लेकाच्या निधनाचा धक्का, हंबरडा फोडून माऊलीनेही प्राण सोडले

लातुरातील गोविंद चांदीवाले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. लेकाने डोळे मिटल्याच्या धक्क्यातून 87 वर्षीय मातोश्रींनीही अखेरचा श्वास घेतला

लेकाच्या निधनाचा धक्का, हंबरडा फोडून माऊलीनेही प्राण सोडले

लातूर : मुलाच्या निधनाचा धक्का बसलेल्या वृद्ध मातेनेही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना लातुरात समोर आली आहे. मुलाचा मृतदेह पाहून हंबरडा फोडलेल्या माऊलीनेही प्राण सोडले. मायलेकाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latur Mother dies of shock after Son breathes last)

लातूर जिल्ह्यात कर्नाटक सीमावर्ती भागात असलेल्या लखनगावात घडलेल्या या घटनेमुळे सर्वांनाच चटका बसला आहे. भालकी तालुक्यातल्या लखनगावमध्ये 60 वर्षीय गोविंद चांदीवाले राहत होते. ते औराद-शहाजनी इथे शिक्षक होते.

गोविंद चांदीवाले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. रुग्णालयातून त्यांचा मृतदेह घरी आणण्यात आला. गोविंद यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबच शोकसागरात बुडाले होते. लेकाने डोळे मिटल्याच्या धक्क्यातून 87 वर्षीय मातोश्री सावरु शकल्या नाहीत.

अनुसया चांदीवाले यांना आपल्या मुलाच्या मृत्यूचे दुःख सहन करता आले नाही. सर्वांसमोरच त्यांनी एकच हंबरडा फोडला आणि त्या गतप्राण झाल्या. अत्यंत शोकाकुल वातावरणात माय-लेकावर एकत्रच अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोरोनाग्रस्त तरुणीला भावाची मारहाण

कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घ्यायला आलेल्या तरुणीला तिच्या भावानेच मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. लातूरच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात यासंबंधी तक्रार देण्यात आली आहे. आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून भावाने मारहाण केल्याचा आरोप आहे. (Latur Mother dies of shock after Son breathes last)

तक्रारदार तरुणीने आंतरजातीय विवाह केला होता. आई कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मुलीलाही कोरोनाची लागण झाल्याचे समजले. दोघींना कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तिथे तिने रजिस्टर मॅरेज केलेला तिचा पतीही तिला सोडायला आला होता. त्याच वेळी तिचा भाऊही पोहोचला. आंतरजातीय विवाह केल्याने चिडलेल्या तिच्या भावाने या तरुणीला मारहाण केली. तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

इथे ओशाळला मृत्यू, ‘कोरोना’च्या संशयातून शेजाऱ्यांनी मदत नाकारली, हार्ट अटॅक आलेल्या वृद्धाने प्राण सोडले

नाशिकमध्ये इंडिगो कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात, मायलेकाचा मृत्यू

(Latur Mother dies of shock after Son breathes last)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *