स्वतःच्या वडिलाला सोडून नवा वडील शोधला, मुलीच्या बंडखोरीवर अत्राम यांची पहिली प्रतिक्रिया

विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी अजित पवार गटाला मोठा दणका दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीवेळी अजित पवारांना साथ देणारे महायुती सरकारचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांच्या घरात बंडखोरी करून थोरल्या पवारांनी बरोबरी करण्याचा प्रयत्न केला आहे.

स्वतःच्या वडिलाला सोडून नवा वडील शोधला, मुलीच्या बंडखोरीवर अत्राम यांची पहिली प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Sep 12, 2024 | 8:25 PM

विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी अजित पवार गटाला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीच्या वेळी अजित पवारांसोबत असलेले सरकारधील अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांच्या घरात बंडखोरी झाली आहे. अत्राम यांची मुलगी भाग्यश्री यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांनी वडिलांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर अत्राम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘अत्राम म्हणाले की, ‘मुलगी राष्ट्रवादी प्रवेश करतेय चांगलं आहे, नवीन पार्टी, नवीन काम हातामध्ये घेतले. अपेक्षा करू काहीतरी चांगलं घडेल. नेमकं त्या काय बोलल्या ते ऐकलं नाही. नवदुर्गा माझ्या घरामध्ये बसले आहेत, एक माणूस देवी बनू शकत नाही, त्या दृष्टिकोनातून ठीक आहे जे बोलले ते पाहू पुढे. माझ्या विरोधामध्ये जिंकून आल्या पाहिजे हीच अपेक्षा आहे. कोणाला नमन केलं ते मी पाहिलं नाही, ऐकलं नाही मात्र ते वेगळ्या पक्षात आहेत, त्यांना पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा. त्यांच्यावर पूर्ण आशीर्वाद आहे. त्यांचे मागे काय आहे काय नाही हे मी सांगू शकत नाही, त्यांची भाषा सुधारली पाहिजे. त्या राजकारणात नवीन आहेत. जे आता त्यांनी बोलले, ते आवेशातून बोलले असतील ती वेगळी गोष्ट आहे.’

‘लोकसभेत त्या फिरल्या नाही. लोकसभा मी फिरलो विधानसभा मीच फिरलो. सगळं काम चांगले मीच केलंय, आता स्थानिक लोक दोन महिन्यात निर्णय देतील. नवीन पिढीत स्फूर्ती असते, काहीतरी करायचं असतंं परंतु आपण बोलत असताना सगळ्यांच्या मर्यादा ठेवून बोललं पाहिजे, ते मी काही शिकवू शकलो नाही. माझ्यात काहीतरी चूक आहे आणि जे मागे मी बोललो आमच्याकडे पद्धत असते वरिष्ठांनी बोलल्यानंतर सगळ्यांनी थांबलं पाहिजे. आता नवीन लोक त्यांच्यासोबत जुळले आहेत आणि नवीन पक्षात त्या गेलेल्या आहेत अपेक्षा करून काहीतरी चांगलं होईल.’

‘नवीन वडील शोधला असेल ठीक आहे. आपल्या स्वतःच्या वडिलाला सोडून नवा शोधला असेल, बघू काय करतात ते. पन्नास वर्षे लोकांकरिता काम केले आहे. त्यांनी उत्तर दिलं आहे. घर फुटले तर बघू काय पुढे आहे कोणी घर फोडले. मी तर सांगत होतो साहेबांनी अशा प्रकार करू नये, आता जे झालं ते घडलं आता घोडा मैदान समोर आहे. मला पन्नास वर्षे झाले. त्यांना आठ वर्षे झाले. त्यांना अजून खूप शिकायचं आहे. त्यांनी गडचिरोली सांभाळलं तर मी कुठे होतो भारतातच होतो.’

'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द.
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन.
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?.
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी...
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी....
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या....
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर.
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?.
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?.
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज.