Live Update : औरंगाबादमध्ये निर्दयी काकाने पुतण्याला दिले चटके

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट, ब्रेकिंग न्यूज, मुंबई-महाराष्ट्रातील मोठ्या घडामोडी एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर (Live Update Breaking News)

Live Update : औरंगाबादमध्ये निर्दयी काकाने पुतण्याला दिले चटके
Picture

'नाथाभाऊ...लवकर राष्ट्रवादीत या', राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची एकनाथ खडसेंना विनंती

16/10/2020,11:22AM
Picture

‘काका पळू नका, वयाच्या दृष्टीने ठीक नाही’, राहुल वैद्यचा एजाज खानला टोला!

16/10/2020,11:21AM
Picture

जळगावात चौघांची कुऱ्हाडीने हत्या, शेतात मृतदेह सापडल्याने खळबळ

16/10/2020,11:20AM
Picture

ट्विटरकडून डोनाल्ड ट्रम्प यांना झटका, अकाऊंट ब्लॉक

16/10/2020,11:19AM
Picture

औरंगाबादमध्ये निर्दयी काकाने पुतण्याला दिले चटके

औरंगाबादमध्ये निर्दयी काकाने पुतण्याला दिले चटके, औरंगाबादच्या कांचंनवाडी भागातली घटना, घरातील पैसे चोरल्याच्या संशयातून दिले चटके, माता पित्यांचं छत्र हरवलेला पुतण्या राहत होता काकांकडे, चटके दिलेल्या पुतण्याला झाली गंभीर दुखापत, चटके देणाऱ्या निर्दयी काकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

16/10/2020,11:11AM
Picture

बीडमध्ये नुकसान भरपाईसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

बीडमध्ये नुकसान भरपाईसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, राष्ट्रीय मरामार्गावर रस्ता रोको, मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, एक तासापासून राष्ट्रीय महामार्ग ठप्प, धुळे- सोलापूर मार्गावरील गेवराईत रस्ता रोको

16/10/2020,11:06AM
Picture

पुण्यात लक्ष्मीनगर येरवडा येथे अज्ञातांनी 5 दुचाकी जाळल्या

पुण्यात लक्ष्मीनगर येरवडा, संतोष मित्र मंडळ येथे पहाटे अज्ञात इसमांनी 5 दुचाकी जाळल्या, कारण अद्याप अस्पष्ट, घटनास्थळी पोलीस दाखल

16/10/2020,11:01AM
Picture

औरंगाबादमध्ये सात वर्षाच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

औरंगाबादमध्ये सात वर्षाच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न, औरंगाबादच्या वडगाव कोल्हाटी भागातली घटना, ओठाचा चावा घेतल्याने मुलीचा ओठ तुटला, मुलीला घाटी रुग्णालयात केलं दाखल, बलात्काराचा प्रयत्न करणार आरोपी फरार, घटनास्थळी पोलीस दाखल

16/10/2020,10:59AM
Picture

रस्ता खचल्याने सिंधुदुर्ग करूळ घाट वाहतुकीस बंद

रस्ता खचल्याने सिंधुदुर्ग करूळ घाट वाहतुकीस बंद, वैभववाडी येथील कोल्हापूरला जोडणारा करूळ घाट खचल्यामुळे वाहतूक बंद, गेले दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे रात्री गगनबावडा पासून 2 किमी अंतरावर घाट खचला, त्यामुळे खबरदारी म्हणून या घाट मार्गावरील वाहतूक बंद करून वाहतूक फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली आहे.

16/10/2020,10:49AM
Picture

औरंगाबादमध्ये इंग्रजी शाळा तोडफोड प्रकरणी संस्थचालक आक्रमक

औरंगाबादमध्ये इंग्रजी शाळा तोडफोड प्रकरणी संस्थचालक आक्रमक, आजपासून औरंगाबाद शहरातील सर्व इंग्रजी शाळा बंद, इंग्रजी शाळातील ऑनलाइन शिकवण्याही केल्या बंद, शाळेतील दैनंदिन कामकाजही केलं बंद, जैन इंटरनॅशनल शाळा तोडफोड प्रकरणी संस्थाचालकांचा पवित्र, मनसेच्या कार्यकर्त्यांनी काल केली होती जैन इंटरनॅशनल शाळेत तोडफोड

16/10/2020,10:30AM
Picture

मराठवाड्यात परतीच्या पावसानं झालेल्या नुकसानीचे लवकरंच पंचनामे : वडेट्टीवार

मराठवाड्यात परतीच्या पावसानं झालेल्या नुकसानीचे लवकरंच पंचनामे, राज्य सरकार कर्ज काढेल, पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, केंद्र सरकारने नुकसानीची पाहणी करण्यासाठी टीम पाठवण्याची विनंती, केंद्रानंही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

16/10/2020,10:26AM
Picture

टीव्ही 9 मराठी लाईव्ह

16/10/2020,10:25AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *