीक्षक जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचं पोलीस अधीक्षकांनी म्हटलं आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

कोल्हापर शहरातील  ‘इंडियन ग्रुप’ येथे चालणाऱ्या मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यादरम्यान पोलिसांवरच हल्ला केल्याची घटना घडली. यात काही पोलिसांना मारहाणही करण्यात आली. सोमवारी रात्री 8 ते 9 वाजण्याच्या दरम्यान ही घटना कोल्हापूर शहरातील यादवनगर परिसरात घडली.

धक्कादायक म्हणजे, ‘इंडियन ग्रुप’ कार्यालयात चालणारा हा मटका अड्डा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका आणि कोल्हापूरच्या माजी उपमहापौर शमा मुल्ला यांच्या पतीचा आहे. सलीम मुल्ला असे राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीचं नाव आहे.

संबंधित बातम्या 

कोल्हापुरात मटका अड्ड्यावर छापा टाकणाऱ्या पोलिसांवर हल्ला  

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *