LIVE : रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ काढला

LIVE : रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ काढला
Picture

रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ काढला

रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ काढला. हा धक्कादायक प्रकार डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये घडला. या प्रकरणी आरपीएफ जवान मनफूल सिंह विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

18/08/2019,3:25PM
Picture

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्याला अटक

डोंबिवलीत भाजपचा पदाधिकारी संदीप माळी याला अटक केली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यामुळे त्याला अटक केली आहे. संदीप माळीला 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

18/08/2019,3:21PM
Picture

सयाजी शिंदेंच्या आरोपांवर मुनगंटीवारांचं उत्तर

महाराष्ट्रातील वृक्ष लागवड हे नाटक असल्याचं म्हणणंच मोठं नाटक : अभिनेते सयाजी शिंदे यांच्या आरोपांवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं उत्तर

18/08/2019,2:08PM
Picture

पाकव्याप्त काश्मीरवरच आता चर्चा : राजनाथ सिंह

पाकिस्तानसोबत आता पाकव्याप्त काश्मीरवरच चर्चा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं वक्तव्य

18/08/2019,2:05PM
Picture

मुंबईच्या महाराजाची मुर्ती 30 फुटांची

मुंबईचा महाराजा म्हणून ओळखला जाणारा खेतवाडीच्या 11वी गल्लीच्या गणपतीची मुर्ती 30 फुटांची आहे. मुर्ती परेल कारखाना ते खेतवाडीपर्यंत घेऊन जाण्यासाठी मंडळाला मोठी कसरत करावी लागणार आहे.

18/08/2019,10:38AM
Picture

बोरिवलीत धावत्या कारने तिघांना उडवलं, एकाचा मृत्यू, दोन जण जखमी

बोरिवलीत धावत्या कारने तिघांना उडवले. यामध्ये एकाचा मृत्यू झााला, तर दोन जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी या कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

18/08/2019,10:34AM
Picture

कोकणातील 5 ते 6 आमदार भाजपात येण्यास इच्छुक

विरोधीपक्षातील निम्मे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. यासह कोकणातील पाच ते सहा आमदारही भाजपात येण्यास इच्छुक आहेत, असा गौप्यस्पोट भाजपचे प्रसाद लाड यांनी केला.

18/08/2019,10:25AM
Picture

ठाण्यात वर्षा महापौर मॅरेथॉनचं आयोजन

ठाण्यात आज वर्षा महापौर मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होते. तिसावी वर्षा महापौर मॅरेथॉन आज ठाण्यात पार पडली. यामध्ये हजारोंच्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग घेतेला होता. विशेष म्हणजे यामध्ये तृतीयपंथी, तरुण वर्ग आणि ज्येष्ठा नागरिकांनीही सहभाग घेतला होता.

18/08/2019,9:48AM
Picture

मोहन भागवत अरुण जेटलींच्या भेटीला

सरसंघचालक मोहन भागवत अरुण जेटलींच्या भेटीला गेले आहेत. भागवत यांच्याकडून जेटलींच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली.

18/08/2019,9:42AM
Picture

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कालिदास कोळंबकरांचा गोविंदा रद्द

कोल्हापूर-सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आमदार कालिदास कोळंबकर यांनी गोविंदा रद्द केला आहे. कोळंबकर यांच्या नायगाव स्प्रिंग येथे हा गोविंदा आयोजित केला जात होता. 5 लाख 55 हजार रुपये कोळंबकरांनी मुख्यमंत्री सहाय्यनिथीला देण्याचा निर्णय कालिदास कोळंबकर यांनी घेतला.

18/08/2019,9:40AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *