ऐन लग्नघरात धाकधूक, लातुरात दोनशे वऱ्हाडींना जेवणातून विषबाधा

लग्नातील जेवणानंतर मळमळ, चक्कर यासारखी लक्षणं अनेकांना जाणवली. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.(Latur Wedding Guests Food Poison)

ऐन लग्नघरात धाकधूक, लातुरात दोनशे वऱ्हाडींना जेवणातून विषबाधा
अनिश बेंद्रे

|

Jan 25, 2021 | 7:44 AM

लातूर : विवाह सोहळ्यात जेवण केल्यानंतर 200 जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लातूरमध्ये वऱ्हाडींवर उपचार सुरु असून कोणाचीही प्रकृती गंभीर नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. मात्र ऐन लग्नघरात धाकधूक लहान मुलांसह दोनशे जणांची प्रकृती बिघडल्यामुळे धाकधूक वाढली. (Latur 200 Wedding Guests Food Poison)

लग्नातील जेवणानंतर वऱ्हाडींची प्रकृती बिघडली

लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात वाढवणामध्ये ही घटना घडली. इसाक हवालदार यांच्या मुलीचे लग्न होते. लग्न सोहळ्यात जेवण केल्यानंतर अनेक जणांना त्रास सुरु झाला. मळमळ, चक्कर यासारखी लक्षणं जाणवल्याने जेवणानंतर अनेकांना त्रास सुरु झाला. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

दोनशे जणांना विषबाधेमुळे लग्नघरात धाकधूक

वऱ्हाडींना लातूरमधील वाढवणा, जळकोट आणि उदगीर भागातील दवाखान्यात भरती करण्यात आले. वऱ्हाडी रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. सुदैवाने कोणाचीही प्रकृती गंभीर नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला. मात्र एकाच वेळी दोनशे जणांची प्रकृती बिघडल्यामुळे लग्नघरात धाकधूक वाढली होती.

अहमदनगरात नववर्षाच्या सुरुवातीला लग्नाचं जेवण बाधलं

नववर्षाच्या सुरुवातीलाच अहमदनगरमधील राहुरी तालुक्यातील लग्न‌ समारंभात 100 हून अधिक वऱ्हाडी मंडळींना विषबाधा झाली होती.  टाकळीमिया येथील काळे आणि कोल्हार ‌येथील कडसकर कुटुंबातील वधू-वराचा विवाह 3 जानेवारीला झाला. या विवाह सोहळ्यात जेवणानंतर काही वेळातच अनेकांना उलट्या आणि मळमळीचा त्रास जाणवू लागला. यानंतर लग्न सभारंभातील वऱ्हाड्यांनी आसपासच्या रुग्णालयात फोन केला.

विषबाधा झालेल्या सर्व वऱ्हाड्यांवर राहुरी कारखाना येथील विवेकानंद नर्सिंग होम , लोणी येथील प्रवरा हॉस्पिटल , राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. विषबाधा झालेल्या वऱ्हाडींमध्ये लहान मुलांचाही समावेश होता.

चंद्रज्योतीच्या बियांमुळे अमरावतीत विद्यार्थ्यांना विषबाधा

काजू समजून चंद्रज्योती या फळाच्या बिया खाल्ल्यामुळे 18 मुलांची प्रकृती बिघडल्याचा प्रकार सात जानेवारीला घडला होता. खेळत असताना मुलांना चंद्रज्योतीच्या झाडाखाली बिया दिसल्या. काजू समजून मुलांनी त्या बिया खाल्ल्या. मात्र काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. मुलांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरु झाला. (Latur 200 Wedding Guests Food Poison)

मुलांची प्रकृती खालावल्याने पालकांनी त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. डॉक्टरांनी त्यांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात हलवलं. सुदैवाने मुलांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.

संबंधित बातम्या :

लग्न बाधलं, 100 जणांना जेवणातून विषबाधा; शिर्डीतील धक्कादायक घटना

काजू समजून चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्या, 18 चिमुरड्यांना विषबाधा

(Latur 200 Wedding Guests Food Poison)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें