LIVE : काही लोकांच्या समाधानासाठी हा ड्रामा : कार्ती चिदंबरम

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

LIVE : काही लोकांच्या समाधानासाठी हा ड्रामा : कार्ती चिदंबरम
Picture

काही लोकांच्या समाधानासाठी हा ड्रामा : कार्ती चिदंबरम

सरकारी संस्थांकडून हा ड्रामा सनसनाटी निर्माण करणे आणि काही लोकांच्या समाधानासाठी सुरु आहे, पी चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम यांचं ट्वीट, कार्ती चिदंबरम आयएनएक्स मीडिया प्रकरणात सध्या जामिनावर

21/08/2019,9:37PM
Picture

पी चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता, सीबीआय आणि ईडी दाखल

पी चिंदबरम पत्रकार परिषद घेऊन घरी परतले, त्यांना काँग्रेस मुख्यालयात शोधण्यासाठी गेलेली सीबीआय टीम त्यांच्या मागेच घरीही पोहोचली, गेट बंद केल्याने सीबीआय टीमने भिंतीवरुन उडी मारुन घरात प्रवेश केला, सीबीआयनंतर ईडीची टीमही दाखल

21/08/2019,9:27PM
Picture

उन्मेश जोशी यांची चौकशी पूर्ण, उद्या राज ठाकरेंची चौकशी

उन्मेश जोशी चौकशीनंतर ईडी कार्यालयातून बाहेर, गुरुवारी फक्त राज ठाकरे यांची चौकशी होणार, उन्मेश जोशी यांची पुन्हा सोमवारी चौकशी होणार

21/08/2019,7:42PM
Picture

मनसे चित्रपट सेना अध्यक्ष मुनाफ पटेल यांना 149 ची नोटीस जारी

21/08/2019,3:07PM
Picture

मनसे कार्यकर्त्यांना 149 कलमांतर्गत प्रतिबंधक नोटीस जारी,

मनसे कार्यकर्त्यांना 149 कलमांतर्गत प्रतिबंधक नोटीस नोटीस जारी, पोलिसांनी बजावलेल्या नोटिसीमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप, मुंबई पोलिसांच्या वतीने मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना नोटीस, मनसे चित्रपट सेना अध्यक्ष मुनाफ पटेल यांना 149 ची नोटीस, या नोटिसीमुळे कार्यकर्ते विरोध करण्याची शक्यता असून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता

21/08/2019,3:03PM
Picture

राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर उद्धव ठाकरेंचं उत्तर

मला वाटत नाही, त्या चौकशीतून काय निघेल, एक-दोन दिवस थांबायला हवं, सगळ्याच प्रश्नांची उत्तरं द्यायला मी काही तज्ज्ञ नाही, राज ठाकरेंच्या ईडी चौकशी प्रकरणी उद्धव ठाकरे यांचं उत्तर

21/08/2019,12:21PM
Picture

कपिल पाटील राज ठाकरेंच्या भेटीला

लोकभारती पक्षाचे कपिल पाटील राज ठाकरे यांच्या भेटीला, राज ठाकरे यांनी ईव्हीएम विरोधात केलेल्या संघटनेत कपिल पाटीलही सहभागी

21/08/2019,11:17AM
Picture

मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा

कल्याण : कल्याण डोंबिवलीतील 100 मनसे कार्यकर्त्यांना CRPC 149 अंतर्गत पोलिसांची नोटीस, राज ठाकरेंच्या ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार टाळण्यासाठी कारवाई

21/08/2019,11:15AM
Picture

राज ठाकरेंची उद्या साडेदहा वाजता चौकशी

मुंबई : कोहिनूर व्यवहार प्रकरण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या सकाळी 10.30 वाजता चौकशी होणार, ईडी कार्यालयात हजेरीचे आदेश

21/08/2019,11:12AM
Picture

काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक

नवी दिल्ली : काँग्रेसने दिल्लीतील नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली, पी चिदंबरम यांना पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा, सुप्रीम कोर्टाकडून चिदंबरम यांना दिलासा नाही

21/08/2019,11:10AM
Picture

नवी दिल्ली : INX मीडिया कथित घोटाळा, माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

21/08/2019,10:49AM
Picture

पुणे : आंबेगावमधील त्रिमुर्ती सोसायटीच्या पार्किंगमधील दोन मोटारसायकल अज्ञातांनी जाळल्या

पुणे : आंबेगावमधील त्रिमुर्ती सोसायटीच्या पार्किंगमधील दोन मोटारसायकल अज्ञातांनी जाळल्या, मंचार पोलीस स्टेशनच्या बाजूलाच असणाऱ्या सोसायटीमधील घटना,

21/08/2019,10:37AM
Picture

ठाणे : तीन दिवस दडी मारलेल्या पावसाची पुन्हा एकदा जोरदार हजेरी

ठाणे : तीन दिवस दडी मारलेल्या पावसाची पुन्हा एकदा जोरदार हजेरी, हवेत गारवा असून ढगाळ वातावरण, पावसामुळे ठाणेकर सुखावले

