LIVE : भाजपाध्यक्षांची निवड डिसेंबरमध्ये

LIVE : भाजपाध्यक्षांची निवड डिसेंबरमध्ये
Picture

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रश्मी बागल, बंधू दिग्विजय बागल उद्या शिवसेनेत प्रवेश करणार

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रश्मी बागल, बंधू दिग्विजय बागल उद्या शिवसेनेत प्रवेश करणार, दुपारी 12 वाजता मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश, करमाळ्यातील बागल गटाच्या मेळाव्यात शिवसेना प्रवेशाची घोषणा

19/08/2019,12:46PM
Picture

चंद्रपूर:- शहरालगत पद्मापुर खुल्या कोळसा खाणीत वाघाचा संचार

चंद्रपूर:- शहरालगत पद्मापुर खुल्या कोळसा खाणीत वाघाचा संचार, खाण क्र. 3 च्या झुडूपात वाघाचे वास्तव्य, खाणीच्या भागातील वाघ संचाराचा व्हिडीओ वायरल, खुल्या कोळसा खाणी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राजवळ आहे. या भागात सतत वन्यजीवांचे वास्तव्य असते, कोळसा खाण व्यवस्थापनाकडून सावधगिरीचे उपाय सुरु

19/08/2019,12:43PM
Picture

रत्नागिरी : खेड कोकण रेल्वे स्थानकात मनोरुग्णाचा धुमाकूळ

रत्नागिरी : खेड कोकण रेल्वे स्थानकात मनोरुग्णाचा धुमाकूळ, खेड रेल्वे स्थानकावर दगडफेक, दगडफेकीत एक प्रवासी गंभीर जखमी, तसेच मनोरुग्णांकडून कोकण रेल्वेच्या कार्यालयाची तोडफोड, मनोरुग्णांना पकडण्यासाठी आजूबाजूच्या गावकऱ्यांनी जंगलात शोध सुरु

19/08/2019,12:41PM
Picture

भाजपाध्यक्षांची निवड डिसेंबरमध्ये

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड डिसेंबर महिन्यात, कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा तूर्तास जे. पी. नड्डा यांच्याकडेच

19/08/2019,12:07PM
Picture

कोहिनूर प्रकरणी ईडीच्या नोटिशीनंतर उन्मेष जोशी यांची प्रतिक्रिया

ईडीने भेटायला बोलावलं आहे, तिथे गेल्यावर काय प्रश्न आहेत हे समजेल, कागदपत्रं हवी असतील तर सुपूर्द करणार, कोहिनूर प्रकरणी ईडीच्या नोटिशीनंतर उन्मेष जोशी यांची प्रतिक्रिया

19/08/2019,10:24AM
Picture

येत्या 8 ऑक्टोबरपासून spicejet द्वारे औरंगाबाद दिल्ली विमान सेवा सुरु

येत्या 8 ऑक्टोबरपासून spicejet द्वारे औरंगाबाद दिल्ली विमान सेवा सुरु, सकाळी 6 वाजता विमानसेवा सुरु होणार, गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबाद दिल्ली विमानसेवा सुरु करावी अशी मागणी स्थानिकांतर्फे करण्यात येत होती.

19/08/2019,10:22AM
Picture

कोहिनूर प्रकरणी मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया

नवी भारताचे नवीन हिटलर जर कोणी असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. जो तुमची प्रकरणं बाहेर काढेल, जो तुमच्याविरोधात बोलेल, त्याच्यावर दबावतंत्र आणण्याचा प्रयत्न भाजपचा आहे, कोहिनूर प्रकरणी मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया

19/08/2019,10:19AM
Picture

चंद्रपूर : खाद्य तेलाच्या टँकरचा अपघातानंतर तेलासाठी लोकांची झुंबड

चंद्रपूर : खाद्य तेलाच्या टँकरचा अपघातानंतर तेलासाठी लोकांची झुंबड, नागभीड-नागपूर मार्गावरील मोहाडीजवळची घटना, सकाळी खाद्य तेलाचा टॅंकर अपघात, वाहून जाणारे तेल एकत्र करण्यासाठी नागरिकांची धडपड, खाद्य तेल मिळविण्यासाठी मिळेल ती साधने भांडे , प्लास्टिक डबे घेऊन तेलासाठी लोकांची झुंबड, तेलाची साठवण करण्यासाठी नागरिक सरसावले, अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

19/08/2019,10:17AM
Picture

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्ग ठप्प

रत्नागिरी : मुंबई – गोवा महामार्ग ठप्प, खेड येथील खोपी फाटा येथे एका ब्रीजवर अवजड वाहतूक करणारा टेलर बंद पडल्याने वाहतूक ठप्प, हा टेलर मोठ्या टाक्या घेऊन मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जात असताना बंद पडला. पोलीस व मदत ग्रुपचे सदस्य घटनास्थळी दाखल

19/08/2019,10:14AM
Picture

औरंगाबाद : औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेसाठी आज मतदान

औरंगाबाद : औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेसाठी आज मतदान, 657 मतदार विधानपरिषद आमदारासाठी मतदान करणार, जालन्यातील 17 मतदान केंद्रावर मतदान होणार, शिवसेनेकडून आंबदास दानवे तर काँग्रेसकडून बाबुराव कुलकर्णी हे उमेदवार, शिवसेना भाजपची मतदार संख्या जास्त, निवडणुकीत कोणचा विजय होणार याची उत्सुकता

19/08/2019,10:13AM
Picture

उन्मेष जोशींना ईडीची नोटीस आली, याबद्दल मला माहिती नाही - मनोहर जोशी

कोहिनूर प्रकरणी उन्मेष जोशींना ईडीची नोटीस आली, याबद्दल मला माहिती नाही. कोहिनूर स्क्वेअर मी सर्व जबाबदारी उन्मेष जोशींना दिली आहे. पण शिवसेना नेते म्हणून अभ्यास करुनच यावर बोलीन – शिवसेना नेते मनोहर जोशी

19/08/2019,10:10AM
Picture

धुळे : औरंगाबाद-शहादा एसटी बसला धुळ्यात भीषण अपघात, 15 प्रवाशांचा मृत्यू

औरंगाबाद-शहादा एसटी बसला धुळ्यात भीषण अपघात, 15 प्रवाशांचा मृत्यू, 35 जण जखमी, धुळे जिल्ह्यातील निमगुळ गावाजवळ मालवाहू कंटेनर आणि एसटीची समोरासमोर धडक होऊन अपघात

19/08/2019,10:05AM
Picture

डोंबिवली : मिशन मंगल चित्रपटादरम्यान थिएटरच्या बाल्कनीचा भाग कोसळला

डोंबिवली : मिशन मंगल चित्रपटादरम्यान थिएटरच्या बाल्कनीचा भाग कोसळला, 2 जण जखमी, रामनगर पोलीस दीड तासांनी घटनास्थनी दाखल

19/08/2019,10:02AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *