VIDEO | मंत्री-अधिकाऱ्यांना शुभेच्छा देणार नाही, पंचगंगेच्या ढासळलेल्या बुरुजात झोपून ‘क्रिएटिव्ह’ आंदोलन

गेल्या सहा महिन्यांपासून पंचगंगा घाटावरील बुरुज कोसळला आहे. मात्र लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत कोल्हापूरकर आक्रमक झाले (Kolhapur Panchgaga river protest)

VIDEO | मंत्री-अधिकाऱ्यांना शुभेच्छा देणार नाही, पंचगंगेच्या ढासळलेल्या बुरुजात झोपून 'क्रिएटिव्ह' आंदोलन
कोल्हापूरवासियांचे पंचगंगेच्या बुरुजात आंदोलन
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 11:40 AM

कोल्हापूर : कोल्हापूरवासियांसाठी पंचगंगा नदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपली पंचगंगा मरणासन्न अवस्थेत असल्याने कोल्हापूरचे रहिवासी चांगलेच आक्रमक झाले आहेत. मात्र ‘क्रिएटिव्ह’ आंदोलन करत आपला निषेध नोंदवला. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींना जबाबदार ठरवत कोल्हापूरवासियांनी गांधीगिरी केली. (Kolhapur Panchgaga river protest)

पंचगंगा घाटावरील पडलेल्या बुरुजात झोपून कोल्हापूरकरांनी अनोखे आंदोलन केले. गेल्या सहा महिन्यांपासून पंचगंगा घाटावरील बुरुज कोसळला आहे. मात्र लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत कोल्हापूरकर आक्रमक झाले. आमदार, खासदार यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार नसल्याचं होर्डिंग त्यांनी हाती धरलं.

काय आहे होर्डिंग?

“आम्ही कोल्हापूरकर आजपासून मंत्री, आमदार, खासदार, शहर लोकप्रतिनिधी, नेते, महापालिका, जिल्हा प्रशासन अधिकारी, विविध विकास समिती पदाधिकारी यांना यापुढे वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार नाही. कारण त्यांच्या दुर्लक्षामुळे आमची पंचगंगा मरणासन्न आहे” असे होर्डिंग धरुन कोल्हापूरवासियांनी आंदोलन केलं.

पंचगंगेच्या काठावर वसलेले कोल्हापूर

कोल्हापूर हे पंचगंगा नदीच्या किनारी वसलेले शहर असून तिचा उगम पश्चिम घाटामध्ये होतो. या नदीला भोगावती, कुंभी, कासारी, तुळशी आणि धामणी अशा पाच उपनद्या असून त्या शहर आणि आसपासच्या परिसरातून वाहतात. कोल्हापुरात पूर्वी फिरंगाई , वरुणतीर्थ, लक्षतीर्थ, कपिलतीर्थ, कुंभारतळे, महारतळे, पद्माळे, सिद्धाळा, रंकाळा, कोटीतीर्थ, रावणेश्वर तलाव अशी तळी होती. पण जसजसे शहर वाढू लागले तसे ती तळी बुजवून तिथे नागरी वस्ती झाली.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

पंचगंगा स्वच्छ करा आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; स्वाभिमानीचे हटके आंदोलन

(Kolhapur Panchgaga river protest)

Non Stop LIVE Update
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.