21/08/2019,10:32AM
Picture

रायगड : दुर्मिळ खवल्या मांजराची खवलं आणि चंदन तस्करांची टोळी गजाआड

रायगड : दुर्मिळ खवल्या मांजराची खवलं आणि चंदन तस्करांची टोळी गजाआड, पोलीस आणि वनविभागाची तस्करांविरोधात मोठी कारवाई, रायगडमधील रोह्यामध्ये आठ जणांना पोलिसांकडून अटक, 40 लाखांचा मुद्देमाल जप्त

21/08/2019,10:30AM
Picture

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची शिवसेनेतील नेत्यांशी चर्चा, सूत्रांची माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची शिवसेनेतील नेत्यांशी चर्चा, सूत्रांची माहिती छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा, भुजबळांना शिवसेनेत प्रवेश देण्यावरून शिवसेनेत दोन गट, मतभेद असल्यामुळं भुजबळ यांच्या प्रवेशाची फक्त चर्चा, भुजबळांना प्रवेश देऊ नये असा म्हणणारा शिवसेनेतला गट सक्रिय झाल्यामुळं भुजबळांच्या पक्षप्रवेशाच्या निर्णयावर खलबतं,

21/08/2019,10:29AM
Picture

पुणे जिल्ह्यात काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर - सूत्रांची माहिती

पुणे जिल्ह्यात काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर सूत्रांची माहिती, भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांची फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती, इंदापूर मतदार राष्ट्रवादी काँग्रेस सोडायला तयार नसल्याने पाटलांच्या हालचाली, काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी मुलगी अंकिता पाटीलसह मुख्यमंत्र्यांची भेट

21/08/2019,10:25AM
Picture

नागपुरात 2 हजार रुपयांच्या वादावरवरुन कुल्फी विक्रेत्याची हत्या

नागपूर : नागपुरात 2 हजार रुपयांच्या वादावरवरुन कुल्फी विक्रेत्याची हत्या, गुन्हे शाखेने एका महिन्याआधी झालेल्या हत्येचा उलगडा, हत्येचा कोणताही पुरावा नसताना खूनाचा छडा लावत तीन आरोपींना बेड्या, कुल्फी विक्रेत्याची दगडाने ठेचून हत्या करुन मृतदेह विहिरीत टाकला होता. कामठी परिसरातील घटना, शेख मतीन असे हत्या झालेल्या कुल्फी विक्रेत्याचे नाव

21/08/2019,10:19AM
Picture

नागपूर : शहरातील 351 मालमत्तांचा लिलाव होणार

नागपूर : शहरातील 351 मालमत्तांचा लिलाव होणार, मनपाचा मालमत्ता कर थकवणाऱ्यांचे प्लॉट, घर लिलावात निघणार, आर्थिक टंचाईचा सामना करणाऱ्या नागपूर महानगरपालिकेचा निर्णय, पालिकेचा 480 कोटींचा मालमत्ता कर थकीत, मालमत्ता जप्तीची नोटीस बजावल्यानंतरंही 351 मालमत्ता धारकांचा प्रतिसाद नाही.

21/08/2019,10:15AM
Picture

कराड : कराड शहरात मध्यरात्री 12.30 च्या सुमारास गोळीबार

कराड : कराड शहरात मध्यरात्री 12.30 च्या सुमारास गोळीबार, पवन सोळवंडे या तरुणावर अज्ञाताने समोरुन 7 गोळया झाडल्या, पवन सोळवंडेचा जागीच मृत्यू

21/08/2019,10:13AM
Picture

भिवंडी शहरात धाग्यावर प्रक्रिया करणाऱ्या सुस्टींग टिओफो मशीन मशीन असलेल्या कारखान्यास आग

भिवंडी शहरातील बद्रा कंपाऊंड, चंदन पार्क अंजूरफाटा येथील कारखान्यास सकाळी 5 वाजता आग लागली, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी, शॉटसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती

21/08/2019,10:10AM
Picture

ठाण्यात मनसे कार्यकर्त्याची आत्महत्या

राज ठाकरे यांना ईडी नोटीस पाठवल्याच्या कारणामुळे ठाण्यातील एका मनसे कार्यकर्त्याची आत्महत्या, प्रवीण चौगुले असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव,

21/08/2019,10:06AM
Picture

ईडीच्या चौकशीचा मानसिक त्रास : मनोहर जोशी

ईडीकडून पुत्र उन्मेष जोशी यांची गेले दोन दिवस आठ-आठ तास चौकशी होत असल्याने आपल्याला मानसिक त्रास झाल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी व्यक्त केली. भाजप नेत्यांशी याबाबत बोललो नसल्याचं त्यांनी सांगितलं

21/08/2019,9:40AM
Picture

वाशी एपीएमसीमध्ये भाज्यांचे दर पूर्ववत

नवी मुंबईत वाशी एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये आज 600 गाड्यांची आवक, भाज्यांचे दर पूर्वस्थितीत, घाऊक बाजारात भाज्या प्रति किलो 10 ते 50 रुपयांपर्यंत, गेल्या पाच दिवसात बाजारात 600 ते 800 गाड्यांची आवक, भाजीपाल्याचे भाव 15 ते 20 टक्क्यांनी कमी

21/08/2019,9:39AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *