LIVE : उदयनराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याने राजकीय चर्चांना उधाण

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

LIVE : उदयनराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याने राजकीय चर्चांना उधाण
Picture

उदयनराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याने राजकीय चर्चांना उधाण

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ‘वर्षा’वर, पूरग्रस्त भागात तातडीने मदत देण्याची मागणी, राजकीय चर्चा झाल्याचीही माहिती

20/08/2019,10:39PM
Picture

बी आर शेट्टी फायरिंग प्रकरणी छोटा राजनाला 8 वर्षांची शिक्षा

20/08/2019,3:56PM
Picture

20/08/2019,2:56PM
Picture

काँग्रेसच्या इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांचा राजीनामा

20/08/2019,2:13PM
Picture

काँग्रेस प्रभारी खर्गेंना हटवण्याची पक्षांतर्गत मागणी

काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांना हटवण्याची काँग्रेस नेत्यांची मागणी, दिल्लीत हायकमांडकडे मागणी केल्याची सूत्रांची माहिती, खर्गेंऐवजी हिंदी पट्ट्यातला प्रभारी नेमण्याची काँग्रेस नेत्यांची भूमिका

20/08/2019,1:05PM
Picture

शिरोडकर-उन्मेष जोशींची ईडीकडून एकत्रित चौकशी

राजन शिरोडकर ईडी कार्यालयात दाखल, ‘कोहिनूर’ प्रकरणी शिरोडकर आणि उन्मेष जोशी यांची अंमलबजावणी संचलनालयाकडून एकत्र चौकशी

20/08/2019,11:52AM
Picture

नाना पटोलेंच्या पोलखोल यात्रेवरुन काँग्रेसमध्ये नाराजीची चर्चा

काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या पोलखोल यात्रेवरुन पक्षातच नाराजी, वरिष्ठांना विश्वासात न घेता आयोजन केल्याने नाराजीची चर्चा, सूत्रांची माहिती, गटबाजीच्या चर्चा पटोलेंनी नाकारल्या

20/08/2019,11:24AM
Picture

पवारसाहेब, सोडून द्या! पण उडालेल्या कावळ्यांना इतर पक्षांच्या पिंजऱ्यातून पळवणारे कोण होते? शरद पवारांच्या टीकेवर शिवसेनेचा सवाल

कावळ्यांची नाही, तर मावळ्यांची चिंता करावी, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर टीका केल्यानंतर शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून पवारांना सवाल केला आहे. ‘जे कावळे उडाले त्या कावळ्यांना इतर पक्षांच्या पिंजऱ्यातून पळवणारे कोण होते?’ असा प्रश्न शिवसेनेने शरद पवारांना विचारला आहे.

20/08/2019,11:14AM
Picture

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती अद्याप चिंताजनक

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती अद्याप चिंताजनक, गेल्या 11 दिवसांपासून जेटलींवर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु, अनेक नेत्यांकडून जेटलींच्या प्रकृतीची विचारपूस, प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी देशभरातून प्रार्थना,

20/08/2019,11:12AM
Picture

नाशिक -तिहेरी तलाकप्रकरणी सिन्नरला जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल

नाशिक -तिहेरी तलाकप्रकरणी सिन्नरला जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल समीना शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पती आणि सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मानसिक आणि शारीरिक छळ करुन तीनवेळा तलाक म्हणून तलाक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

20/08/2019,11:05AM
Picture

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा आज सहावा स्मृतिदिन

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा आज सहावा स्मृतिदिन, 20 ऑगस्ट 2013 ला पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. दाभोलकर यांची गोळ्या घालून हत्या, सहा वर्षे उलटूनही हत्येतील मुख्य सूत्रधार अद्यापही मोकाट, तपास यंत्रणाचा आणि सरकारचा निषेध करण्यासाठी अनिसचे पुण्यात आज जवाब दो आंदोलन, मुक्ता दाभोलकर आणि हमीद दाभोलकर आंदोलनात सहभागी होणार

20/08/2019,11:03AM
Picture

भारतीय सिनेमातील दिग्गज संगीतकार खय्याम यांचे दीर्घ आजाराने निधन

मुंबई : हिंदी चित्रपट संगीतात आपल्या भावोत्कट शैलीचा ठसा उमटविणारे प्रयोगशील संगीतकार खय्याम यांचे दीर्घ आजाराने निधन, ते ९२ वर्षांचे होते, ‘उमराव जान’, ‘बाजार’, ‘नूरी’, ‘कभी कभी’ यासारख्या चित्रपटातील त्यांची गाणी आजही लोकप्रिय, खय्याम यांच्यावर दुपारी दोनच्या सुमारास चार बंगला स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

20/08/2019,11:00AM
Picture

चंद्रपुरात लहान भावाकडून मोठ्या भावाची दगडाने ठेचून हत्या

चंद्रपुरात लहान भावाकडून मोठ्या भावाची दगडाने ठेचून हत्या, प्रभूदास मेश्राम असे हत्या झालेल्याचे नाव, चंद्रपुरातील बगड खिडकी भागातील घटना, जुन्या वादातून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज, आरोपी भास्कर मेश्राम फरार, पोलिसांकडून शोध सुरु

20/08/2019,10:54AM
Picture

पुणे : तीन दारुगोळा कारखान्याचे कर्मचारी आजपासून एक महिना संपावर

पुणे : तीन दारुगोळा कारखान्याचे कर्मचारी आजपासून एक महिना संपावर, खाजगीकरणाविरोधात संपावर जाण्याचा दारुगोळा कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा निर्णय देशभरातल्या 41 दारुगोळा फॅक्टरीचे 82 हजार कर्मचारी संपावर, पुण्यातील दारुगोळा कारखान्याबाहेर कर्मचाऱ्यांचे आंदोलन

20/08/2019,10:49AM
Picture

नवी दिल्ली : आज भाजपची महत्त्वपूर्ण बैठक

नवी दिल्ली : आज भाजपची महत्त्वपूर्ण बैठक, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन, भाजपचे कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक, बैठकीला महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी भुपेंद्र यादव, सरोज पांडे यांच्यासह हरियाणा आणि झारखंडचे निवडणूक प्रभारी उपस्थित राहणार

20/08/2019,10:43AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *