LIVE | शहीद जवान नितीन भालेराव यांच पार्थिव शासकीय वाहनाने त्यांच्या घरी दाखल

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट, महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर (tv9 marathi live)

LIVE | शहीद जवान नितीन भालेराव यांच पार्थिव शासकीय वाहनाने त्यांच्या घरी दाखल
Follow us
| Updated on: Nov 29, 2020 | 5:34 PM

[svt-event title=”शहीद नितीन भालेराव यांचं पार्थिव दाखल, वंदे मातरमच्या घोषणा” date=”29/11/2020,5:33PM” class=”svt-cd-green” ] शहीद जवान नितीन भालेराव यांच पार्थिव शासकीय वाहनाने त्यांच्या घरी दाखल झाले आहे. वंदे मातरम,भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आहे. छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी घडवून आलेल्या IED स्फोटात सीआरपीएफचे अधिकारी असलेले नाशिकचे सुपुत्र सहाय्यक कमांडंट नितीन भालेराव शहीद झाले होते. [/svt-event]

[svt-event title=”उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता” date=”29/11/2020,2:37PM” class=”svt-cd-green” ] अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेत सोमवारी (30 नोव्हेंबर) प्रवेश करण्याची शक्यता आहे. शिवसेनेने राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागांसाठी उर्मिला मांतोडकर यांच्या नावाची शिफारस केल्याची चर्चा आहे. [/svt-event]

[svt-event title=”जातीपातीचं राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवा, नितीन गडकरींचे आवाहन” date=”29/11/2020,2:33PM” class=”svt-cd-green” ] नागपूर: आपला परिवार हा आपला समाज, आपलं नागपूर आहे, हे मी सांगितलं आणि कोरोनाच्या काळात मदत केली. सुरुवातीच्या काळात पीपीई किट आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी नव्हत्या आम्ही पर्याय काढला एका कंपनीला किट बनवायला लावल्या आणि त्यांच्या पर्यंत पोहचविले. त्यात जाती पाहून देण्यात आल्या नाही. जातीच राजकारण नाही तर विकासच आणि मानवतेचा राजकारण केलं पाहिजे. मात्र, आता ज्याप्रमाणे विरोधी पक्ष जातीच राजकारण करत आहे, त्यांना धडा शिकवायला पाहिजे. ज्यांनी मत दिली त्यांच्यासाठी तर काम कराच पण ज्यांनी नाही दिल त्यांच्या साठी सुद्धा चांगलं काम करा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा सल्ला [/svt-event]

[svt-event title=”मराठा क्रांती मोर्चाचे 8 डिसेंबरपासून मातोश्रीसमोर उपोषण” date=”29/11/2020,12:37PM” class=”svt-cd-green” ]औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चा 8 डिसेंबरपासून मातोश्रीसमोर करणार उपोषण,मराठा जागृती रथयात्रेला परवानगी नाकारल्यानंतर क्रांती मोर्चाची घोषणा, कोपर्डीतील पीडित मुलीच्या आईवडीलांसह समन्वयक करणार उपोषण, औरंगाबादेत मशाल पेटवून केली उपोषणाची घोषणा, मराठा समन्वयक मातोश्रीसमोर करणार आमरण उपोषण [/svt-event]

[svt-event title=”इतर समाजाच्या लोकांनी गैरसमज करुन घेऊ नये, उदयनराजेंची भूमिका” date=”29/11/2020,12:19PM” class=”svt-cd-green” ] जे बोलतो ते स्पष्ट बोलतो. इतर समाजावर अन्याय झाला तरी त्यांचीही बाजू मांडत आलेलो आहे. इतर समाजाच्या लोकांनी गैरसमज करुन घेऊ नये. त्यांच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. [/svt-event]

[svt-event title=”सत्तेत आहात ना मराठा आरक्षणाचा प्रश्न पुढं न्या, उदयनराजेंचे आव्हान” date=”29/11/2020,12:17PM” class=”svt-cd-green” ] देवेंद्र फडणवीस हे आपल्याच वयाचे आहेत. त्यांनी आरक्षण टिकवलं, त्यांना नाव ठेवली जातात. आता सत्तेत आहात ना मराठा आरक्षणाला पुढे न्या. सत्तेत राहायचंय ना, महाराष्ट्र आहे, मराठा समाज निर्णायक जात आहे. जातीतला कोणताही उमेदवार असू देत, त्याच्याकडून मराठा आरक्षणाचा प्रश्न तडीला लावणार, असं आश्वासन घ्या. [/svt-event]

[svt-event title=”मराठा समाजानं काय पाप केलय?, उदयनराजेंचा सवाल” date=”29/11/2020,12:12PM” class=”svt-cd-green” ] आतापर्यत मराठा मोर्चे निघाले हिंसा झाली नाही, पण आता किती दिवस मागायचं, याच उत्तर सरकारने दिला पाहिजे, अजूनही ते सत्तेत आहे.त्यांना सखोल माहिती आहे, एवढे वर्ष मराठा समाजाचा प्रश्न प्रलंबित का राहिला? मंडल आयोग लागू करताना मराठा समाजाचा विचार का झाला नाही मराठा समाजचा सोयी प्रमाणे विसर पडला. हा राज्यस्तरीय विषय आहे, यात राज्याने पुढाकार घ्यायला हवा होता. त्यावेळी जे कोणी पुढारी होते त्यांनी यावर भाष्य करावं, मराठा समाजातील तरुण तरुणींची ही मागणी आहे. इतरांचं आम्हाला मागायचं नाही, एखादा मराठा मोर्चा निघाला की त्याला काउंटर करायला दुसरा मोर्चा कशासाठी, मराठा समाजाने अस काय पाप केलय,शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभाव हा विचार दिला, आज या लोकांनी जाती जातीत तेढ निर्माण करण्याच पाप केलं. [/svt-event]

[svt-event title=”मंडल आयोगावेळी मराठा समाजाचा विचार का केला नाही?, उदयनराजेंचा सवाल” date=”29/11/2020,12:02PM” class=”svt-cd-green” ] मला समजत नाही, की शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं. सर्वधर्म समभावाचा विचार सांगायचा आणि एखाद्या समाजाला दाबण्याचं काम अनेक वर्षांपासून झालं आहे. मी मराठा म्हणून जन्माला आलो असलो तरी मराठा म्हणून बोलत नाही. शिवाजी महाराजांच्या विचारांचा आधार घेऊन, प्रत्येक समाजाला न्याय मिळायला हवा या भूमिकेतून आज मुद्दे मांडणार आहे. किती दिवस मराठा समाजाचा अंत पाहणार आहात. मंडल आयोगावेळी मराठा समाजाचा विचारा का केला नाही?, असा सवाल उदयनराजेंनी विचारला आहे. [/svt-event]

[svt-event title=”खासदार उदयनराजेंची मराठा आरक्षणासंदर्भात साताऱ्यात पत्रकार परिषद ” date=”29/11/2020,11:41AM” class=”svt-cd-green” ] मराठा आरक्षणासंदर्भात खासदार उदयनराजे भोसले सातारा येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये ते विविध मराठा आरक्षण, विद्यार्थी प्रवेश यासंदर्भात बोलण्याची शक्यता आहे. [/svt-event]

[svt-event title=”मराठा क्रांती मोर्चाची पुण्यात बैठक, संभाजीराजे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार” date=”29/11/2020,11:26AM” class=”svt-cd-green” ] मराठा क्रांती मोर्चाची पुण्यात आज राज्यस्तरीय निर्णायक बैठक होत आहे, मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक व नोकरी किंवा इतर बाबतीत सरकार न्याय देऊ शकेल का यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. शिवाय आंदोलनाची पुढील दिशा या बैठकीत ठरवली जाणार आहे. वकील , तज्ञ , मराठा आरक्षण अभ्यासक यांनी तयार केलेले मुद्दे या बैठकीत मांडले जाणार आहेत. या बैठकीत छत्रपती संभाजीराजे हे १२ वाजता दिल्ली येथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आलीय. त्यामुळे आजच्या या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. [/svt-event]

[svt-event title=”सिंधुदुर्गमधील कुडाळ बसस्थानकात मनसेचे अनोखे आंदोलन” date=”29/11/2020,11:28AM” class=”svt-cd-green” ] सिंधुदुर्ग: गेली वर्षभर कुडाळ स्थानकाच्या नवीन इमारतीचं काम सुरू आहे. सुमारे अडीच कोटी निधी मंजूर करून अद्यापही एसटी स्थानकाच्या इमारतीचं काम अपूर्णचं, तसेच स्थानकाच्या आवारात भटकी कुत्री आणि गुराढोराचं वास्तव्य असल्यामुळे येथे घाणीचं साम्राज्य पसरलंय.एसटी प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराचा निषेध करून मनसेने एसटी स्थानकाच्या आवारात चक्क क्रिकेट खेळून आंदोलन केलं. अनेक वेळा प्रशासनाचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष होत असल्यामुळे बसस्थानकाच्या आवारात एसटी प्रशासनाच्या निषेधाचे बॅनर लावण्यात आले. कुडाळ डेपो व्यवस्थापक डोंगरे यांना मनसे स्टाईलने विचारण्यात आला जाब.प्रवाशांच्या गैरसोयीकडे दुर्लक्ष केल्यास बस स्थानकाच्या आवारात भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणार असल्याचा मनसेचा इशारा. [/svt-event]

[svt-event title=”पंतप्रधानांच्या मन की बातमध्ये बळिराजाविषयी चकार शब्द नाही, अमोल मिटकरींचे टीकास्त्र” date=”29/11/2020,11:31AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सांगलीत रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात, एकाचा मृत्यू” date=”29/11/2020,11:23AM” class=”svt-cd-green” ] सांगली: खड्ड्यांचे साम्राज्य असलेल्या सांगली – इस्लामपूर रस्त्याने आष्ट्याजवळ आज आणखी एक बळी घेतला. रस्त्यावरील खड्ड्यात मोटरसायकलचे चाक जावून झालेल्या अपघातात अंकलखोप येथील उदयसिंह बाळासो गायकवाड हे जागीच ठार झाले. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाले आहे. सांगली-इस्लामपूर हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर हजारो मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना मोटरसायकल स्वारांसह प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. पलूस तालुक्यातील अंकलखोप येथील उदयसिंह बाळासो गायकवाड (वय४०) हे मोटरसायकलवरून भिलवडीकडे जात असताना आष्टा येथील आष्टा लायनर्स समोर आले असता मोटरसायकलचे पुढील चाक रस्त्यावरील खड्ड्यात गेले. यामुळे उदयसिंह गायकवाड यांचा मोटरसायकलवरील ताबा सुटला आणि मोटरसायकल वरुन ते रस्त्यावर पडले. यावेळी त्यांचे डोके रस्त्यावर आपटल्याने गंभीर दुखापत होऊन ते जागेवरच ठार झाले. [/svt-event]

[svt-event title=”TV9 Marathi Live | टीव्ही 9 मराठी लाईव्ह” date=”29/11/2020,11:22AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.