LIVE : ठाण्यात कुकर ब्लास्ट, दोघे जण जखमी

LIVE : ठाण्यात कुकर ब्लास्ट, दोघे जण जखमी
Picture

ठाण्यात कुकर ब्लास्ट, दोघे जण जखमी

ठाण्यात कुकर ब्लास्टमुळे दोघे जण जखमी झाले आहेत. यामध्ये महिला 30 टक्के भाजली असून लहान मुलगा किरकोळ जखमी झाला आहे. ठाण्याच्या लुईसवाडी चाळीत ही घटना घडली. कुकर ब्लास्टमध्ये घराचं मोठं नुकसान झालं आहे.

08/09/2019,12:36PM
Picture

मुरबाड तालुक्यातील पळू येथे बिबट्याची दहशत

मुरबाड तालुक्यातील पळू येथे बिबट्याची दहशत नारिकांमध्ये निर्माण झाली आहे. मुरबाड येथील शेतात जनावरांवर या बिबट्याने हल्ला करुन एका वासराला मारले आहे. बिबट्याच्या पायाचे ठसे दिसत असल्याने नागरिकांच्यात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

08/09/2019,11:56AM
Picture

नंदुरबारमध्ये विजेचा धक्का लागून तीन कुत्र्यांचा मृत्यू

नंदुरबारमध्ये विजेचा धक्का लागून तीन कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. तर एक महिला गंभीर जखमी आहे. विजेच्या पोलात वीज प्रवाह उतरल्याने रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना विजेचा धक्का बसला. वीज वितरण कंपनीकडे तक्रार करुन एका तासापासून कुणीही कर्मचारी न आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

08/09/2019,9:54AM
Picture

नागपूरमध्ये आई आणि मुलाची हत्या

नागपूरमध्ये आई आणि मुलाची हत्या झाली आहे. 4 वर्षीय चिमुकल्यासह आईची हत्या करण्यात आली आहे. प्रियंका शाहू (25) आणि अंशुल (4) अशी मृतांची नावं आहेत. शेजारी भाड्याने राहत असलेल्या युवकाने चोरीच्या उद्देशाने हत्या केल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.

08/09/2019,9:51AM
Picture

ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचे निधन

08/09/2019,9:11AM
Picture

कोल्हापुरात पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता

08/09/2019,8:12AM
Picture

पुढील चार तासात मुसळधार पावसाचा इशारा

08/09/2019,7:44AM
Picture

मुंबईतील रेल्वेसेवा कोलमडली

08/09/2019,7:38AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *