LIVE : मिलिंद नार्वेकर चंद्रकांत पाटल्यांच्या घरी, मराठा आरक्षणाबद्दल अभिनंदन

दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

LIVE : मिलिंद नार्वेकर चंद्रकांत पाटल्यांच्या घरी, मराठा आरक्षणाबद्दल अभिनंदन
Picture

माऊलींची पालखी दिवे घाटाकडे रवाना

पुणे- हडपसरमधून माऊलीची पालखी दिवे घाटाकडे रवाना, हडपसरमधील विसावा संपला

28/06/2019,9:45AM
Picture

चंद्रकांत पाटल्यांच्या घरी जाऊन अभिनंदन

मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून मंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन अभिनंदन केले

28/06/2019,8:36AM
Picture

गुहागर ,चिपळूण ,खेड परिसरात रात्रभर पाऊस

28/06/2019,8:44AM
Picture

नाशिकमध्ये जुना वाडा कोसळला

नाशिकच्या जुने #नाशिक परिसरात वाडा कोसळला, 3 जण किरकोळ जखमी, संभाजी चौक परिसरातील घटना

28/06/2019,8:40AM
Picture

मराठा समाजाच्या आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब

मराठा समाजाच्या आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं आहे. राज्य सरकारला आरक्षण देण्याचा पूर्ण अधिकार आहे, असं म्हणत हायकोर्टाने मराठा आरक्षणाचा अहवाल स्वीकारला. मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक मागास असल्याचं कोर्टाने मान्य केलं. हायकोर्टाने मराठा समाजाला नोकरीत 12 टक्के आणि शिक्षणात 13 टक्के आरक्षण मंजूर केलं.

28/06/2019,7:15AM
Picture

नागपुरातील हॉस्पिटलमधील जेवणात शेण, किचनचा दोष नाही चौकशी समिती

नागपुरच्या मेडिकल कॉलेजमधील रुग्णाच्या जेवणात जनावराचं शेण आढळल्याप्रकरणी रुग्णालयाच्या स्वयंपाकघराला क्लीनचिट, मेडिकल अधिष्ठात्यांनी नेमलेल्या चौकशीत किचनला क्लीनचिट, गेल्या आठवड्यात मेडिकल कॉलेजमधील एका रुग्णाच्या जेवणात शेण आढळलं होतं. वॉर्ड स्तरावरच हा प्रकार झाल्याचा मेडीकलच्या समितीचा ठपका

28/06/2019,7:11AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *