नाशिकमध्ये पोल्ट्री फार्ममध्ये घुसून बिबट्याचा धुमाकूळ

नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी येथील पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्या घुसल्याची घटना घडली. बिबट्याने पोल्ट्री फार्ममध्ये घुसून अक्षरशः धुमाकूळ घातला. मात्र, वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने घटनास्थळी दाखल होत अखेर बिबट्याला जेरबंद केल्याने मोठा अनर्थ टळला. संजय गुळवे यांच्या बेलगाव कुऱ्हे भागातील पोल्ट्री फार्ममध्ये हा प्रकार घडला. तब्बल काही तास बिबट्याचा पोल्ट्री फार्ममध्ये धुमाकूळ सुरु होता. यानंतर वन विभागाचे …

नाशिकमध्ये पोल्ट्री फार्ममध्ये घुसून बिबट्याचा धुमाकूळ

नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी येथील पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्या घुसल्याची घटना घडली. बिबट्याने पोल्ट्री फार्ममध्ये घुसून अक्षरशः धुमाकूळ घातला. मात्र, वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने घटनास्थळी दाखल होत अखेर बिबट्याला जेरबंद केल्याने मोठा अनर्थ टळला.

संजय गुळवे यांच्या बेलगाव कुऱ्हे भागातील पोल्ट्री फार्ममध्ये हा प्रकार घडला. तब्बल काही तास बिबट्याचा पोल्ट्री फार्ममध्ये धुमाकूळ सुरु होता. यानंतर वन विभागाचे वन परिमंडल अधिकारी देशपांडे व वाडीवऱ्हे पोलीस पथकही घटनास्थळी दाखल झाले. नाशिकहून वनविभागाचे रेस्क्यू पथक आल्याने बिबट्याला पकडण्यास अखेर यश आले. त्यानंतर परिसरातील स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

जंगली प्राण्यांच्या अधिवासावरील अतिक्रमणामुळे प्राण्यांचा मानवी वस्तीत शिरकाव करण्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. अशात आता अन्नाच्या शोधात असलेल्या बिबट्याने थेट पोल्ट्री फार्मलाच आपले लक्ष्य बनवल्याने याची चांगलीच चर्चाही होत आहे.

व्हिडीओ पाहा:

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *