आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत निवडणूक; ग्रामस्थांचा निर्णय काय?

शासनाने तात्काळ ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये करावे अन्यथा...

  • रवी लवेकर, टीव्ही 9 मराठी, पंढरपूर
  • Published On - 18:16 PM, 28 Dec 2020
आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत निवडणूक; ग्रामस्थांचा निर्णय काय?

पंढरपूरः आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीचा (Akluj GramPanchayat) नगरपालिकेमध्ये रूपांतर होण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. त्यातच येथील ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झालीय. सोबतच नातेपुते महाळुंग श्रीपूर ग्रामपंचायतीचा नगरपंचायत होण्याचा प्रस्ताव अशाच पद्धतीने अंतिम टप्प्यात रखडलेला आहे. शासनाने तात्काळ ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये करावे अन्यथा निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकू, असा इशारा अकलूज येथील ग्रामस्थांनी दिलाय. (Largest GramPanchayat Elections In Asia; What Is The Decision Of The Villagers?)

आज अकलूज येथे व्यापारी तसेच ग्रामस्थांची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. माळशिरस तालुक्यातील अकलूज नातेपुते तसेच महाळुंग श्रीपूर माळीनगर येथील वाढती लोकसंख्या पाहता सध्या अस्तित्वात असणाऱ्या ग्रामपंचायती ग्रामस्थांना नागरी सुविधा देण्यास अपुर्‍या पडत असल्याने येथील ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये करावे, असा प्रस्ताव शासन स्तरावर दाखल केला होता. सप्टेंबर 2019 मध्ये त्या पद्धतीचा आदेश आधीसुद्धा शासन स्तरावर काढण्यात आलेला आहे.

सध्या या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये होण्याचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे, असे असतानाच राज्य सरकारकडून निवडणूक आयोगाला या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांबाबत विनंतीपत्र दिलेलं होतं. कोणताही विचार न करता प्रक्रिया सुरू झालेली आहे. दोन दोन वेळा निवडणुकांना सामोरं जाणं उमेदवारांना आणि मतदारांना प्रशासनाला अवघड जाईल. यामुळे या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करूनच येथील निवडणूक प्रक्रिया पार पाडावी अन्यथा ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकू, असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय.

नवा जीआर जारी, ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी ‘ही’ अट लागू

निवडणूक आयोगाने नुकतंच राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा (Gram Panchayat election qualification) कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी अर्ज भरण्यासही सुरुवात झालीय. मात्र सरपंच आरक्षण (Sarpanch reservation) सोडतीपासून ते अर्ज भरण्यापर्यंत गोंधळ सुरू असल्याचं दिसतंय. त्यातच नव्या जीआरमुळे गोंधळ आणि वाद वाढण्याची चिन्हं आहेत. कारण सदस्यांपासून ते सरपंचपदापर्यंत किमान सातवी पास ही अट ठेवण्यात आलीय. जो उमेदवार 1995 नंतर जन्मलेला असेल, आणि ज्याला सदस्य किंवा सरपंच म्हणून नियुक्त करायचं असेल तर संबंधित उमेदवार सातवी पास असणे आवश्यक आहे. 24 डिसेंबरला हा जीआर जारी करण्यात आलाय.

संबंधित बातम्या

ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजलं, अर्ज भरण्यास सुरुवात, यंदा महत्त्वाचे दोन बदल कोणते?

ग्रामपंचायत निवडणूक लढवायची आहे? मग तुम्हाला ‘या’ अर्जाची पोचपावती गरजेची

Largest GramPanchayat Elections In Asia; What Is The Decision Of The Villagers?