LIVE : दहावीचा निकाल जाहीर

LIVE : दहावीचा निकाल जाहीर
Picture

दहावीचा निकाल जाहीर

आज (8 जून) दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परिक्षेसाठी राज्यातील एकूण 16 लाख विद्यार्थी बसले होते. यामध्ये सर्वाधिक निकाल 88.38 कोकण विभागाचा लागला आहे, तर सर्वाधिक कमी निकाल 67.27 नागपूर विभागाचा लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल कमी लागला आहे.

08/06/2019,11:20AM
Picture

हिंगोलीत वादळी वाऱ्यामुळे दोन मोरांचा मृत्यू

हिंगोली : हिंगोलीत वादळी वाऱ्यासह ठिक-ठिकाणी गारपीटीमुळे दोन मोरांचा मृत्यू झाला आहे. ही घटना कळमनुरी तालुक्यातील बोलडा शिवारात घडली. तर रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचेही शेड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

08/06/2019,9:03AM
Picture

मुंबई उपनगरात पावसाची हजेरी

मुंबई उपनगरात पावसाने हजरी लावली आहे. कांदिवली, बोरिवली, मालाड विभागात रिम झिम पाऊस पडत आहे. पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

08/06/2019,8:55AM
Picture

औरंगाबादमध्ये एमआयएम नगरसेवकांचा निषेध

औरंगाबाद : सिद्धार्थ वाघिणीच्या बछड्यांच्या नामकरण कार्यक्रमात महापालिकेने खासदार इम्तियाज जलील यांना निमंत्रण न दिल्यामुळे एमआयएम नगरसेवकांनी निषेध नोंदवला. सिद्धार्थ प्राणी संग्रहालयाच्या दारावरच नगरसेवकांनी निदर्शने केली.

08/06/2019,8:43AM
Picture

उष्माघाताने पोलीस शिपायाचा मृत्यू

वर्ध्यामध्ये उष्मघाताने पोलीस शिपायाचा मृत्यू झाला आहे. बाळकृष्ण इवनाथे असं पोलीस शिपायाचं नाव आहे. ही घटना समुद्रपूर तालुक्यातील उमरी (कुर्ला) बस स्थानकावर घडली. नागपूर जिल्ह्याच्या बेला पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. जिल्ह्यात मागील 15 दिवसात 8 लोकांचा उष्मघाताने मृत्यूचा अंदाज

08/06/2019,8:12AM
Picture

कोल्हापूरमध्ये पावसाची हजेरी

कोल्हापूर : इचलकरंजी शहरामध्ये पहाटेपासूनच विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांमध्ये पाऊस पडल्यामुळे समाधानाचे वातावरण असून शेतकरीही आनंदी झाला आहे. सकाळपासूनच पावसाने हजेरी लावल्यामुळे बाल चिमुकल्यांनी भिजण्याचा आनंद घेतला

08/06/2019,7:39AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *