LIVE : केंद्रीय मंत्रिमंडळाचं मनापासून अभिनंदन : राज ठाकरे

, LIVE : केंद्रीय मंत्रिमंडळाचं मनापासून अभिनंदन : राज ठाकरे
, LIVE : केंद्रीय मंत्रिमंडळाचं मनापासून अभिनंदन : राज ठाकरे

केंद्रीय मंत्रिमंडळाचं मनापासून अभिनंदन : राज ठाकरे

05/02/2020,2:15PM
, LIVE : केंद्रीय मंत्रिमंडळाचं मनापासून अभिनंदन : राज ठाकरे

वर्धा : जळीतकांड पीडितेच्या उपचारासाठी राज्य सरकारकडून 4 लाख

05/02/2020,12:13PM
, LIVE : केंद्रीय मंत्रिमंडळाचं मनापासून अभिनंदन : राज ठाकरे

मराठा आरक्षण कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात 17 मार्चपासून अंतिम सुनावणी

05/02/2020,11:36AM
, LIVE : केंद्रीय मंत्रिमंडळाचं मनापासून अभिनंदन : राज ठाकरे

टीम इंडियाचं न्यूझीलंडला विजयासाठी 348 धावांचं आव्हान

05/02/2020,11:36AM
, LIVE : केंद्रीय मंत्रिमंडळाचं मनापासून अभिनंदन : राज ठाकरे

अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणार : मोदी

05/02/2020,11:12AM
, LIVE : केंद्रीय मंत्रिमंडळाचं मनापासून अभिनंदन : राज ठाकरे

मुंबई उच्च न्यायलयाचे खंडपीठ पुण्यात व्हावं, वकिलांची मागणी

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावं, अशी मागणी पुणे बार असोसिएशन वकिलांच्या संघटनेने केली आहे. 1978 साली मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद आणि पुणे या दोन्ही ठिकाणी करण्याचा ठराव विधानसभेत संमत करण्यात आला होता. औरंगाबादला खंडपीठ झालं पण पुण्याला अजन झालेलं नाही, असं पुणे बार असोसिएशनच्या सदस्यांचं म्हणण आहे. तसेच कोल्हापूरमधील बार असोसिएशननेही कोल्हापूरमध्ये मुंबई खंडपीठ व्हाव असा आग्रह केला. यासाठी कोल्हापूरमधे त्यासाठी वकिलांनी आंदोलन केलं होतं.

05/02/2020,10:53AM
, LIVE : केंद्रीय मंत्रिमंडळाचं मनापासून अभिनंदन : राज ठाकरे

ऊसाचे ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू

उसाचे डबल ट्रॉलिचे ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. चालकाचे मागच्या चाकाखाली डोकं आल्याने मृत्यू झाला आहे. जालन्यातील अंबड तालुक्यातील गोंदी – हसनापूर रोडवर अपघात झाला. प्रदीप रामचंद्र नाहिराळे असं मृत चालकाचे नाव आहे.

05/02/2020,10:42AM
, LIVE : केंद्रीय मंत्रिमंडळाचं मनापासून अभिनंदन : राज ठाकरे

अमरावतीत कालव्यात 13 वर्षीय मुलगी वाहून गेली

अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील सातरगाव रोडवरील मुख्य कालव्यात एक 13 वर्षीय मुलगी वाहून गेली. मंदाकिनी सुभेदार मडिया असं या मुलीचं नाव आहे. तोल गेल्याने मुलगी कालव्यात पडली. मुलगी जळी-बुटीचा व्यवसाय करण्यासाठी आपल्या कुटुंबियांसोबत मध्य प्रदेशवरुन आली होती.या प्रकरणी तिवसा पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली असून घटनास्थळी अमरावती येथील रेस्क्यू टीम दाखल झाली आहे.

05/02/2020,9:57AM
, LIVE : केंद्रीय मंत्रिमंडळाचं मनापासून अभिनंदन : राज ठाकरे

काही टक्के घुसखोरांसाठी संपूर्ण देश रांगेत, केंद्राचं धोरण विचित्र, मुख्यमंत्र्यांची ‘रोखठोक’ भूमिका

05/02/2020,9:51AM
, LIVE : केंद्रीय मंत्रिमंडळाचं मनापासून अभिनंदन : राज ठाकरे

शरद पवारांना धार्मिक कार्यक्रमांना बोलावू नका, राष्ट्रीय वारकरी परिषदेचं फर्मान

05/02/2020,9:50AM
, LIVE : केंद्रीय मंत्रिमंडळाचं मनापासून अभिनंदन : राज ठाकरे

नागपूर गोधनी मार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

नागपूर येथील गोधनी मार्गावर वॅगनआर कार आणि बाईकचा अपघात झाला आहे. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. विरुद्ध दिशेने गाडी चालवत असल्यामुळे हा अपघात घडला.

05/02/2020,9:24AM
, LIVE : केंद्रीय मंत्रिमंडळाचं मनापासून अभिनंदन : राज ठाकरे

औरंगाबादमध्ये बार चालकने घरात घुसून महिलेला जिवंत जाळले

औरंगाबादमध्ये अंधारी गावात बार चालकाने महिलेला जिंवत जाळले. यामध्ये महिला 95 टक्के भाजली आहे. महिलेवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संतोष मोहिते असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.

05/02/2020,9:19AM
, LIVE : केंद्रीय मंत्रिमंडळाचं मनापासून अभिनंदन : राज ठाकरे

कुख्यात डॉन अरुण गवळीकडून पॅरोलची मागणी

कुख्यात डॉन अरुण गवळीकडून पॅरोलची मागणी करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांनी अर्ज फेटाळल्यानंतर पॅरोलसाठी अरुण गवळीची उच्च न्यायालयात याचीका करण्यात आली आहे. पत्नी आजारी असल्याने 30 दिवसांची पॅरोल मागण्यात आली आहे. अरुण गवळी जामसांदेकर हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा आहेत.

05/02/2020,9:16AM
, LIVE : केंद्रीय मंत्रिमंडळाचं मनापासून अभिनंदन : राज ठाकरे

बलात्काराचा गुन्हा मागे न घेतल्यामुळे आरोपीने तरुणीवर ज्वलनशील पदार्थ फेकला

मिरा रोडच्या काशीमिरा परिसरातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बलात्काराच्या गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने 26 वर्षीय पीडितेवर आरोपीने ज्वलनशील पदार्थ फेकला. या घटनेत ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार सुरू आहे. आरोपीला काशीमिरा पोलिसांनी अटक करून पुढली तपास करत आहे.

05/02/2020,9:11AM
, LIVE : केंद्रीय मंत्रिमंडळाचं मनापासून अभिनंदन : राज ठाकरे

सांगलीत मुलाकडून वडिलांची निर्घृण हत्या

सांगलीत मुलानेच आपल्या वडिलांची हत्या केली आहे. वडील आणि मुलाच्या भांडणामध्ये मुलाने थेट धारदार शस्त्राने वडिलांच्या छातीवर वार केले. या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू झाला. प्रकाश महादेव वारे (वय 52) असे मृताचे नाव आहे.

05/02/2020,9:09AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *