LIVE : आता धनगर समाजाचीही कोल्हापुरात गोलमेज परिषद

LIVE UPDATE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 29 सप्टेंबर | ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या अपडेट एकाच ठिकाणी

LIVE :  आता धनगर समाजाचीही कोल्हापुरात गोलमेज परिषद
Picture

आता धनगर समाजाचीही कोल्हापुरात गोलमेज परिषद

कोल्हापूर : मराठा समाजानंतर आता धनगर समाजाची गोलमेज परिषद कोल्हापुरात, 2 ऑक्टोबरला कोल्हापुरात गोलमेज परिषदेचं आयोजन. कोल्हापुरातील दसरा चौक इथल्या छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून गोलमेज परिषदेला सुरुवात होणार. धनगर आरक्षण समन्वय समितीच्यावतीने या गोलमेज परिषदेचे आयोजन. राज्यभरातील धनगर समाजाचे नेते गोलमेज परिषदेमध्ये सहभागी होणार. धनगर सारे एक हे ब्रीद वाक्य घेऊन गोलमेज परिषदेच आयोजन. धनगर समाजाच्या प्रतिनिधींची कोल्हापुरात पत्रकार परिषदेत माहिती

29/09/2020,1:49PM
Picture

मराठा आरक्षणामुळे ओबीसी समाजातील छोटे समाज भयभीत : प्रकाश शेंडगे

ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठा आरक्षण द्यावे अशी मागणी काही नेते करत आहेत. अशा मागणीमुळे ओबीसी समाजात जे छोटे समाज हे भयभीत झाले आहेत. हे सर्व चुकीचे सुरू आहे. दोन समाजात वाद निर्माण केला जात आहे. म्हणून येत्या 8 तारखेला ‘ओबीसी आरक्षण बचाव’ आंदोलन केलं जाणार, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आणि निवेदन देणार. त्यानंतर पुढच्या टप्पातील आंदोलन हे तहसीलदार कार्यालय समोर केले जाईल ज्याची तारीख नंतर जाहीर केली जाईल. जे मराठा समाजाला दिलं जात आहे तसे लाभ ओबीसी समाजाला दिले पाहिजेत अशीही आमची मागणी आहे. मेगाभरती थांबवली पाहिजे अशीही आमची मागणी आहे. आम्ही मराठा समाजाबरोबर आहोत.

29/09/2020,1:24PM
Picture

दोन पक्षांचे बडे नेते राजकारणावरच चर्चा करणार ना, चहा-बिस्किटावर नाही : चंद्रकांत पाटील

29/09/2020,1:24PM
Picture

चंद्रकांत पाटील 32 तारखेची वाट बघू लागले, भाजपचा रात्रीचा खेळ संभ्रम निर्माण करणारा : अब्दुल सत्तार

29/09/2020,1:23PM
Picture

राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार? अब्दुल सत्तार म्हणतात...

29/09/2020,1:23PM
Picture

केंद्राला कायदा करण्याचा अधिकार, तसाच राज्यालाही : बाळासाहेब पाटील

राज्यात यावर्षी उसाचे उत्पन्न प्रचंड आहे. यासाठी सगळे कारखाने संपूर्ण क्षमतेने चालले पाहिजेत. 15 ऑक्टोबरला हंगाम सुरू व्हावा ही अपेक्षा आहे. जास्त साखर निर्माण झाल्यामुळे साखर दर पडतात. इथेनॉल पॉलिसीनुसार प्रोत्साहन देणे, थोनॉल वाढ कशी करता येईल याचे प्रयत्न आहे, केंद्राला कायदा करण्याचा अधिकार आहे तसा राज्याला आहे. APMC बाबत त्यांनी कायदा केला. पण आमच्या नेत्यांनी आधीच स्पष्ट केलं शेतकरी हितानुसार आम्ही निर्णय घेऊ. त्याबाबत विभागाच्या वतीने कायदेशीर मार्गदर्शनानुसार कारवाई करू. भूमिका दुटप्पी नाही,शेतकरी हिताचा निर्णय घेऊ – बाळासाहेब पाटील, सहकार मंत्री

29/09/2020,1:22PM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *