LIVE : छत्तीसगड येथील राष्ट्रीय महामार्गावर दोन बसमध्ये धडक, 7 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी

दिवसभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडी एका क्लिकवर फक्त टीव्ही 9 मराठीवर...

LIVE : छत्तीसगड येथील राष्ट्रीय महामार्गावर दोन बसमध्ये धडक, 7 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी
Follow us
| Updated on: Jul 30, 2019 | 6:43 PM

[svt-event title=”नाशिकमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी” date=”30/07/2019,6:42PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”IPS अधिकारी साहेबराव पाटील भाजपात प्रवेश करणार” date=”30/07/2019,10:40AM” class=”svt-cd-green” ] वरिष्ठ IPS अधिकारी साहेबराव पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झालं आहे. जळगाव जिल्ह्यातील,अमळनेर विधानसभा मतदार संघातून त्यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 31 तारखेला वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार आहेत. [/svt-event]

[svt-event title=”घराचे छप्पर कोसळल्याने तीनजण जखमी” date=”30/07/2019,10:38AM” class=”svt-cd-green” ] पालघर येथे घराचे छप्पर कोसळल्याने एकाच घरातील तीनजण जखमी झाले आहेत. ही घटना माहिम रोड येथील लक्ष्मी नारायण मंदिरासमोरी विजय दांडेकर कम्पाऊंड येथे घडली. रात्री झोपेत असताना हे छप्पर अचानक खाली कोसळल्याने घरातील 4 लोक जखमी झाले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”छत्तीसगड येथे नक्षली कॅम्पवर पोलिसांचा हल्ला, 6 नक्षली ठार” date=”30/07/2019,10:29AM” class=”svt-cd-green” ] छत्तीसगड येथे पोलिसांनी नक्षली कॅम्पवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात एकूण 6 नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आलं आहे. एक ते दीड तास पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून दोन रायफलसह चार बुंदकाही जप्त केल्या आहेत. [/svt-event]

[svt-event title=”छत्तीसगड येथील राष्ट्रीय महामार्गावर दोन बसमध्ये धडक, 7 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी” date=”30/07/2019,10:22AM” class=”svt-cd-green” ] छत्तीसगड येथील राष्ट्रीय महामार्गावर दोन बसमध्ये धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. हा अपघात धर्मतरी येथील चितौदाजवळ झाला. या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू, तर 30 प्रवाशी जखमी आहेत. यामध्ये मृताचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात 5 वर्षीय बालकाचा पाणी भरलेल्या खड्ड्यात पडून मृ्त्यू” date=”30/07/2019,10:20AM” class=”svt-cd-green” ] नागपुरात 5 वर्षीय बालकाचा पाणी भरलेल्या खड्ड्यात पडून मृ्त्यू झाला आहे. ही घटना दवलामेटी परिसरातील घडली. आर्यन राऊत असं मृत बालकाचं नाव आहे. आर्यन काल (29 जुलै) घराशेजारी मैदानात खेळत होता. त्यावेळी तेथे समाजभवन बांधण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी भरले होते. या खड्ड्यात पडून त्याचा मृत्यू झाला. [/svt-event]

[svt-event title=”चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच” date=”30/07/2019,10:15AM” class=”svt-cd-green” ] गेल्या 24 तासात चंद्रपुरात सरासरी 88 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 15 पैकी 12 तालुक्यात अतिवृष्टी तसेच सिंदेवाही तालुक्यात सर्वाधिक 140 मिमी पावसाची नोंद झाली. मूल 116 मिमी, सावली 112 मिमी, गोंडपिंपरी 101 मिमी आणि चंद्रपूर 98 मिमी झाली आहे. [/svt-event]

[svt-event title=”‘सीसीडी’चे संस्थापक आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम.कृष्णा यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थ बेपत्ता” date=”30/07/2019,9:35AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्र्यांची तोफ 25 ऑगस्टला बारामतीत धडाडणार” date=”30/07/2019,9:31AM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्र्यांची तोफ 25 ऑगस्टला बारामतीत धडाडणार, महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील पहिली सभा इंदापुरात, मुख्यमंत्री 25 ऑगस्टला बारामतीत सभा घेणार असून त्या रात्री बारामतीत मुक्काम करणार, सभेनंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांची बारामतीत पत्रकार परिषद, सभा आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्यात प्रभावीपणे संदेश देण्याचा भाजपचा प्रयत्न, आतापासूनच सभेचे नियोजन भाजप संघटनेकडून सुरु, बारामतीत जाऊन मुख्यमंत्री नेमकं काय बोलणार याबाबत अनेकांना उत्सुकता [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरी- राजापूर येथील जव्हार चौकात पाणी” date=”30/07/2019,9:29AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी- राजापूर येथील जव्हार चौकात पाणी , अर्जुना आणि कोदवली नदीला पूर, पहाटे 4 वाजल्यापासून जव्हार चौकात पाणी , जव्हार चौकात तीन ते चार फुटापर्यंत पाणी साठले [/svt-event]

[svt-event title=”मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल” date=”30/07/2019,9:23AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पालघर : पालघर जिल्ह्यात रात्रभर पावसाची रिपरिप सुरु, सततच्या पावसामुळे धरण क्षेत्राच्या पाणी पातळीत वाढ” date=”30/07/2019,9:20AM” class=”svt-cd-green” ] पालघर : पालघर जिल्ह्यात रात्रभर पावसाची रिपरिप सुरु, सततच्या पावसामुळे धरण क्षेत्राच्या पाणी पातळीत वाढ, वसई विरार महानगरपालिका तसेच पालघरला पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्या नदीवरील धामणी धरणाचे पाचही दरवाजे उघडले, तीन दरवाजे 50 सेमी ने तर दोन दरवाजे 30 सेमी ने उघडले. धामणी आणी कवडास धरणां मिळुन 13748 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सध्या सूर्या नदी द्वारे सुरू आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा . मात्र कोणताही धोका नसल्याची प्रशासनाची माहिती [/svt-event]

[svt-event title=”वाशिम : जिल्ह्यात रिमझिम पावसाला सुरुवात” date=”30/07/2019,9:17AM” class=”svt-cd-green” ] पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना संजीवनी, मात्र जिल्ह्यातील सर्व प्रकल्प कोरडे असल्याने जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. [/svt-event]

[svt-event title=” गडचिरोली : पर्लाकोटा नदीला पूर आल्याने 100 गावांचा संपर्क तुटला” date=”30/07/2019,9:14AM” class=”svt-cd-green” ] ओडीसा राज्यातील मुसळधार पावसामुळे इंद्रावती नदीला पूर आला. भामरागड तालुक्याची दूरध्वनी व विद्युत सेवा खंडित करण्यात आली आहे. रस्त्यावर 4 ते 5 फूट पाणी असून वाहतूक ठप्प आहे. [/svt-event]

[svt-event title=”ट्रक ड्रायव्हरला मारहाण करणाऱ्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्याची पक्षातून हकालपट्टी” date=”30/07/2019,8:37AM” class=”svt-cd-green” ] ट्रक ड्राइवरला अमानुष मारहाण करणाऱ्या अखिल पोहनकरची युवा सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. युवा सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून हा निर्णय घेण्यात आला. अखिल पोहनकर युवा सेनेचा नागपूर ग्रामीण तालुक्याचा तालुका पदाधिकारी होता. [/svt-event]

[svt-event title=”ठाणे जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी” date=”30/07/2019,7:56AM” class=”svt-cd-green” ] बदलापूर जवळील बारवी धरणात एक वर्ष पुरेल इतका पाणी साठा, धरणाच्या जुन्या क्षमतेनुसार बारवी धरण शंभर टक्के भरलं, बारवी धरणाची चार मीटरने उंची वाढवण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी बारवी धरणात जमा होणार अतिरिक्त पाणी साठा, बारवी धरणातून अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, ठाणे मीरा भाईंदर तसेच औद्योगिक वसाहती आणि शहरांना पाणी पुरवठा केला जातो. [/svt-event]

[svt-event title=”जुगार खेळताना पैशाच्या वादातून हत्या” date=”30/07/2019,7:51AM” class=”svt-cd-green” ] नागपुरात जुगार खेळताना पैशाच्या वादातून हत्या झाली आहे. ही घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आनंद शिरपूरकर असं मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे. [/svt-event]

[svt-event title=”नाशिकमधील गोदावरी नदीला पूर” date=”30/07/2019,7:47AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमधील गोदावरी नदीला यंदाच्या पावसाळ्यातील पहिला पूर आला आहे. यापुरामुळे नाशिक परिसरातील प्रसिद्ध दुतोंड्या मारुती मुर्तीच्या छातीपर्यंत पाणी साचलं आहे. तसेच लोखंडी पूल आणि अनेक मंदिर पाण्याखाली गेली आहेत. [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरीतील काजळी नदीला पूर” date=”30/07/2019,7:41AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरीतील काजळी नदीला पूर आला आहे. त्यामुळे चांदेराई बाजारपेठेत पाणी शरिले आहे. बाजारपेठेत चार फूट पाणी साचलं असून चांदेराई-लांजा रस्त्यावरही पाणीच पाणी झालं आहे. पूरामुळे व्यापाऱ्यांना मोठा तोटा होत आहे. त्यामुळे येथील वाहतूकही ठप्प झाली आहे. [/svt-event]

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.