माझ्या विजयात सतेज पाटलांचा मोठा वाटा : संजय मंडलिक

Lok sabha result  कोल्हापूर :  माझ्या यशामध्ये शिवसेना-भाजपसह काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचा मोठा वाटा आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक यांनी दिली. संजय मंडलिक यांना सकाळी साडेअकरापर्यंत जवळपास लाख मतांची आघाडी मिळाली होती. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. संजय मंडलिक यांनी कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांच्यावर मोठी आघाडी घेतली. मोठं …

Kolhapur Lok sabha election result Sanjay Mandlik vs Dhananjay Mahadik Sanjay mandlik first reaction, माझ्या विजयात सतेज पाटलांचा मोठा वाटा : संजय मंडलिक

Lok sabha result  कोल्हापूर :  माझ्या यशामध्ये शिवसेना-भाजपसह काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचा मोठा वाटा आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक यांनी दिली. संजय मंडलिक यांना सकाळी साडेअकरापर्यंत जवळपास लाख मतांची आघाडी मिळाली होती. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. संजय मंडलिक यांनी कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांच्यावर मोठी आघाडी घेतली.

मोठं लीड मिळाल्यानंतर संजय मंडलिक यांच्या घरासमोर जल्लोष सुरु झाला.  माझ्यावर खालच्या पातळीवर टीका झाली पण जनतेनं उत्तर दिले, असं म्हणत संजय मंडलिक यांनी धनंजय महाडिक यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

कोल्हापूर लोकसभा मतदार संघात देशातील तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 23 एप्रिल रोजी मतदान झालं. लोकसभा निवडणुकीत याठिकाणी 70.70 टक्के मतदान झालं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत फारसा फरक जाणवला नाही. कारण गेल्यावेळी याच मतदार संघात 71.04 टक्के इतकं मतदान झालं होतं. लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात लढत झाली.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनासंजय मंडलिक (शिवसेना)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीधनंजय महाडिक (राष्ट्रवादी)पराभूत
अपक्ष/इतर डॉ. अरुणा माळी (VBA)पराभूत
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *