VIDEO: नाशिकमध्ये बिबट्याला पकडण्याचा लाईव्ह थरार

नाशिक: नाशिकच्या सावरकरनगरमध्ये आज सकाळी बिबट्यानं चांगलाच धुमाकूळ घातला. भरदिवसा रहिवासी वस्तीत बिबट्या शिरल्यानं एकच गोंधळ उडाला. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग, पोलिस आणि स्थानिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सैरावैरा पळत सुटलेल्या बिबट्यानं तिघांवर हल्ला केला. या हल्ल्यात नगरसेवक संतोष गायकवाड यांच्यासह तिघे जखमी झाले आहेत. अखेर शर्थीच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे. बिबट्याला संरक्षक …

VIDEO: नाशिकमध्ये बिबट्याला पकडण्याचा लाईव्ह थरार

नाशिक: नाशिकच्या सावरकरनगरमध्ये आज सकाळी बिबट्यानं चांगलाच धुमाकूळ घातला. भरदिवसा रहिवासी वस्तीत बिबट्या शिरल्यानं एकच गोंधळ उडाला. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग, पोलिस आणि स्थानिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

सैरावैरा पळत सुटलेल्या बिबट्यानं तिघांवर हल्ला केला. या हल्ल्यात नगरसेवक संतोष गायकवाड यांच्यासह तिघे जखमी झाले आहेत. अखेर शर्थीच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे.

बिबट्याला संरक्षक जाळ्यात पकडण्यात आलं. या सर्व थराराचा व्हिडीओ टीव्ही 9 मराठीच्या हाती लागला आहे. बिबट्या धावत येतो आणि वनविभागाचे कर्मचारी त्याला जाळ्यात पकडतात. बिबट्या थेट जाळ्यावर उडी घेतो, असा सर्व थरार या व्हिडीओत कैद झाला आहे.

बिबट्याच्या या हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत.

VIDEO:

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *