कोरोना योद्ध्याला अनोखं बर्थडे गिफ्ट, कोल्हापुरातील तरुणीला पहिल्या लशीचा मान

कोरोना योद्ध्याला अनोखं बर्थडे गिफ्ट, कोल्हापुरातील तरुणीला पहिल्या लशीचा मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देशातील कोरोना लसीकरण मोहीम सुरु झाली. (Kolhapur Lady COVID Dose )

अनिश बेंद्रे

|

Jan 16, 2021 | 11:49 AM

कोल्हापूर : कोल्हापूरच्या सेवा रुग्णालयात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थित कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. अक्षता चोरगे यांना पहिली लस देण्यात आली. विशेष म्हणजे अक्षता चोरगे यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवशी अनोखं गिफ्ट मिळाल्याने अक्षता चोरगेही उत्साहात आहेत. (Kolhapur Lady Akshata Chorge gets first COVID Dose in Vaccination Program)

“मी लस घेतली. मला काहीच त्रास झालेला नाही. लसीकरणानंतरही सोशल डिस्टन्सिंग ठेवा, मास्क वापरा आणि वारंवार हात धुवा, हे तीन नियम पाळले तर आपण कोरोनावर मात करु” असा विश्वास अक्षता चोरगे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देशातील कोरोना लसीकरण मोहीम सुरु झाली.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

– ज्याला कोरोना लशीची जास्त गरज त्याला प्राधान्याने कोरोना लस मिळणार आहे. आरोग्य कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, पोलीस यांच्या लसीकरणाचा खर्च भारत सरकार उचलणार आहे.

– तुम्हाला पहिलं लसीकरण झाल्यानंतर दुसरा डोस कधी मिळणार याची माहिती तुमच्या फोनवर दिली जाणार आहे.

– देशातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्राधान्याने कोरोना लस देण्यात येणार आहे. या कोरोना योद्धयांना देण्यात येणाऱ्या लशीचा खर्च हा केंद्र सरकार उचलणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.

– कोरोना लसीचा दुसरा डोस  घेणं गरजेचे आहे. पहिला आणि दुसरा डोस यामध्ये 1 महिन्याचं अंतर ठेवले जाईल. दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यांनंतर कोरोना विरुद्ध  प्रतिकारशक्ती तयार होईल. त्यामुळे निष्काळजीपणा दाखवू नका.

– इतिहासातील सर्वात मोठ लसीकरण अभियान आहे. जगातील सर्वात मोठ लसीकरण अभियान आहे. जगात 100 देशांची संख्या 3 कोटींपेक्षा कमी, भारत 3 कोटी लोकांना लसीकरण करणार, दुसऱ्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लसीकरण करणार आहे. (Kolhapur Lady Akshata Chorge gets first COVID Dose in Vaccination Program)

– लस घेतली म्हणजे आपण सुरक्षित आहोत, असं समजू नका. हलगर्जीपणा करु नका. मास्क घाला आणि आवश्यक शारिरक अंतर पाळा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं.

– वैज्ञानिक आणि तज्ज्ञ दोन्ही कोरोना लसीच्या गुणवत्तेबद्दल आश्वस्त झाल्यानंतर कोरोनालसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली. कोरोना लसीबाबतच्या अप्रचाराला बळी पडू नका.

संबंधित बातम्या :

जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम, पहिल्या टप्प्यात कोणत्या राज्यांना किती लस?

कोरोनाचे दोन डोस घेणं बंधनकारक, हयगय करू नका; पंतप्रधान मोदींचं कळकळीचं आवाहन

(Kolhapur Lady Akshata Chorge gets first COVID Dose in Vaccination Program)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें