कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या लोटेतील जमिनीचा 1 डिसेंबरला लिलाव

त्यानंतर 1 डिसेंबरला त्या जमिनीचा लिलाव होणार आहे. (Land auction Dawood Ibrahim )

  • मनोज लेले, टीव्ही 9 मराठी, रत्नागिरी
  • Published On - 9:49 AM, 24 Nov 2020

रत्नागिरी: कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या लोटे इथल्या जागेची आज स्मगलिंग आणि फॉरेन एक्सचेंज मॅनिप्युलेट आणि केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी होणार आहे. त्यानंतर 1 डिसेंबरला त्या जमिनीचा लिलाव केला जाणार आहे. (Land Auction In Lotte Of The Dawood Ibrahim On 1st December)

10 नोव्हेंबरच्या लिलाव प्रक्रियेत दाऊदच्या सात पैकी सहा जागांचा लिलाव झाला होता. लोटेतील मालमत्तेचा लिलाव मागे घेण्यात आला होता. मागे घेण्यात आलेल्या जागेचा आता 1 डिसेंबर रोजी लिलाव होणार आहे. लिलावात मालमत्तेची खरेदी केलेले सुप्रीम कोर्टाचे वकील भुपेंद्रकुमार भारद्वाजसुद्धा या जागेची पाहणी करणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आता मालमत्तेचा लिलाव केला जाणार आहे.

तत्पूर्वी दिल्लीच्या दोन वकिलांनी दाऊदच्या सहा मालमत्ता घेतल्या. यामधून सरकारला 22 लाख 79 हजार 600 रुपये मिळाले आहेत. वकील अजय श्रीवास्तव यांनी दाऊदच्या दोन मालमत्ता तर वकील भूपेंद्र भारद्वाज यांनी सहा मालमत्ता घेतल्या आहेत.  तर दाऊदची रत्नागिरीतील हवेली अवघ्या 11 लाख 20 हजार रुपयांना विकण्यात आली आहे. सेफमा अर्थात स्मगलर्स अँड फॉरेन एक्सचेंज मॅनिपुलेटर्स एजन्सीकडून हा लिलाव झाला.

नरिमन पॉईंट येथील सफेमा कार्यालयात दाऊदच्या रत्नागिरीतील प्रॉपर्टीचा लिलाव झाला. एकूण 17 प्रॉपर्टीचा लिलाव यावेळी झाला. त्यापैकी 6 प्रॉपर्टी दाऊदच्या होत्या. तर एक प्रॉपर्टी इक्बाल मिरचीची आहे.

दाऊदची मालमत्ता

1) सर्व्हे नंबर 151 वरील 27 गुंठे
2) सर्व्ह नंबर 152 वरील 29.30 गुंठे
3) सर्व्हे नंबर 152 वरील 24.90 गुंठे
4) सर्व्ह नंबर 150 वरील 20 गुंठे
5) सर्व्ह नंबर 155 वरील 18 गुंठे
6) सर्व्हे नंबर 181 वरील 27 गुंठे आणि हवेली

दाऊदच्या 4,5,7 आणि 8 क्रमांकाची मालमत्ता भूपेंद्र भारद्वाज यांनी विकत घेतल्या. तर 6 आणि 9 क्रमांकाची संपत्ती अजय श्रीवास्तव यांनी-घेतली. तर दाऊदच्या 10 क्रमांकाच्या प्रॉपर्टीला परत घेण्यात आलं आहे.

इकबाल मिरचीची प्रॉपर्टी यंदाही लिलावात गेली नाही. लिलावात बोली लावणाऱ्यांच्या मते त्याच्या प्रॉपर्टीची किंमत जास्त लावण्यात आली आहे.

तीन पातळीवर लिलाव 

  • टेंडरद्वारे
  • ई-टेंडरद्वारे
  • ई-ऑक्शनद्वारे

लिलावात मुंबके गावातील (Mumbake Village Khed) स्थानिक शेतकरी सहभागी होणार नाहीत. स्थानिक इच्छुक बोली लावणारे मुंबईत जाणार नाहीत, अशी माहिती माजी सरपंच अकबर दुदुके यांनी दिली. Land Auction In Lotte Of The Dawood Ibrahim On 1st December

ACTच्या अधिकाऱ्यांनी सोमवारपासूनच सर्व प्रॉपर्टी दाखवायला सुरुवात केली होती. मुंबईमधील दाऊदच्या जवळपास सर्व प्रॉप्रटींचा लिलाव केल्यानंतर आता त्याच्या रत्नागिरीतील जमीन आणि घराचाही लिलाव होणार आहे. ही सर्व प्रोपर्टी महाराष्ट्रच्या रत्नागिरी खेड जिल्ह्यात आहे.

सेफमाचे संबंधित अधिकारी सय्यद मुनाफच्या माहिती प्रमाणे, “दाऊदच्या एकूण 17 प्रॉपर्टी शिल्लक आहे. कोरोनामुळे फक्त ई-ऑक्शन आणि टेंडर मार्फत लिलाव होणार आहे.

दाऊदच्या मालमत्तेच्या रकमा निश्चित

इब्राहिम दाऊदचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबके आहे. दाऊदचे बालपण या गावात गेले. पण आता मोस्टवाँटेड डॉन म्हणूनही दाऊदचं नाव जगजाहीर करण्यात आलं आहे.

केंद्रीय वित्त मंत्रालयाने रत्नागिरी जिल्ह्यातील दाऊदच्या मालमत्तेच्या लिलावाच्या रकमा निश्चित केल्या आहेत. यात दाऊदच्या मूळ गाव असलेल्या मुंबके गावातील मालमत्तेची रक्कम 14 लाख 45 हजार रुपये, तर लोटे येथील आंब्याच्या बागेची किंमत 61 लाख 48 हजार निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, दाऊदची मालमत्ता खरेदीसाठी मुंबके गावातील गावकरीच सरसावले आहेत.

दाऊदच्या मुंबकेमधील मालमत्तेचा दोन वेळा लिलाव जाहीर झाला होता, परंतु खरेदीसाठी कोणीही पुढे आले नव्हते.

मुंबके गावातील दाऊदची प्रॉपर्टी

मुंबके गावातील प्रॉपर्टी दाऊदची आई अमिना कासकर यांच्या नावावर आहे. आई आणि वडील दोघेही हयात नाहीत. 1993च्या मुंबई बॉम्ब स्फोटानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम फरार झाला. दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील प्रॉपर्टीचा लिलाव यापूर्वीच झाला आहे. आता कोकणातील प्रॉपर्टीचा लिलाव केला जाणार आहे. कोकणातील दाऊदच्या वडिलोपार्जित मालमत्ता दाऊदचे काका कसत आहेत.

Land Auction In Lotte Of The Dawood Ibrahim On 1st December

संबंधित बातम्या

दाऊदची रत्नागिरीतील हवेली 11 लाखांत विकली; दिल्लीतील दोन वकिलांनी सहा मालमत्ता घेतल्या

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कोकणातील मालमत्तेचा लिलाव, खेडमधील सात शेतकरी खरेदीसाठी उत्सुक