LIVE : चिपळूणमध्ये पूर, एकाचा मृत्यू

दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

LIVE : चिपळूणमध्ये पूर, एकाचा मृत्यू
Picture

चिपळूणमध्ये पूर, एकाचा मृत्यू

रत्नागिरी : चिपळूणमध्ये पूर, पुरात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू, चिपळूणच्या भोगाळे परिसरात सापडला मृतदेह, चिपळूण पोलीस घटनास्थळी दाखल

16/07/2019,9:23AM
Picture

चाळीसगावात बँकेत दरोडा, शहरात खळबळ

चाळीसगाव : हिरापूर रोडवरील जिल्हा बँकेत दरोडा, बँकेत प्रवेश करुन दरोडेखोरांकडून सामानाची तोडफोड, घटनेने शहरात खळबळ, पोलीस घटनास्थळी दाखल, पोलिसांकडून पंचनामा सुरु

16/07/2019,9:25AM
Picture

नाशकात शिवसेना-भाजपमध्ये पोस्टर वॉर

नाशिक : शिवसेना-भाजपमध्ये पोस्टर वॉर, शिवसेनेने भाजप कार्यालयासमोर मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असं बॅनर लावलं, भाजप नेत्या सरोज पांडे यांच्या वक्तव्यानंतर भाजप-शिवसेनेत जुंपली

16/07/2019,8:33AM
Picture

गुरुवारपासून विदर्भात पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

नागपूर : विदर्भाच्या काही भागात पावसाचा अंदाज, गुरुवार आणि शुक्रवारी विदर्भात मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

16/07/2019,8:36AM
Picture

सिद्धीविनायक ट्रस्ट तिवरे ग्रामस्थांच्या मदतीला

मुंबई : रत्नागिरीतील तिवरे धरण फुटी प्रकरणानंतर सिद्धीविनायक ट्रस्ट तिवरे ग्रामस्थांच्या मदतीला, सिद्धीविनायक मंदिर न्यास ग्रामस्थांच्या पुर्नवसनासाठी करणार मदत, शाळा आणि घरे बांधून देण्यासाठी भरीव निधी देणार, सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांची माहिती

16/07/2019,8:41AM
Picture

निम्मा महाराष्ट्र पुन्हा दुष्काळाच्या वाटेवर?

नागपूर : राज्यात 270 तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस, पावसामुळे तालुक्यात भीषण संकट, कमी पावसामुळे शेतकरी हवालदिल, कृषी विभागाच्या आकडेवारीने चिंता वाढवली, महाराष्ट्र दुष्काळाच्या वाटेवर असल्याची भीती

16/07/2019,8:31AM
Picture

अजिंठा लेणी परिसरात गावगुंडांच्या पार्ट्या, पोलिसांचं दुर्लक्ष

औरंगाबाद : अजिंठा लेणी आणि धबधब्याला व्यसनांधाचा विळखा, अजिंठा लेणी आणि धबधबा परिसरात दारु पार्ट्या, पर्यटन स्थळावर परिसरातील गावगुंडाची हुक्का पार्टी, पर्यटन स्थळी येणाऱ्या पर्यटक आणि महिलांना व्यसनांधाचा त्रास, पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष

16/07/2019,8:44AM

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *