तांबडाही खुश, पांढराही खुश, कोल्हापुरातील 'मटण'दरावर अखेर तोडगा

मटण दराच्या वादामुळे गेल्या दहा दिवसांपासून कोल्हापुरात मटण विक्रेत्यांनी बंद पुकारला होता.

Kolhapur Mutton Rate Issue, तांबडाही खुश, पांढराही खुश, कोल्हापुरातील ‘मटण’दरावर अखेर तोडगा

कोल्हापूर : गेल्या कित्येक दिवसांपासून ‘गॅसवर’ असलेल्या कोल्हापुरातील मटणदराच्या वादाला अखेर तोडग्याची ‘फोडणी’ मिळाली आहे. 520 रुपये प्रतिकिलो दराने मटण विकण्यावर अखेर एकमत (Kolhapur Mutton Rate Issue) झालं आहे. त्यामुळे मटण विक्रेतेही समाधानी झाले आहेत आणि कोल्हापुरातील खवय्यांमध्येही ‘चाबूक’ अशी भावना आहे.

मटण विक्रेते आणि कृती समितीच्या बैठकीत मटण 520 रुपये प्रतिकिलो दराने विकण्याचा निर्णय घेण्यात आला. मटण दराच्या वादामुळे गेल्या दहा दिवसांपासून कोल्हापुरात मटण विक्रेत्यांनी बंद पुकारला होता. मात्र मटणाच्या दरावर तोडगा निघाल्याने मंगळवारीही मटण विक्रीच्या दुकानांबाहेर खवय्यांच्या रांगा लागण्याची चिन्हं आहेत.

एकीकडे न परवडणारा मटणाचा दर तर दुसरीकडे अन्न आणि औषध प्रशासन तसेच महापालिकेकडून सुरु असलेली कारवाई यामुळे कोल्हापुरातील मटण विक्रेत्यांनी मटण विक्री बेमुदत बंद ठेवली होती.

कोल्हापुरात गेल्या दोन महिन्यांपासून मटणावरुन गदारोळ सुरु आहे. आधी मटणाचा दर आणि त्यानंतर दर्जा यावरुन दरवाढ कृती समिती आणि मटण विक्रेत्यांमध्ये जुंपली होती. 480 रुपये प्रतिकिलो असा तोडगा निघाल्यानंतर मटण विक्रेत्यांनी मटण विक्री सुरु केली होती. मात्र अन्न आणि औषध प्रशासन तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मटण दुकानांवर छापासत्र सुरु झाल्यामुळे हा मटणाचा तिढा वाढला होता.

कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा आणि मटण मिळेल या अपेक्षेने हॉटेलमध्ये येणाऱ्या पर्यटकांना नाईलाजाने मटणाचा ताव चिकनवर काढावा लागत होता.

कोल्हापुरात कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा आणि मटण मिळणारी 500 पेक्षा जास्त हॉटेल्स आहेत. यामध्ये दररोज सरासरी पाच ते सात हजार किलो मटणाची आवश्यकता असते. मटण दुकानापासून ते हॉटेलपर्यंत 15 ते 20 हजार कामगार मटणाशी निगडीत (Kolhapur Mutton Rate Issue) आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *