Live Update : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर, नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट, ब्रेकिंग न्यूज, मुंबई-महाराष्ट्रातील मोठ्या घडामोडी एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर (Live Update Breaking News)

Live Update : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर, नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार
Picture

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर, नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी एका दिवसाच्या सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सांगवी, अक्कलकोट येथील शेतकऱ्यांशी संवाद साधतील. सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, ग्रामथ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवारी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

मुख्यमंत्री सांगवी खूर्द येथे नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत. बोरी नदीची व पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर अक्कलकोट शहर हत्ती तलावाची पाहणी, उमरेगेमधील आपत्तीग्रस्त घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी करुन मुख्यमंत्री अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

17/10/2020,6:34PM
Picture

इतका मोठा पाऊस कधी पाहिला नाही: अजित पवार

इतका मोठा पाऊस कधी पाहिला नाही,असं वक्तव्य अजित पवार यांनी पंढरपूर येथे केले. नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात येणारआहेत. वीर आणि उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले. हवामान विभागाचे अंदाज खरे ठरत आहेत, असं अजित पवार यांनी म्हटलं.

17/10/2020,4:10PM
Picture

नागपूरकरांवर आता 'एनडीएस' पथकाची नजर, बाजारपेठेत गर्दी केल्यास कारवाई

17/10/2020,11:11AM
Picture

मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागांचा प्रत्यक्ष दौरा करावा, लोकांना दिलासा मिळेल- प्रकाश आंबेडकर

17/10/2020,11:10AM
Picture

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तुपकरांच्या शेतातील सोयाबीनच्या गंजीला आग; लाखोंचे नुकसान

17/10/2020,11:09AM
Picture

औरंगाबादेत कोरोना रुग्णवाढीला पुन्हा झाली सुरुवात

औरंगाबादेत कोरोना रुग्णवाढीला पुन्हा झाली सुरुवात, दिवसाकाठी रुग्णवाढीचा आकडा हा 114 वरून पोचलं 230, रुग्णवाढीचा आकडा 550 वरून थेट 114 वर घसरला होता, मात्र गेल्या दोन दिवसात पुन्हा रुग्णवाढीला सुरुवात, कोरोना रुग्णांचा आकडा पोचलं 33065 वर, तर 2112 रुग्णांवर सध्या उपचार सुरू

17/10/2020,11:01AM
Picture

रत्नागिरीत 72 तास कोसळणाऱ्या पावसानं भात शेतीचं मोठं नुकसान

रत्नागिरीत 72 तास कोसळणाऱ्या पावसानं भात शेतीचं मोठं नुकसान, नुकसानीची पाहणी करायला कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे सुरु, कापून ठेवलेल्या भाताचे मोठं नुकासान, जिल्ह्यात पावसाची उघडीप, शेतकरी हतबल, भात पाण्यात भिजल्याने भाताला फुटले कोंब

17/10/2020,10:45AM
Picture

अभिनेत्री खुशी मुखर्जीच्या घरातून दीड लाख रुपयांची ज्वेलरी चोरीला

अभिनेत्री खुशी मुखर्जीच्या घरातून दीड लाख रुपयांची ज्वेलरी चोरीला, खुशी मुखर्जी सब टीव्ही चॅनेलवरील बालवीर कार्यक्रमात मुख्य भूमिका करते, ही घटना काल घडली, काल खुशीच्या घरी फोटोशूटसाठी तीन मुलं आली होते, खुशीला संशय आहे की या तिघांनीच ज्वेलरी चोरली, मालवणी पोलीस स्टेशनमध्ये खुशीने याबाबतची तक्रार दाखल केली आहे.

17/10/2020,10:42AM
Picture

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावरच होणार कोविड चाचणी

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावरच होणार कोविड चाचणी, रिपोर्ट निगेटिव्ह आला तर लगेच घरी पाठवले जाणार, संपूर्ण विलगीकरनाचा काळ आता हॉटेलमध्ये घालवण्याची गरज नाही, विमानतळावर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ही व्यवस्था करण्यात आलीय, मात्र हे बंधनकारक नसल्याचं विमानतळ प्रशासनाचं म्हणणं

17/10/2020,10:18AM
Picture

वर्ध्यात वार्डातील वर्धमान टेक्सटाईल दुकानासह घराला आग

हिंगणघाट येथील जगन्नाथ वार्डातील वर्धमान टेक्सटाईल या दुकानासह घराला आग, आगीत सहा लोक जखमी, आगीत घरातील चार सदस्यांसह दोन अग्निशामक दलाचे कर्मचारी जखमी, जखमींना सेवाग्राम रुग्णालयात केले दाखल, आगीत 50 लाखांचे नुकसान

17/10/2020,10:12AM
Picture

शरद पवार करणार मराठवाड्याचा दौरा

शरद पवार करणार मराठवाड्याचा दौरा, अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी, तुळजापूर, उमरगा,औसा, परंडा ,उस्मानाबाद येथे पाहणी दौरा करणार, उस्मानाबाद किंवा तुळजापूर येथे मुक्काम करणार, 18-19 ऑक्टोबर रोजी दौरा करणार असल्याची जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांची माहिती

17/10/2020,10:00AM
Picture

पुण्यातील जनता वसाहतीत पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची पाईपलाईन फुटली

पुण्यातील जनता वसाहतीत पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची पाईपलाईन फुटली, 40 घरांमध्ये शिरलं पाणी, पाण्याच्या प्रेशरनं 9 जण जखमी, पाण्याचे लोट थेट नागरिकांच्या घरात, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिक संतप्त, 45 वर्षाची जूनी पाईपलाईन बदलण्याची नागरिकांची मागणी

17/10/2020,9:56AM
Picture

टीव्ही 9 मराठी लाईव्ह

17/10/2020,9:54AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *