Video | आशियातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत अंधश्रद्धेचा कळस, लाल कापडाने बांधलेले मडके ठेवताना CCTV मध्ये कैद

लासलगाव येथे एकविसाव्या शतकात आज अंधश्रद्धेचा कळस पाहायला मिळाला आहे. Lasalgaon APMC Superstition incident

Video | आशियातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत अंधश्रद्धेचा कळस, लाल कापडाने बांधलेले मडके ठेवताना CCTV मध्ये कैद
लासलगावमध्ये अंधश्रद्धेचा प्रकार


नाशिक: आशिया खंडातील कांद्याची प्रसिद्ध असलेली बाजारपेठ लासलगाव येथे एकविसाव्या शतकात आज अंधश्रद्धेचा कळस पाहायला मिळाला आहे. होळी पौर्णिमा असल्याने लासलगाव शहरातील मेनरोड वरील कोटमगाव त्रिफुलीवर लाल कापडाने बांधलेले मडके ठेवण्यात आल्याने वाहन धारकांमध्ये खळबळ उडाली आहे. हा संपूर्ण प्रकार तेथे जवळ असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. (Lasalgaon APMC Superstition incident captured in CCTV at Holi Night)

लुंगी घातलेला व्यक्ती आणि मोठ्या संख्येने कुत्रे रस्त्यावर

अमावस्या, पौर्णिमा किंवा सूर्य-चंद्र ग्राहणाच्या मध्यरात्रीच्या सुमारास भूत, भानामती, बुवाबाजी, जादूटोणा, मंत्रतंत्र, श्रद्धा प्रक्रिया अशा अंधश्रद्धा पसरवणाऱ्या घटना घडत असतात. अशीच एख घटना कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगाव येथील कोटमगाव त्रिफुलीवर घडली आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोटरसायकल वरून अज्ञात दोघे जण आले पाठीमागे बसलेला लुंगी घातलेला व्यक्ती लाल कापड बांधलेले मडके घेऊन खाली उतरतो. यावेळी मोठ्या संख्येने या रस्त्यावर कुत्रे होते या कुत्र्यांना पळवून लावत हा अज्ञात इसम मडके ठेवून दुसऱ्या सहकारीच्या मदतीने मोटरसायकल वर बसत पळ काढतो.

मडके बराच वेळ रस्त्यावर

सकाळी अनेक वाहनधारक या मडक्याला चुकवत रस्ता काढतात आणि या मक्याकडे आश्चर्याने आपल्या नजरा लावून पाहत मार्गस्थ होतात. मात्र, कोणीही हे लाल कापडाने बांधलेलं मडके अंधश्रद्धेपोटी रस्त्याच्या बाजूला करत नाही. अशा वेळी पोलिसांना माहिती मिळते आणि लासलगाव पोलीस स्टेशनचे दोन कर्मचारी त्या ठिकाणी दाखल होतात. मडके उचलून घेऊन जाण्याच्या तयारीत असताना अंनिसचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचत पोलिसांकडून त्या मडक्यात काय आहे यात पाहणी करतात. तर त्यामध्ये काही मिरच्या आणि मीठ असल्याचे समोर आले. हा संपूर्ण प्रकार अंधश्रद्धा पसरवणारा असून याची पोलिसांनी गंभीर दखल घेत कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत अंनिसचे कार्यकर्ते राजेंद्र कराड यांनी माडंले.

सर्वप्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद

रविवारी होळी पौर्णिमा एकत्र असल्याने अज्ञात दोन व्यक्तींनी कोटमगाव रोडच्या दिशेने येत एक लाल कापड बांधलेले मडके रस्त्याच्या मधोमध ठेवून पळ काढला. हा संपूर्ण प्रकार तेथे असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत लासलगाव पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने या अज्ञात व्यक्तींचा शोध सुरु केला आहे. असून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहूल वाघ यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

आशिया खंडातील अग्रेसर लासलगाव बाजार समिती तब्बल 7 दिवस बंद, कोट्यवधींची उलाढाल ठप्प, शेतकरी चिंतेत

मोहरीचे विक्रमी उत्पादन होऊनही खाद्यतेल महागच, आणखी वाढ होण्याची शक्यता

(Lasalgaon APMC Superstition incident captured in CCTV at Holi Night)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI