LIVE : शिक्षकाची विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी

, LIVE : शिक्षकाची विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी
, LIVE : शिक्षकाची विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी

महाराष्ट्रात तान्हाजी द अनसंग वॉरियर सिनेमा करमुक्त

22/01/2020,1:34PM
, LIVE : शिक्षकाची विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी

शिक्षकाची विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी

श्रीरामपूर येथे जीटीएस हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलमध्ये धक्कादायक असा प्रकार घडला आहे. येथील शिक्षकाने 12 वीच्या विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी केली आहे. विज्ञान शाखेच्या मुलीला इंटरनल मार्कावरुन ब्लॅकमेलिंग करत होता. संबंधित शिक्षकाला अटक करण्याची मागणी पालकांनी केली.

22/01/2020,1:27PM
, LIVE : शिक्षकाची विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी

विनयभंग प्रकरणात डीआयजी निशिकांत मोरेंना अटकपूर्व जामीन मंजूर

विनयभंग प्रकरणात निलंबीत करण्यात आलेल्या डीआयजी मोरेंना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई हायकोर्टाने मोरेंना अटकपूर्व जामीन मंजूर केला.

22/01/2020,11:54AM
, LIVE : शिक्षकाची विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी

पंडिताकडून 21 वर्षीय गायिकेवर बलात्कार

समृद्धी आणि व्यवसायासाठी घरात पूजा करण्याचे नाटक करुन एका पंडिताने 21 वर्षीय गायिकेवर बलात्कार केला. ही धक्कादायक घटना कांदिवली येथे घडली. पोलिसांनी पंडिताला अटक केली आहे. आरोपीने त्या महिलेला सांगितले होते की तिच्या शरीरात एक अपवित्र आत्मा आहे. तो बाहेर काढण्याच्या नावाखाली पंडिताने बलात्कार केला.

22/01/2020,11:14AM
, LIVE : शिक्षकाची विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी

तीस फूट खोल विहिरीत पडला गवा रेडा

रत्नागिरीत तीस फूट खोळ विहिरीत गवा रेडा पडला. काल रात्री हा रेडा विहिरीत पडला आहे. वनविभागाकडून गवा रेड्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहे.

22/01/2020,11:08AM
, LIVE : शिक्षकाची विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी

चोरट्यांचा वृद्ध महिलेवर हल्ला, डोळ्यात विळा खुपसला

यवतमाळमधील पुसद तालुक्यातील आसोली गावात चोरट्यांनी वृद्ध महिलेवर हल्ला केला. तसेच महिलेच्या डोळ्यात विळा खुपसला आहे. यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात महिलेला आणले असता ऑपरेशन थेटर बंद असल्याने नागपूर येथे उपचारासाठी दाखल केले. मीराबाई हरी राठोड असे जखमी महिलेचं नाव आहे.

22/01/2020,11:00AM
, LIVE : शिक्षकाची विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी

पोलीस दलात घोडे वापरायला मनसेचा विरोध

मशीनच्या युगात घोड्याचा वापर योग्य नाही. न्यायालयाने प्राण्यांचा वापर टाळला पाहिजे, असं म्हटलं आहे. उद्धवा अजब तुझे सरकार, अशी टीका मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे. तसेच पोलीस दलात घोडे वापरायला मनसेचा विरोध आहे, असही त्यांनी सांगितले.

22/01/2020,9:56AM
, LIVE : शिक्षकाची विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी

बदलापूर एमआयडीसीतील कंपनीत स्फोट

बदलापूर येथील एमआयडीसी कंपनीत स्फोट झाला आहे. स्फोटात एका कामगाराचा मृत्यू, तर दोन कामगार जखमी झाले आहेत. के जे रेमेडी नावच्या कंपनीत ड्रायरचा स्फोट झाला आहे. अग्निशमन दलाकडून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

22/01/2020,9:42AM
, LIVE : शिक्षकाची विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी

कार आणि ट्रक अपघातात महिलेचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी

कोल्हापुरात कार आणि ट्रकच्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी झालेले आहेत. सविता बेडकिहाळे असं मृत महिलेचं नाव आहे. पुण-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील सांगली फाटा येथे हा अपघात झाला.

22/01/2020,9:04AM
, LIVE : शिक्षकाची विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी

जळगाव येथील आश्रमशाळेत एकाच आठवड्यात दोन भावांचा मृत्यू

जळगाव येथील आश्रमशाळेत एकाच आठवड्यात दोन भावांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रावेर येथे घडली. दोघेही पहिलीच्या वर्गात शिकत होते. तसेच दोघांच्या मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

22/01/2020,9:00AM
, LIVE : शिक्षकाची विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी

शनिवारवाड्याचा आज 288 वा वर्धापनदिन, दिल्ली दरवाजा उघडणार

थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्यावतीने शनिवारवाड्याचा आज 288 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने शनिवारवाड्याचा दिल्ली दरवाजा पूर्णपणे उघडण्यात येणार आहे. नऊ वाजता दिल्ली दरवाजा उघडणार आहे. ज्येष्ठ इतिहासतज्ञ मोहन शेटे शनिवारवाड्याच्या गौरवशाली इतिहासाची माहिती देणार आहेत.

22/01/2020,8:56AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *