लासलगाव जळीतकांड : मुख्य आरोपीसह पेट्रोलपंप मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा

लासलगाव जळीतकांड प्रकरणी मुख्य आरोपी रामेश्वर उर्फ बाला मधुकर भागवतसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Lasalgaon lady burn case).

लासलगाव जळीतकांड : मुख्य आरोपीसह पेट्रोलपंप मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा
Follow us
| Updated on: Feb 17, 2020 | 7:29 AM

नाशिक : लासलगाव जळीतकांड प्रकरणी मुख्य आरोपी रामेश्वर उर्फ बाला मधुकर भागवतसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Lasalgaon lady burn case). यामध्ये पेट्रोलपंपाचा मॅनेजर आणि पेट्रोल देणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी (15 फेब्रुवारी) रात्री जिल्हा रुग्णालयात जाऊन पीडितेची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांनी भेट घेतल्याने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आणि या घटनेचा छडा लावण्यासाठी कामाला लागली. पोलिसांनी संशयित दत्तू जाधव आणि निलेश केंदळे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. मुख्य आरोपी रामेश्वर उर्फ बाला मधुकर भागवत हा फरार होता. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने येवला येथून रविवारी सकाळी रामेश्वर भागवत याला अटक केली.

बाटलीत पेट्रोल देणे हा अपराध

लासलगाव येथील गुंजाळ पेट्रोलपंप हा सध्या येवला येथील शिवसेना नेत्याच्या भावाने भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी घेतला आहे (Lasalgaon lady burn case). बाटलीमध्ये पेट्रोल दिल्याने पेट्रोलपंपाचे मॅनेजर आणि कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लहान मुलांची काय चूक?

या प्रकरणात पीडिता 67 टक्के भाजली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. पीडितेच्या पतीचं याआधीच निधन झालं आहे. पीडितेला तीन लहान मुलं आहेत. त्या लहान मुलांची या घटनेत काय चूक? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काय आहे प्रकरण?

नाशिक जिल्ह्यातील लासलगावच्या पिंपळगावानजीक तीन मुलांसह पीडित महिला राहत होती. दोन वर्षांपूर्वी पहिल्या पतीचे निधन झाल्यानंतर घराजवळच राहत असलेल्या रामेश्वर उर्फ बाला मधुकर भागवत याच्याशी पीडितेचे प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. दोघांनी मित्राच्या साक्षीने लासलगाव तालुक्यातील विंचूर गावाजवळील लोणचे देवीच्या मंदिरात लग्न केले.

या लग्नानंतर रामेश्वरचा त्याच्या मामाच्या मुलीशी साखरपुडा झाल्याची माहिती या पीडित महिलेला मिळाली. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद सुरु झाले. हे लग्न कथित पती आणि विधवेच्या घरच्यांना मान्य नसल्याने याविषयी बोलण्यासाठी दोघांची भेट लासलगाव येथील बस स्थानकावर झाली. आरोपीला भेटण्याअगोदर पीडित महिलेने आपल्या दुचाकीत आणि पन्नास रुपयांचे बाटलीत पेट्रोल भरले होते. ती बाटली पीडितेने गाडीच्या डिक्कीत ठेवली.

यानंतर पीडित महिला लासलगाव बस स्थानकावर पोहोचली. तिथे आरोपी रामेश्वर आणि त्याचा मामा उभेच होते. पीडित महिला आणि रामेश्वर यांच्यात चर्चा झाली. या चर्चेदरम्यान दोघांमध्ये वाद झाला आणि पीडित महिला गाडीजवळ गेली. तिने गाडीच्या डिक्कीतून पेट्रोलने भरलेली बाटली काढली आणि आपल्या अंगावर पेट्रोल टाकू लागली. यावेळी रामेश्वर पीडितेच्या हातून पेट्रोलची बाटली खेचू लागला आणि ‘तू कशाला मरतेस? मीच मरतो’, असं म्हणाला. या झटापटीत बाटलीतील पेट्रोल दोघांच्या अंगावर पडले.

रामेश्वरला सिगारेट पिण्याची सवय असल्याने त्याच्या खिशात माचिस होती. त्याने या माचिसच्या बॉक्समधून काडी काढून पेटवली आणि “मी आता मलाच पेटून घेतो”, असे रामेश्वर बोलताच पीडित महिलेने त्याच्या हातातील पेटती काडी ओढण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत पीडित महिलेच्या अंगावर पेटती काडी पडली. यात ही पीडित महिला 67% भाजली.

पीडित महिला पेटत असताना आरडाओरड करु लागली. पीडितेचा आवाज ऐकताच बस स्थानकावरील प्रवाशांनी धाव घेतला. त्यांनी पीडित महिलेला लागलेली आग विझवली. या घटनेमुळे रामेश्वर आणि त्याचा मामा तिथून पळून गेला. या घटनेची माहिती लासलगाव पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडित महिलेला उपचारासाठी लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला नाशिक येथील पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. या घटनेत पीडित महिला 67 टक्के भाजल्याने तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला मुंबई येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.