LIVE : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर, गोकुळकडून दुधाच्या खरेदी दरात वाढ

, LIVE : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर, गोकुळकडून दुधाच्या खरेदी दरात वाढ
, LIVE : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर, गोकुळकडून दुधाच्या खरेदी दरात वाढ

कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या

कोल्हापूर : कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या, कोल्हापूरच्या वडणगे-निगवे रोडवरील घटना, सारिका विठ्ठल महानूर असं मृत महिलेचं नाव, हत्येची घटना समोर आल्यावर पती विठ्ठल महानूर फरार

14/01/2020,5:43PM
, LIVE : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर, गोकुळकडून दुधाच्या खरेदी दरात वाढ

आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना 'वंचित'मधून बाहेर

औरंगाबाद : आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना वंचित मधून बाहेर, वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडत असल्याची आनंदराज आंबेडकरांची माहिती, रिपब्लिकन सेना यापुढे स्वतंत्र निवडणुका लढवणार, औरंगाबाद महापालिकेतही रिपब्लिकन सेना आपले सदस्य उतरवणार

14/01/2020,5:42PM
, LIVE : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर, गोकुळकडून दुधाच्या खरेदी दरात वाढ

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर, गोकुळकडून दुधाच्या खरेदी दरात वाढ

कोल्हापूर : कोल्हापुरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर, गोकुळकडून गायीच्या दुधाच्या खरेदीत दोन रुपयांची वाढ, तर म्हशीच्या दुधाच्या खरेदीत 1.70 रुपये इतकी वाढ, 1 तारखेपासून नवीन दरानुसार दुधाची खरेदी केली जाणार

14/01/2020,5:37PM
, LIVE : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर, गोकुळकडून दुधाच्या खरेदी दरात वाढ

सोलापुरात राष्ट्रवादी विरुद्ध मोहिते पाटील संघर्ष पेटला

सोलापूर : राज्यातल्या बाळराजाच्या हट्टापायी राष्ट्रवादीकडून ‘त्या’ सहा सदस्यांचं सदस्यत्व रद्द करण्याची तक्रार, अजित पवारांचं नाव न घेता धैर्यशील मोहिते पाटील यांची टीका, पिठासन अधिकाऱ्यांनी व्हीप बजावण्याला नकार दिलेला असताना सुद्धा सदस्यत्व रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, पक्षातून निलंबित झालेल्या त्या सहा सदस्यांचा निर्णय 20 जानेवारीला होणार

14/01/2020,5:35PM
, LIVE : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर, गोकुळकडून दुधाच्या खरेदी दरात वाढ

औरंगाबादेत सत्तार गटाचा खैरे गटाला पुन्हा धक्का

औरंगाबाद : जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या सत्तार गटाचा खैरे गटाला पुन्हा एकदा धक्का, भाजपच्या मदतीने सत्तार गट जिल्हा परिषदेतील तीन समित्यांवर विजयी, समाज कल्याण, अर्थ व बांधकाम आणि आरोग्य व शिक्षण समित्यांवर सत्तार गटाचा विजय, महिला बालकल्याण समितीवर भाजपने विजय मिळवला, जिल्हा परिषदेतील सभापती निवडीत अब्दुल सत्तार गटाने बाजी मारली, अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे गट जिल्हा परिषदेत पिछाडीवर

14/01/2020,5:31PM
, LIVE : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर, गोकुळकडून दुधाच्या खरेदी दरात वाढ

कोल्हापुरात भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून समरजितसिंह घाटगे यांची निवड

कोल्हापूर : भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून समरजितसिंह घाटगे यांची निवड , प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत घोषणा

14/01/2020,5:29PM
, LIVE : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर, गोकुळकडून दुधाच्या खरेदी दरात वाढ

राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी होणार

रत्नागिरीतील राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी होणार, विधानसभा आणि नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत पक्षाविरोधात काम केल्याचा ठपका, शिवसेनेसाठी खुलेआम काम केल्याने होणार कारवाई, कौसल्या शेट्ये, उज्ज्वला शेट्ये, मुसा काझी, सोहेल साखरकर या नगरसेवकांचा समावेश, राष्ट्रवादीच्या या चार नगरसेवकांना पक्षाच्यावतीने कारणे दाखवा नोटीस

14/01/2020,12:01PM
, LIVE : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर, गोकुळकडून दुधाच्या खरेदी दरात वाढ

ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू, तर पाच जखमी

नागपूर येथील म्हाळगी नगर चौकात ट्रकच्या धडकेत दोन मजुरांचा मृत्यू तर पाच मजूर जखमी झाले आहेत.

14/01/2020,11:59AM
, LIVE : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर, गोकुळकडून दुधाच्या खरेदी दरात वाढ

पत्नीची गळा दाबून हत्या, पतीची आत्महत्या

पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड येथे घडली. प्रियांका देशमुख आणि निलेश देशमुख अशी मृत पती-पत्नीची नावं आहेत. आर्थिक आणि कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

14/01/2020,11:55AM
, LIVE : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर, गोकुळकडून दुधाच्या खरेदी दरात वाढ

मनसे चित्रपट कर्मचारी सेनेची नवी कार्यकारिणी जाहीर

मनसे चित्रपट कर्मचारी सेनेची नवी कार्यकारिणी जाहीर झालेली आहे. अमेय खोपकर यांची पुन्हा संघटनेच्या अध्यक्षपदीनेमणूक झालेली आहे. तर कार्याध्यक्ष पदी शालिनी ठाकरे, सल्लागार पदी महेश मांजरेकर, अतुल परचुरे, अनंत जोग, उपाध्यक्ष पदी विजय पाटकर, संजय नार्वेकर, पुष्कर श्रोत्री, सायली संजीव, स्मिता तांबे, शर्वणी पिल्लई, विशाखा सुभेदार, उमा सरदेशमुख, रमेश परदेशी यांची नेमणूक झाली आहे.

14/01/2020,11:51AM
, LIVE : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर, गोकुळकडून दुधाच्या खरेदी दरात वाढ

पुण्यात 20 गाड्यांची तोडफोड

पुण्यातील रामटेकडी येथील स्मशानभूमीजवळील 20 गाड्यांची तोडफोड झाली आहे. अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने तोडफोड केली आहे. पुण्यात वाहने तोडफोड सत्र थांबता थांबेना. वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

14/01/2020,9:49AM
, LIVE : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर, गोकुळकडून दुधाच्या खरेदी दरात वाढ

पुणे-मुंबई महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू

पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर सकाळी 8 च्या सुमारास अज्ञात वाहनांच्या धडकेत कार चालकाचा दुर्देवी मृत्यू झाला. अजीज कचहुवाला असं मृत चालकाचं नावं आहे.

14/01/2020,9:42AM
, LIVE : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर, गोकुळकडून दुधाच्या खरेदी दरात वाढ

कोल्हापुरातील मटण दरावर अखेर तोडगा

कोल्हापुरातील मटण दरावर अखेर तोडगा निघालेला आहे. 520 रुपये प्रति किोलो मटण विकण्यावर एकमत झाले आहे. मटण विक्रेते आणि कृतूी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गेल्या दहा दिवसांपासून मटण विक्री बंद होती.

14/01/2020,9:30AM
, LIVE : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर, गोकुळकडून दुधाच्या खरेदी दरात वाढ

रत्नागिरी- नाणार प्रक्लप पुन्हा आणण्यासाठी समर्थक आक्रमक

नाणार प्रकल्प रत आणण्यासाठी समर्थक आक्रमक झाले आहेत. समर्थकांनी सुधारित आराखडाही तयार केला. 15 ऐवजी 10 एकरात प्रकल्प करावा यासाठी हालचाली सुरु आहेत. दत्तवाडी, पाळेकरवाडी नाणार वगळून विल्ये गावाचा समावेश करण्याचा आग्रह, प्रकल्पाचा प्रस्तावासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट मागणार

14/01/2020,9:27AM
, LIVE : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर, गोकुळकडून दुधाच्या खरेदी दरात वाढ

निपणी साहित्य संमेलनाला परवानगी नाकारली

महाराष्ट्राच्या हद्दीत देवचंद कॉलेजमध्ये होणाऱ्या निपाणी साहित्य संमेलनाला परवानगी नाकरण्यात आली आहे. साहित्य संमेलनाच्या परवान्यासाठी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेतली होती. महाराष्ट्रासह इतर प्रांतातील कोणालाही साहित्यिक, लेखक आणि कवी यांना आणायचे नाही अशी अटही प्रशासनाकडून घातली होती.

14/01/2020,9:20AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *