VIDEO : रस्त्यावर लहानग्यांचे हात सोडून नका, अन्यथा काय होऊ शकतं ते तुम्हीच पाहा!

बीजिंग : आई-वडिलांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणं किती महत्त्वाचं आहे, हे चीनमधील एका घटनेने अधोरेखित झालं आहे. चीनच्या पूर्वेकडील शहरातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, हा व्हिडीओ पाहून आपल्या जीवाचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. काळजाचा ठोका चुकविणारा हा व्हिडीओ असून, पालकांचा हलगर्जीपणा मुलांच्या जीवावर कसा बेतू शकतो, हे या व्हिडीओतून तुम्हा-आम्हाला …

VIDEO : रस्त्यावर लहानग्यांचे हात सोडून नका, अन्यथा काय होऊ शकतं ते तुम्हीच पाहा!

बीजिंग : आई-वडिलांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणं किती महत्त्वाचं आहे, हे चीनमधील एका घटनेने अधोरेखित झालं आहे. चीनच्या पूर्वेकडील शहरातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, हा व्हिडीओ पाहून आपल्या जीवाचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. काळजाचा ठोका चुकविणारा हा व्हिडीओ असून, पालकांचा हलगर्जीपणा मुलांच्या जीवावर कसा बेतू शकतो, हे या व्हिडीओतून तुम्हा-आम्हाला लक्षात येईल.

घटना काय घडली?

एक आई आपल्या चिमुकलीसोबत रस्त्याने चालताना दिसत आहे. आई पुढे चालतेय, तर चिमुकली मागेच राहते. आईचं लक्ष चिमुकलीकडे नसल्याने चिमुकली थोडी मागे पडते. त्याचवेळी मागून चारचाकी गाडी येते आणि त्या चिमुकलीवरुन जाते. त्यानंतर आई आरडाओरड करुन गाडी थांबवते. मात्र, चिमुकली गाडीच्या मागच्या चाकाखाली दबली जाते. त्यानंतर घाबरलेली आई मोठमोठ्याने ओरडते, रडते.

त्यावेळी आजूबाजूचे काहीजण मदतीला धावून आले आणि गाडीचा मागील भाग उचलला. त्यानंतर चिमुकलीला बाहेर काढण्यात आले. रस्त्यावर आजूबाजूला असलेल्या लोकांनी दाखवलेली सतर्कता वाखणण्याजोगी आहे. मात्र, त्यावेळी पूर्णपणे घाबरलेली आई रस्त्यावर पडली होती.

बीजिंगस्थित चीन ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्कच्या माहितीनुसार, गाडीखाली आलेल्या चिमुकलीला किरकोळ दुखापत झाली असून, तिला जवळील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *