VIDEO| नागपुरात कडक निर्बंधामुळे दोन दिवस दारूची दुकानं बंद; तळीरामांची दुकानांबाहेर रांग

येत्या शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद असणार आहेत. त्यामुळेच नागपुरात दोन दिवस बाजारपेठा बंद राहणार आहेत.

  • सुनील ढगे, टीव्ही 9 मराठी, नागपूर
  • Published On - 0:09 AM, 27 Feb 2021
VIDEO| नागपुरात कडक निर्बंधामुळे दोन दिवस दारूची दुकानं बंद; तळीरामांची दुकानांबाहेर रांग

नागपूरः गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता आता नागपुरात कठोर नियम लागू करण्यात येणार आहेत. येत्या शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद असणार आहेत. त्यामुळेच नागपुरात दोन दिवस बाजारपेठा बंद राहणार आहेत. (Liquor Shops Closed For Two Days In Nagpur Due To Strict Restrictions; Queue Outside wine shop)

विशेष म्हणजे नागपुरात बाजारपेठांबरोबरच दारूची दुकानंसुद्धा बंद राहणार असून, दारू खरेदीसाठी काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आल्याचं चित्र समोर आलंय. महत्त्वाचं म्हणजे रविवारीसुद्धा दारू दुकानं बंद राहणार असून, शौकीन लोकांनी आधीच सोय करून ठेवली आहे. दोन दिवस बाजारपेठा बंद राहणार असल्यानं तळीरामांना दारूच्या दुकानांबाहेर गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.

नागपुरात कोरोनाचा पुन्हा ब्लास्ट

नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा पुन्हा एकदा ब्लास्ट झालाय. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1181 नव्या रुग्णांची नोंद झालीय. तर 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 7184 वर पोहोचलीय. तरीही लोकं मात्र सुधारायला तयार नाहीत. नागपूरच्या बर्डी फुलबाजारात कोव्हिडचे नियम धाब्यावर बसवून लोक सर्रास वावरत होते. इथे काहींनी मास्क घातला नव्हता, तर सोशल डिस्टन्सिंगचा सर्रास फज्जा उडाला होता.

नागपूर पोलीस दलात आठ वारसांना मिळाली नोकरी

राज्य पोलीस दलाने आदर्श घालून दिला आहे. कोरोनात मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, नागपूर पोलीस दलात आठ वारसांना नोकरी मिळाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या आठ वारसांची नागपूर पोलिसांत पोलीस शिपाई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कुणाला तीन महिन्यात, तर कुणाला सहा महिन्यात नोकरी मिळाली आहे. पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या

भयंकर! अचलपूरमध्ये घरोघरी कोरोना रुग्ण; रुग्णसंख्या हाताबाहेर गेल्याने होम आयसोलेशनही बंद

बुलडाणा जिल्ह्यातील लॉकडाऊन अधिक कडक, फक्त जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु राहणार

Liquor Shops Closed For Two Days In Nagpur Due To Strict Restrictions; Queue Outside wine shop