LIVE | नालासोपाऱ्यात थर्माकोल कंपनीला भीषण आग

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी आणि प्रत्येक अपडेटेड बातमी फक्त एका क्लिक वर

LIVE | नालासोपाऱ्यात थर्माकोल कंपनीला भीषण आग
Picture

नाशकात भक्ष्याच्या शोधात बिबट्या पडला विहिरीत

नाशिक : भक्ष्याच्या शोधात बिबट्या पडला विहिरीत, नाशिक जिल्ह्यातील पेठ परिसरातील घटना, बिबट्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू

31/10/2020,6:01PM
Picture

नागपूरमध्ये भारतीय जनता युवा मोरच्यांच्या कार्यकर्त्यांचा पेंग्विनचे पोस्टर घालून आंदोलन

नागपूर : नागपूरमध्ये भारतीय जनता युवा मोरच्यांच्या कार्यकर्त्यांचा पेंग्विनचे पोस्टर घालून आंदोलन, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या ठाकरे सरकारचा निषेध व्यक्त करण्याकरिता युवा मोरच्याच आंदोलन, सोशल मीडियावरुन आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या समित ठक्करला अटक केल्याच्या निषेधार्थ आंदोलन

31/10/2020,6:00PM
Picture

नालासोपाऱ्यात थर्माकोल कंपनीला भीषण आग

नालासोपारा : नालासोपाऱ्यात थर्माकोल कंपनीला भीषण आग, आगीच्या कल्लोळने परिसरात भीतीचे वातावरण, मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पूर्व पेल्हार फाटा जवळ आहे कंतारीया कंपाउंडमध्ये अर्धातासा पूर्वी ही आग लागली आहे. अर्धा ते एक किलोमीटर परिसरात आगीच्या लागत आहेत झळा. वालीव पोलीस, वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल..

31/10/2020,5:58PM
Picture

नवी मुंबईत परवानगी शिवाय वृक्षतोड केल्यास गुन्हा दाखल होणार

नवी मुंबई : परवानगी शिवाय वृक्षतोड केल्यास कारवाई, विनापरवानगी वृक्षतोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार, वृक्ष व पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेचे महत्वाचे पाऊल, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

31/10/2020,8:43AM
Picture

अकोल्यात कोजागिरी पौर्णिमेला महालक्ष्मीची स्थापना

अकोला : शहरातल्या गौरक्षण रोडवरील दत्त कॉलनी मधील शिवाजी तवर याच्या घरी गेल्या 40 वर्षाांपासून महालक्ष्मीची स्थापना, यावर्षीही कोजागिरीला महालक्ष्मीची स्थापना, आज नैवद्य दाखवून उद्या महालक्ष्मीचे विसर्जन, कोजागिरी पौर्णिमेच्या महुर्ताला अकोला शहरात अनेक ठिकाणी महालक्ष्मीची स्थापना करण्यात येते व मोठ्या उत्साहाने महालक्ष्मी पूजन करण्यात येतं

31/10/2020,7:48AM
Picture

वांद्र्यात मेट्रोच्या क्रेनचा अपघात, क्रेनचे दोन भाग, एका महिलेचा मृत्यू

मुंबई : पहाटे अंधेरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मेट्रोच्या क्रेनचा अपघात, मेट्रोची क्रेन वांद्रे येथे जात असताना गुंदावली बस स्टॉपजवळ अपघात, अपघात एवढा भयंकर होता की अपघातात क्रेमचे दोन भाग झाले, क्रेनचा एक भाग पडून बस स्टॉपवर उभी असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला

31/10/2020,7:37AM
Picture

बंजारा समाजाचे धर्मगुरु संत श्री रामराव महाराज यांचं निधन

मुंबई : बंजारा समाजाचे धर्मगुरु संत श्री रामराव महाराज यांचं काल रात्री 11.30 वाजता मुंबई येथील लीलावती रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन, ते 89 वर्षांचे होते, भारतातील तमाम बंजारा समाजावर शोककळा

31/10/2020,7:30AM
Picture

31/10/2020,5:59PM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *