LIVE : प्रकृती अस्वास्थामुळे मला मंत्रीपद नको : अरुण जेटली

Payal Tadvi suicide case : तिन्ही आरोपी डॉक्टरांना अटक #DrPayalTadvi #DrPayal https://t.co/437RaT4APu — TV9 Marathi (@TV9Marathi) May 29, 2019    

LIVE : प्रकृती अस्वास्थामुळे मला मंत्रीपद नको : अरुण जेटली
Picture

शिवसेनेकडून अनिल देसाई यांना मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्रीपद मिळण्याची शक्यता

उद्या कॅबिनेट मंत्र्यांचा शपथग्रहण सोहळा, शिवसेनेकडून अनिल देसाई यांना मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्रीपद मिळण्याची शक्यता, त्याशिवाय राज्यातही 1 मंत्रीपद शिवसेनेला दिलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती, मित्रपक्षांना मंत्रिपदे देताना मात्र भाजपचा आखडता हात, प्रत्येक घटकपक्षाचा फक्त एकच मंत्री शपथ घेणार असल्याची सूत्रांची माहिती

29/05/2019,3:15PM
Picture

Payal Tadvi alleged suicide case: पायल तडवी आत्महत्येप्रकरणी तीन आरोपी डॉक्टरांना दोन दिवसांची (31 मे) पोलीस कोठडी

29/05/2019,2:10PM
Picture

29/05/2019,1:27PM
Picture

प्रकृती अस्वास्थ असल्यामुळे मला मंत्रीपद नको : अरुण जेटली

29/05/2019,1:26PM
Picture

नाशिक येथे 35 लाखांचा गुटखा जप्त

नाशिक येथील वणीमध्ये 35 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. दोन पिकअपसह एकूण 46 लाख 28 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मालेगाव विशेष पोलीस पथकाने ही कार्यवाही केली आहे. गुजरात येथून अवैधरित्या गुटखा आणत असताना मालेगाव पोलिसांनी कारवाई केली.

29/05/2019,1:13PM
Picture

मुंबई : डॉ पायलच्या मृतदेहावर मारहाणीचे व्रण, डॉ पायल यांच्या आत्महत्येप्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा

29/05/2019,12:20PM
Picture

डॉ पायल आत्महत्येप्रकरणी तिन्ही महिला डॉक्टरांना अटक, आत्महत्येप्रकरणी सुनावणी सुरु,

29/05/2019,12:19PM
Picture

वर्ध्यात बस, कार, दुचाकीचा अपघात, पाच जण जखमी

वर्धा येथे एसटी महामंडळाची बस, टाटा इंडिका आणि दुचाकी चालकामध्ये विचित्र अपघात झाला आहे. यामध्ये कारमधील दोनजण गंभीर, तर तीन जखमी झाले आहेत. हा अपघात पवनार येथील वळणावर रात्री झाला. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

29/05/2019,11:13AM
Picture

ठाण्याच्या माजीवडा पूलावर कंटेनर पलटी झाल्याने घोडबंदरकडून मुंबईला जाणारी वाहतूक ठप्प

ठाण्याच्या माजीवडा पूलावर कंटेनर पलटी झाल्याने घोडबंदरकडून मुंबईला जाणारी वाहतूक ठप्प, पहाटे 3.30 च्या सुमारास कंटेनरला अपघात, गुजरातहून नवी मुंबईला येत असताना कंटेनरला अपघात, सदर कंटेनर मध्ये ताडपत्रीने कंटेनर भरलेला होता, सुदैवाने जीवितहानी नाही, दरम्यान कंटेनर काढण्याचं काम अद्याप सुरु आहे.

29/05/2019,9:23AM
Picture

सांगली जिल्ह्यातील काँग्रेसमधील दोन नेते भाजपच्या संपर्कात

सांगली जिल्ह्यातील काँग्रेसमधील दोन नेते भाजपच्या संपर्कात, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख भाजपच्या वाटेवर, यामुळे काँग्रेसला मोठं खिंडार पडण्याची शक्यता, येत्या आठ दिवसात निर्णय होण्याची शक्यता

29/05/2019,8:11AM
Picture

दक्षिण काश्मीरमधील कुल्गम जिल्ह्यातील ताझिपोरा परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक

दक्षिण काश्मीरमधील कुल्गम जिल्ह्यातील ताझिपोरा परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक, 2 ते 3 दहशतवादी ताझिपोरा भागात लपल्याची माहिती

29/05/2019,8:07AM
Picture

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात तिन्ही आरोपी डॉक्टरांना अटक

29/05/2019,8:04AM

 

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *