LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Picture

नाशिक : अनुराधा थेटरला आग

नाशिक : अनुराधा थेटरला आग, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट, कोणतीही जिवीतहानी नाही, आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु

17/08/2019,11:12AM
Picture

नागपूर : 17 वे अखिल भारतीय विधी सेवा संमेलनाला नागपुरात सुरु

नागपूर : 17 वे अखिल भारतीय विधी सेवा संमेलनाला नागपुरात सुरु, नागपूरला पहिल्यांदाच मान, देशभरातील शंभरहून अधिक न्यायाधीश सहभागी होणार, दोन दिवस संमेलन चालणार, कायदा मंत्री रवी शंकर हे उपस्थित राहणार

17/08/2019,11:10AM
Picture

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची औरंगबादेत गुप्त बैठक, भाजपचे वरिष्ठ नेतेही बैठकीला हजर

विधानसभेच्या तोंडावर बैठक होत असल्याने चर्चांना उधाण, शहरातील एका बड्या उद्योगपतीने बैठकीचे नियोजन केल्याची माहिती, बैठकीत विधानसभा निवडणुकीवर चर्चा होण्याची शक्यता, आर्थिक मंदी आणि इतर सामाजिक प्रश्नांवर चर्चा होणार असल्याची माहिती

17/08/2019,11:06AM
Picture

काँग्रेस आमदार निर्मला गावित शिवसेनेच्या वाटेवर

काँग्रेस आमदार निर्मला गावित शिवसेनेच्या वाटेवर, निर्मला गावित यांनी इगतपुरीमध्ये एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. निर्मला गावित या काँग्रेस नेते माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत.

17/08/2019,10:25AM
Picture

रत्नागिरी : गणपतीपुळे समुद्रात चार जण पाण्यात बुडाले

रत्नागिरी : गणपतीपुळे समुद्रात चार जण पाण्यात बुडाले, यातील दोन महिलांचे मृतदेह सापडले आहेत. तर एका पुरषाचा शोध अद्याप सुरु आहे. तर एका मुलीला वाचवण्यात सुरक्षा रक्षकांना यश आलं आहे.

17/08/2019,10:11AM
Picture

अकोला श्रमिक पत्रकार संघाची सांगली कोल्हापूर पूरग्रस्तांना मदतीचा हात

अकोला श्रमिक पत्रकार संघाची सांगली कोल्हापूर पूरग्रस्तांना मदतीचा हात, अकोला श्रमित पत्रकार संघाकडून सांगली – कोल्हापुरातील पूरग्रस्तांना 316 ब्लॅकेट जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द

17/08/2019,10:07AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *