LIVE : काँग्रेस आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा राजीनामा, शिवसेनेत प्रवेश करणार

LIVE : काँग्रेस आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा राजीनामा, शिवसेनेत प्रवेश करणार
Picture

काँग्रेस आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा राजीनामा, शिवसेनेत प्रवेश करणार

काँग्रेसचे श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा आमदारकीचा राजीनामा, लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार

31/08/2019,10:55PM
Picture

महाराष्ट्राला लवकरच नवीन राज्यपाल मिळणार : सूत्र

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते भगत सिंग कोश्यारी महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल होणार असल्याची सूत्रांची माहिती, विद्यमान राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपत असल्याने नवीन राज्यपाल

31/08/2019,10:21PM
Picture

काँग्रेस आमदार जयकुमार गोरे उद्या भाजपात प्रवेश करणार

माण मतदारसंघातील दुष्काळी जनतेच्या प्रश्नासाठी भाजपात जाण्याचा निर्णय, चार वर्षात शक्य झालं नाही ते मुख्यमंत्र्यांनी चार दिवसात करुन दाखवलं, 64 दुष्काळी गावांचा पाणी प्रश्नाचा विषयी मार्गी लावला, जयकुमार हे माण-खटावच्या जनतेचं टार्गेट नाही, तर बारामती आणि फलटणकरांचं टार्गेट आहे, या सगळ्यांना मी पुरुन उरेन, काँग्रेस सोडण्यापूर्वी प्रतिक्रिया

31/08/2019,9:28PM
Picture

जळगाव घरकुल घोटाळा | गुलाबराव देवकर, सुरेश जैन यांच्यासह 48 आरोपी दोषी, शिक्षेबाबत थोड्याच वेळात धुळे जिल्हा न्यायालयात सुनावणी

31/08/2019,2:01PM
Picture

देवकर-जैन यांच्यासह 48 जणांना ताब्यात घ्या

धुळे : माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि सुरेश जैन यांच्यासह 48 आरोपींना ताब्यात घेण्याचे धुळे जिल्हा न्यायालयाचे आदेश

31/08/2019,1:43PM
Picture

युतीधर्मात गद्दारी करणार नाही : आदित्य ठाकरे

जालना : युती धर्मात आमच्याकडून कोणतीही गद्दारी होणार नाही, आदित्य ठाकरेंची ग्वाही, महाराष्ट्र फिरुन झाल्यावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेईन, विधानसभा निवडणूक लढवण्यावर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण

31/08/2019,1:25PM
Picture

भीम आर्मीचा अमित शाहांची सभा उधळण्याचा इशारा

#सोलापूर – गृहमंत्री अमित शाहांची सभा उधळून लावण्याचा भीम आर्मीचा इशारा, उद्याच्या अमित शाहांच्या सभेला भीम आर्मी सोलापूरचा विरोध, राज्यातील दलित सुरक्षित नाहीत आणि मुख्यमंत्री, गृहमंत्री सभा घेत फिरत असल्याचा भीम आर्मीचा आरोप

31/08/2019,12:55PM
Picture

शिवसेनेच्या मंत्र्यांचा बँकेत ठिय्या

उस्मानाबाद – शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याने पालकमंत्री तानाजी सावंत यांचा राष्ट्रीयकृत बँकेत ठिय्या, सेना खासदार ओमराजे निंबाळकर,आमदार ज्ञानराज चौघुले,नगराध्यक्ष मकरंद राजेंसह शिवसैनिक बँकेत, पीककर्ज, कर्जमाफी, मुद्रा कर्ज मिळत नसल्याने सेनेचे मंत्री आढावा घेण्यासाठी बँकेत

31/08/2019,12:53PM
Picture

धुळ्यात केमिकल फॅक्टरीत स्फोट, 7 जणांचा मृत्यू

धुळे : शिरपूर येथील केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला. स्फोटानंतर भीषण आग लागली. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

31/08/2019,10:50AM
Picture

आदित्य ठाकरेंकडून निवडणूक लढवण्याचे संकेत

आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. बऱ्याच ठिकाणीहून लढण्यासाठी शिवसैनिक आग्रह करत आहेत. मी लोकांकडून जाणून घेतो मी लढू की नको. पूर्ण महाराष्ट्र माझा मतदारसंघ. मी सगळीकडे काम करतो आहे.

31/08/2019,10:54AM
Picture

अनिल परब यांची प्रतिक्रिया

वरळी विधानसभेच्या शिवसैनेच्या गटप्रमुख यांचा मेळावा झाला या मेळाव्यात वरळी विधानसभेचे आमदार सुनील शिंदे, माजी आमदार सचिन अहिर, गटप्रमुखांनी मागणी केली की वरळी विधानसभेत आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी. यावेळेला मी असं म्हणालो की उद्धव साहेबांकडे साकडे घालू, आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभेत निवडणूक लढवावी. जर आधीच साहेबांनी ही विनंती मान्य केली तर सर्व विरोधकांची डिपॉझिट जप्त करू आणि आदित्य साहेब एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील अशी भावना व्यक्त केली- अनिल परब

31/08/2019,10:56AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *