संतापजनक! ठेकेदाराची कुचराई, भंडाऱ्यात चक्क मृतदेहावर कुत्र्यांची झुंबड

कुत्रे हे मांस घेऊन गावात जात असल्यानं भंडाऱ्यातील या स्मशानभूमीच्या आजूबाजूच्या गावात भीतिदायक वातावरण पसरलंय.

  • अनिल आक्रे, टीव्ही 9 मराठी, भंडारा
  • Published On - 23:10 PM, 11 Apr 2021
संतापजनक! ठेकेदाराची कुचराई, भंडाऱ्यात चक्क मृतदेहावर कुत्र्यांची झुंबड

भंडाराः राज्यात कोरोनानं अक्षरशः थैमान घातलेलं असून, भंडाऱ्यातही कोरोनाचा मोठा फैलाव झालाय. कोरोनामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्यांच्या लोकांचा मृतदेह जाळण्यासाठी सरणावर लाकडे कमी पडत आहेत. त्यामुळे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेहांचे लचके कुत्रे तोडत आहे. कुत्रे हे मांस घेऊन गावात जात असल्यानं भंडाऱ्यातील या स्मशानभूमीच्या आजूबाजूच्या गावात भीतिदायक वातावरण पसरलंय. स्मशानभूमी इतरत्र हलविण्याची मागणी भिलेवाडा गावकऱ्यांनी केलीय. (limbs of the half-burnt corpses are being broken by the dogs in bhandara)

मृतदेह जाळण्यासाठी सरणावर लाकडांचा तुटवडा

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा मृतदेह जाळण्यासाठी सरणावर लाकडांचा तुटवडा भासत आहे. लाकडे कमी असल्याने बरेच मृतदेह अर्धवट अवस्थेत जळत आहेत. तर उरलेल्या अवयवांवर भटके कुत्रे ताव मारीत असल्याच्या धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात उघडकीस आलाय. मृतदेहांचे शिल्लक राहिलेले अवयव कुत्रे चक्क स्मशानभूमीच्या शेजारी असलेल्या करखखेड़ा (भिलेवाडा) गावात ओढून आणत असल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. गावात कोरोना संसर्ग वाढल्याची भीती गावकारी व्यक्त करत असून, ग्रामस्थ दहशतीत आहेत. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णासाठी असलेली स्मशानभूमी इतरत्र हलविण्याची मागणी करखखेडा (भिलेवाडा) येथील गावकऱ्यांची जिल्हा प्रशसानाकडे केलीय.

काहींचे मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत

करखखेडा (भिलेवाडा) स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांवर अंतिम संस्कार करण्यात येत आहेत. मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मृतकांवर अंतिम संस्कार होत असल्याने काहींचे मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत राहून जात आहेत. त्या अर्धवट जळालेल्या मृतदेहांचे शिल्लक राहिलेले अवयव हे परिसरातील कुत्रे ओढत गावापर्यंत नेत आहेत. त्यामुळे गावात दुर्गंधी पसरली असून, संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अर्धवट जळालेल्या अवस्थेतील अवयव सापडल्याने गावकरी दहशतीत

अगोदरच गावात 102 कोरोना रुग्ण सापडले असून, 4 लोकांचा मृत्यू झाल्याने गाव चिंतेत आहे. आता चक्क कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील अवयव सापडल्याने गावकरी दहशतीत आहेत. तर अवयव सापडल्याबाबत उपसरपंचाने फोनद्वारे माहिती दिल्यावर भंडारा नगर परिषदेचे काही लोकांनी येत कुत्र्यांनी आणलेले अवयव घेऊन गेले आणि ते पुन्हा स्मशानभूमीत जाळले. सरण रचणाऱ्या कर्मचाऱ्यानं ही माहिती दिलीय. त्या ठिकाणी वीज उपलब्ध नसल्यानं रात्री 7 नंतर कर्मचारी तिकडे थांबत नाहीत. आधीच कोरोना संसर्गाची भीती असताना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जनतेची चिंता वाढलीय.

संबंधित बातम्या

‘व्यापाऱ्यांना त्रास द्याल तर संघर्ष अटळ’; नितेश राणेंचा राज्य सरकारला इशारा

नागपुरात आरोग्य यंत्रणेवर ताण आल्याने डॉक्टरांचं धरणे आंदोलन

limbs of the half-burnt corpses are being broken by the dogs in bhandara