ठाण्यात कोविड रुग्णालयात ऑक्सिजन साठ्याची कमतरता; 26 पॉझिटिव्ह रुग्णांना दुसरीकडे हलवले

परंतु ठाण्यातील पार्किंग प्लाझा कोविड रुग्णालयात ऑक्सिजन साठ्याची कमतरता असल्याची माहिती समोर आलीय. covid Hospital in Thane

  • गणेश थोरात, टीव्ही 9 मराठी, ठाणे
  • Published On - 20:44 PM, 10 Apr 2021
ठाण्यात कोविड रुग्णालयात ऑक्सिजन साठ्याची कमतरता; 26 पॉझिटिव्ह रुग्णांना दुसरीकडे हलवले
covid Hospital in Thane

ठाणे: राज्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढलाय. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडूनही सर्वतोपरी उपाययोजना राबवण्यात येत आहेत. परंतु ठाण्यातील पार्किंग प्लाझा कोविड रुग्णालयात ऑक्सिजन साठ्याची कमतरता असल्याची माहिती समोर आलीय. (Lack of oxygen supply at covid Hospital in Thane; Moved 26 positive patients to another)

कोविड हेल्थ सेंटरमध्ये ऑक्सिजन साठा संपण्याची भीती

एकीकडे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना रुग्णांना ऑक्सिजन मिळणे कमी झालेय. ठाण्यातील पार्किंग प्लाझा कोविड हेल्थ सेंटरमध्ये ऑक्सिजन साठा संपण्याची भीती वाटू लागल्याने अचानक 26 रुग्णांना ग्लोबल कोविड सेंटर म्हणजेच दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्याची वेळ महापालिकेवर आली होती. एकूणच ऑक्सिजनचा साठा कमी होणार असल्याचे लक्षात येताच रुग्णालयातील डॉक्टर आणि पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांची धावपळ उडाली होती. अचानक ही बाब समजल्याने मोठा अनर्थ टळला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ऑक्सिजन साठ्याचा पुरवठा उशिरा होणार असल्याचे डॉक्टरांची तारांबळ

ठाणे महापलिकेने कोविड रुग्णांना उपचारासाठी बाळकुम येथील ग्लोबल कोविड सेंटर आणि पूर्व द्रुतगती मार्गावर पार्किंग प्लाझा सेंटरची उभारणी केली. अद्ययावत अशा या रुग्णालयात हजारो कोविड रुग्ण उपचार घेत असून, शनिवारी संध्याकाळी ऑक्सिजनचा साठ्याचा पुरवठा उशिरा होणार असल्याचे डॉक्टरांना समजल्यानंतर महापालिकेची धावपळ सुरू झाली. दरम्यान उपचार घेत असलेल्या रुग्णांना तातडीने दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आले. यावेळी 10 ते 12 रुग्णवाहिका तातडीने बोलावून या रुग्णांना हलवण्यात आल्याची माहिती पालिका अधिकारी यांनी दिली.

ठाण्यात कोविड रुग्णालयात ऑक्सिजनची आवश्यकता मोठी

ठाण्यात कोविड रुग्णालयात ऑक्सिजनची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर भासतेय. हा ऑक्सिजन पुरवठा तळोजा येथून करण्यात येतो. मात्र तळोजा येथे काही तांत्रिक बिघाड झाल्याने ठाण्याच्या कोविड सेंटरमध्ये 1 किंवा 2 तास उशिरा साठा येणार असल्याने रुग्णांच्या उपचारासाठी कुठेही बाधा येऊ नये, यासाठी रुग्णांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात आले असल्याचे यावेळी अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

CM Uddhav Thackeray : ..तर उद्या आपोआपच लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवेल, मुख्यमंत्र्यांचे 14 महत्त्वाचे मुद्दे

तुम्हाला इंजेक्शन हवंय, बेड हवाय, काहीही गरज असेल तर या नंबरवर फोन करा !

Lack of oxygen supply at covid Hospital in Thane; Moved 26 positive patients to another