LIVE : पुण्यात बॉयलरचा स्फोट, दोघांचा मृत्यू

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, एकाच क्लिकवर

LIVE : पुण्यात बॉयलरचा स्फोट, दोघांचा मृत्यू
Picture

पुण्यात बॉयलरचा स्फोट, दोघांचा मृत्यू

पुणे : वेळू गावात बॉयलरचा स्फोट, दोघा कामगारांचा मृत्यू, तर दोघे जखमी, स्फोटामुळे लागलेली आग आटोक्यात

14/08/2019,3:05PM
Picture

डीएसकेंच्या भावाला पोलिस कोठडी

पुणे : डीएस कुलकर्णींच्या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी भाऊ मकरंद कुलकर्णी यांना पोलिस कोठडी, 17 ऑगस्टपर्यंत मकरंद कुलकर्णींना पोलिस कोठडी

14/08/2019,1:33PM
Picture

काँग्रेसचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पूरस्थितीवर चर्चा

मुंबई : काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला, पूरस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा, स्वच्छतेसाठी वाढीव मदत देण्याची मागणी, बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही उपस्थित

14/08/2019,12:05PM
Picture

गडचिरोलीत महापूर, अनेक तालुक्यांचा संपर्क तुटला

गडचिरोली : पुरामुळे अनेक तालुक्यांचा संपर्क तुटला अनेक मार्ग बंद, आलापल्ली-आष्टी-चंद्रपूर मार्ग बंद झाल्यामुळे पाच तालुक्यांचा संपर्क तुटला, मार्गावर दोन ते अडीच फूट पाणी, भामरागड-पर्लाकोटा मार्गही बंद

14/08/2019,9:54AM
Picture

विदर्भात आज हलक्या पावसाचा शक्यता

नागपूर : विदर्भात आज हलक्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज, संपूर्ण विदर्भात सध्या ढगाळ हवामानासह काही भागात पावसाची रिपरिप सुरु

14/08/2019,9:38AM
Picture

सनी देओल नितीन गडकरींच्या भेटीला

नागपूर : सिने अभिनेते आणि लोकसभेचे नवनियुक्त खासदार सनी देओल नितीन गडकरींच्या भेटीला, मंगळवारी रात्री गडकरी यांच्या रामनगर निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेलती

14/08/2019,9:40AM
Picture

कोयना नदीवरील जुना पूल कोसळला, 15 गावांचा संपर्क तुटला

कराड : तालुक्यातील तांबवेतील कोयना नदीवरील जुना पूल कोसळला, बुधवारी पहाटेची घटना, पुरामळे पुलावरील वाहतूक बंद असल्याने मोठी हानी टळली, नवीन पुलाचे बांधकाम अद्याप अपूर्ण

14/08/2019,9:41AM
Picture

वसईत मित्राच्या मदतीने पत्नीचा पतीवर हल्ला

वसई : मित्राच्या मदतीने पत्नीचा पतीवर प्राणघातक हल्ला, हातपाय बांधून अंगावर उकळतं तेल ओतलं, डोळ्यात मिरची पूड टाकली, हातोडीने वार केले, पती गंभीर जखमी, पत्नी आणि मित्र पोलिसांच्या ताब्यात

14/08/2019,9:44AM
Picture

ठाणे महामार्गावर ट्रक पलटला

ठाणे : महामार्गावर ट्रक पलटला, मंगळवारी रात्री 11 वाजताचाची घटना, गोल्ड माईन लॉजिस्टिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा ट्रक ठाणे पूर्व द्रुतगती महामार्गावर सावनी मिलेनियम टॉवरजवळ पलटला, ट्रक उलटल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी, ट्रक चालकाला किरकोळ दुखापत

14/08/2019,9:46AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *